मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

HOW TO WIN PHOTO CUTTING TASK!!

शेजारच्या एखाद्या गोंडस कुत्र्याचा फोटो काढून आणायचा, त्या फोटोला माझ्या सिलवेस्टर, लिओनार्डो, हायड्रोजन, नायट्रोजन इ. चा फोटो म्हणून नाव द्यायचं. मोती, सोनू चालणार नाही, इम्पॅक्ट कमी होतो.
आणि मग दररोज सकाळी त्या फोटोला कुरवाळत बसायचं...

मग टास्क आला ना, आधी खूप रडायचं, आणि एक दा फोटो कापला, तर कसं फसवलं म्हणून नाचायचं...

Rofl

हा सिझन एंटरटेनिंग होणारे जाम!
मला आतापर्यंत रूपाली, शिव, वीणा, किशोरी, बाप्पा आणि सुरेखाताई आवडल्या. केळकर, नेहा, शिवानी डोक्यात गेले. पराग उगाच शान्पणा करणारा वाटला.

Lol

केळकरला वाटत होत की तो एखादा नाट्यप्रवेशच करत आहे. वाटल की आरशासमोर उभ राहून म्हणेल
फोटो देता का कुणी फोटो,या गोरेगावमधल्या फिल्मसिटीत बांधलेल्या बिग बॉसच्या घरात फोटो देता का कुणी फोटो.
केवढी ती नाटक
पण आज वीणा आवडली,रडली तरी वायफळ बोलून उगाच फूटेज नाही खाल्ला.
आज बिचुकलेही आवडले.
शिवानी मात्र सहन होत नाही आहे.
बिगबॉसने बाप्पाला लावणी स्त्री वेशात आणि सुरेखाताईंना पुरुषवेशात लावणी करायला लावली ते नाही आवडल.लावणी हा लोकसंगीताचा आत्मा आहे,त्याचा मान हा राखला जायला हवा.टीआरपी साठी हे योग्य नाही.याचा मात्र निषेध.

तेच तेच काय टास्क देतात. याला वाचवायच त्याला वाचवायचं तर टेडी बेयर कापायचं / फोटो कट करायचे . मला असं वाटत आधी पासून त्यांना सांगितलेल असावं केळकर तुझा फ़ॅमिली फोटो कापायचा आहे तुला . यावं नि त्याव आणि मग रडायची नाटक पण करतात. डोक्यात शॉट आहे नुसता

पुंबा Lol

नाही अजिबात. मेघा किंवा स्मिता परत होणे नाही, बाकी नमुने मिळतील.

बिचकुले, शिवानी दोघे अजूनही डोक्यात जातायेत. फॅमिली फोटो किंवा टेडी कापणे हे कित्ती कॉमन झालंय. टेडी कापण्यासाठी देण्यापेक्षा एखाद्या संस्थेला डोनेट करा का सांगत नाहीत.

बिचकुले नक्की फायनलला असेल, त्याच्यावर तुटून पडत, त्याला महत्व देतायेत बाकीचे.

नेहा इंधन बचतीबद्दल योग्य म्हणत होती. पोहे फेकून का दिले, कटलेट्स, किंवा वडे करता आले असते की दडपे पोहे केलेले त्याचे, उकडलेला बटाटा, बेसन वगैरे घालून, तसही फ्रीजमध्ये ठेऊन संध्याकाळी करायचं होतं. कोणालाच कसं सुचलं नाही.

शिवानी बळंच कॅमेरासमोर नाटक करतीये असं वाटतंय. तिनी बिचूकलेंबरोबर फारच ताणून धरलं आहे. तिचं तोऱ्यात बोलणं डोक्यात जातंय आता.

शिव इनोसंट वाटतोय. पण बिग बॉस मधला presence काही entertaining नाहीये.

आणि मला वाटतंय नेहा परागला बोलली ते बरोबर होतं. आणि तिनी ते हॅन्डलही छान केलं. तिनं तिचं मत प्रदर्शित केलं आणि भांडण फार वाढूही दिलं नाही. पराग खूप aggressively बोलायला लागल्यावर ती गप्प बसली होती. अजून तरी कोणामागे वाईट बोलताना दिसली नाही ती. तिनी अनेक वेळा स्ट्रॉंग स्टॅन्ड घेतला. पण जे काही आहे ते तोंडावर आहे. प्लस एंटरटेनमेंट wise पण नेहाचं काँट्रीब्युशन छान आहे. आपलं मत नेहालाच!

शिवानी सुर्वे गरजेपेक्षा जास्त attitude दाखवते... खरतर तिने टास्क साठी स्वतः चा attitude बाजूला ठेवायला पाहीजे होता... आणि जर तस जमणार navt.. AB तिला जुमानणार नाही हे माहीत होत तर नंतर इतकी चिडचिड का करत होती? Channel che काही planning केल नसेल तर लवकरच काढतील लोक तिला आणि अस झाल तर जमिनीवर येईल बाईसाहेब... Nehane मात्र मस्त convince केल वैशाली la.. मेघा chi आठवण आली.. नेहा हुशार वाटतेय सध्यातरी

बाप्पांनी टास्क भारी केलं !
किशोरीही चांगली वाटली पण तो तुपकट गुळगुळीत लुझर अभिजित केळकर मात्रं अत्यंत फेक, अतिशय वाईट अ‍ॅक्टींग करत होता फोटो फाडताना ! काय भयानक खोटं रडण्याचं फडतुस अ‍ॅक्टींग, शिवानी इतकाच तो अनॉयिंग वाटतोय !
शिवानीच्या डबल स्टँडर्ड्सना लिमिटच नाहीये, स्वतः आयाबहिणींच्या शिव्या देते पण बिचुकलेने ठोकणे शब्द वापरला कि निघाले सगळे फाशी द्यायला, काय अनॉयिंग आहेत सगळिच यंग क्राउड !
खरच बिचुकलेने नाकावर टिच्चून सिझन जिंकावा हा !
बिचुकले नंतर सध्या तरी बाप्पा, किशोरी, सुरेखाबाई खूप सुसह्य वाटत आहेत कमी दिसले तरी.
Btw सेलिब्रिटीज पैकी बहुसंख्य अ‍ॅक्ट्रेसेस आणि अ‍ॅक्टर्स फिट नाहीयेत , अजुन तरी फार कोणी व्यायाम करताना दिसत नाहीत.
किशोरी शहाणेने मात्रं चांगले मेन्टेन केलय, शिव फिट आहे पण दिसतच नाही फारसा.

हो शिवानी अति डोक्यात जातेय, अतिशहाणी, अतिआगाऊ, अति अ‍ॅग्रेसिव्ह वाटतेय.

शिवानी ह्या आठवड्यातच जायला हवी आहे.

मला शिवला वोट द्यावसं वाटतंय.

मला सध्या वीणा, किशोरी, शिव, सुरेखाताई हे सर्व आवडायला लागलेत असं वाटतंय.

मला अजून तसा नाही वाटत. पण शांत शांत असतो, पटर पटर नाही करत. लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न नाही करत. समहाऊ अशा लोकांकडे माझं लक्ष जातं.

अन्जु
याशिवाय स्मिता सारखाच तो एकटाच फिट्नेस फ्रिक आहे, टास्क तिच्या सारखी चांगला करेल असे वाटतय आणि हो थोडा डंबही वाटतोय Wink

या आठवड्यात कोणीच बाहेर जाणार नाही ,अस दिसत आहे.म्हणूनच आति काय ते भांड भिंड भांडतील नंतर हेच भांडणारे तुझ्या गळा माझ्या गळा करतील.

नाही, जातेय कसली शिवानी इतक्यात !
ती आणि अभिजित दोघेही लांब पर्यन्त जाणार !

मी काही क्लिप्स पहिल्या या शोच्या .... चांगला टीपी आहे. सर्वच स्क्रिप्टेड असतंय कि ते भांडण-लफडी खरी असतात ?

याशिवाय स्मिता सारखाच तो एकटाच फिट्नेस फ्रिक आहे, टास्क तिच्या सारखी चांगला करेल असे वाटतय आणि हो थोडा डंबही वाटतोय >>> Lol

त्याचा आवाज थोडा बायकी वाटतो का, फार हळू बोलतो तो, ताई ताई मस्त म्हणतो मोठ्यांना.

शिवानी खुप डर्टी गेम खेळते आहे. बिचुकले शी काय पद्धतीने बोलली ते बघुन राग यायला लागलाय तिचा. त्याला काहीही शिव्या आणि बिंडोक म्हणतेय. त्यापेक्षा नेहा ने छान पद्धतीने वैशाली शी बोलायचा आणि तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला.
मला नेहा आवडायला लागली आहे हळुहळु. छान मुद्दे मांडते. माज न करता राहातेय अजुन तरी. शिवानी ला कसला माज आहे कळत नाही. मेघा ची मैत्रिण या भांडवलावर तिला कोणी पुढे नेणार नाही हे तिला कधी कळेल.

शिवानी दुसर्यांना disrespectful म्हणते. स्वतः किती respectful वागते.. पराग तिला चांगल्या प्रकारे समजवायला गेला होता तर हिने चक्क उडवून लावले त्याला... नुसता मीपणा भरलाय तिच्यात... Even week end la मांजरेकर काही बोलले तर मला त्याची पर्वा नाही असही बोलून मोकळी झाली बया... चांगली शाळा घेतली पाहीजे हिची week end ला.. Btw वीणा छान दिसते मला सगळ्यात सुंदर तीच वाटते.... रुपाली पण छान आहे दिसायला... Nehane कशी साडी घातली होती आज... काही तरीच... बर्‍याच लोकांना शिवानी सुंदर वाटते पण मला आधीही ती खूप सुंदर वैगेरे वाटत नव्हती अन्‌ आता तिच्या behaviour मुळे तर ती मुळीच आवडत नाहिये..

काल मला चक्क नेहा बरी वाटली, जर तिच्या जागी कुणीही असतं ना, डोक्याला लागल्यावर थयथयाट केला असता, घर डोक्यावर घेतलं असतं... तिने खूप छान मॅनेज केलं. शिवानीला लागलंय का बघा असंही म्हणाली. वैशालीलाही छान समजावत होती.
वैशाली खरंच डोक्यात जाते, नुसती फेक वाटतेय.
अभिजित तर 'आज नही तो कभी नही' या थाटात जसकाही ऑडीशन देत होता. फोटो फाडायचा आहे म्हटल्यावर त्याने जे रियाक्ट केलं ना, माकड दिसत होता.
वीणा, ही काहीच कामाची नाहीये. रुपालीनेही टास्क मस्त केला...
बिचुकले मुद्दाम करतोय, त्यामुळे टिकून राहील. पण आता बोर व्हायला लागलाय तो.
शिवानी किती निगेटिव्ह? बाई तू मेघाची मैत्रीण म्हणून असले नाटकं करत असशील ना, तर जरा नीट, कारण हिंदी बिबॉ नंतर तीच निगेटिव्ह झालीये. आणि तिनी आई काढली ना, तो शुद्ध फेकपणा होता, फ्लो मध्ये नव्हतं.
शिव जरा फेस तर दाखव. तसंच माधवही. बहुतेक माधवला वाटलं असेल काल जरा अति केलं म्हणून गप्प बसला.
पराग, यु मेड माय डे. मी कुणाच्या कामात नाक खुपसत नाही ना, मग माझ्याही नाही. कुणी दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटो आणि घालतं का? तरीही मी बोललो नाही... पोहे फेकलेतच ना, मग मी चांगलं बनवतोय तर बनवू द्या ना. गॅस वाचवून पदार्थ फेकण्यापेक्षा गॅस घालवून पदार्थ चांगले बनलेले परवडतील.
आणि तेही बरोबर आहे, बिग बॉसच्या घरात रेशन लिमिटेड आहे, गॅस नाही... Wink
किशोरी, क्रॉस ड्रेसिंगमध्ये मस्त वाटली, आणि अभिजित ने माती खाल्ली.
सुरेखाताई काल जरा खुलल्या होत्या, आणि विद्याधर यांची मस्त मजा घेत होत्या.

लास्ट बट नॉट द लिस्ट.
बाप्पा.
काय जबरदस्त नाचला हा माणूस, आवडलं... टाळ्या शिट्या सगळं... अशाच काही गोष्टींमुळे बिग बॉस लक्ष्यात राहतं.
आणि सगळ्यांना बिचुकलेची स्ट्रॅटेजी समजावून देत होता, आणि बरेच लोक ऍग्रीही झाले.
बाय द वे, काल विक्रांत सरंजामे यांचा उल्लेख झाला बरं का... कामाची पोहोचपावतीच... Wink

ती शिवानी स्वतःला काय समजते काय माहीती, देवयानीमधून काढून टाकलेली बहुतेक तिला नंतरच्या दोन्ही मराठी सिरीयल्स लवकर ऑफ एअर गेल्या. हिंदी एक दोन सिरीयल मधे होती. जायला हवी ती लवकर.

बाप्पा.
काय जबरदस्त नाचला हा माणूस, आवडलं. >>> हो बाप्पा छान नाचले, सरप्राईज्ड अ‍ॅक्चुअली.

शिवानीबद्दल वरच्या सगळ्यंशी सहमत! खूप जास्त करतेय ती. अरोगन्स पण खूप आहे. ते सारखं एक भुवई उडवून उगीच खोट्या खुन्नस ने बोलणे सहन होईना मला!! इतके केलेच काय होते त्या बिचुकले ने? फक्त तिला सेफ केले नाही जे अपेक्षित होते ( मैथिली तिला तसे म्हणाली पण , त्याबद्दल मैथिलीला एक मार्क दिला मी !). समोर बस म्हणाला त्यात काय इतका अपमान झाला??? भवानीमाता, वध वगैरे काय व्हॉट द ** !
तिने इंडियन एक्सप्रेस ला घरात जायच्या जस्ट आधी छोटा इंटरव्ह्ञु दिला होता त्यात ती म्हणतेय मेघा माझी मैत्रिण असली तरी मी तिच्याकडून टिप्स घेतल्या नाहीत तर उलट गेल्या सीझन ला मीच तिला टिप्स दिल्या होत्या, ज्यामुळे ती जिंकली! अशीच आहे ती. जुईसारखी उडालेली आवडेल मला. पण नाही जायची इतक्या लवकर. निदान बिचुकलेच्या आधी ती जावी !!
नेहाचा आवाज फार विचित्र आहे. पण ती इतरांपेक्षा युनिक वाटतेय तिच्या इतरांपेक्षा वेगळ्या स्टँड मुळे आणि बिहेवियर ने. बाकी सगळी मेंढरं रुपाली, वीणा, केळकर, वैशाली सगळे त्या बिचुकलेच्या मागे. तो केळकर तर साफ क्रिंजवर्दी वाटतो मला. तुपकट कुठला. सारखी ती कंबर लचकवत नाचतो काय. टेडी आणि फोटो टास्क अति प्रेडिक्टेबल आणि बोरिंग झाले. आज पुन्हा रुपाली त्या बिचुकलेच्या अंगावर धावून जाताना दाखवली आहे. काहीतरी नवं करा आता!
काल किशोरी , बाप्पा, सुरेखाताईंनी जिंकले. लावणी भारी झाली! किशोरी पॉझिटिव आणि सेन्सिबल वाटते आहे. काल केळकर च्या गेटप मधे एंटरटेनिंग पण वाटली. पराग चे काल "गरजेपुरतेच" किचनमधले भांडण, योग्य तिथे बरोब्बर शिवानीला कन्फ्रन्ट करणे तेही ठाम पण सौम्य पणे आणि लगेच बॅक ऑफ! तिने त्याचे ऐकले नसले तरी त्याचे काम झाले! लंबा खिलाडी वाटत आहे.

३ दिवसात ३०० + पोस्टी... बापरे!
धुडगूस सुरू आहे पहिल्याच दिवसापासून. पण घरात सगळे यंग गन्स, T 20 असल्यागत खेळाताहेत. मात्र, यात टेस्ट मॅच साठी चा लंबी रेस का घोडा/डी म्हणूनः (अजून सुरूवात आहे तरिही, फर्स्ट ईम्प्रेशन)
१. रूपाली (मेघा नं १): स्पष्ट व ठोस. पण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कितपत करू शकेल हे पुढे पहावे लागेल.
२. शितोळे (मेघा नं २): सर्वत्र असण्याची खूबी आहे पण एक्स फॅक्टर कमी आहे.
३. माधव (पुष्कर!): एक्दम गेम बाज वाटतो.. सरशी तिथे पारशी
४. शिव (स्मिता + थोडासा डोकेबाज!). इनोसंस चा फायदा नक्की मिळणार. घरातील सर्व बैल कामामुळे व अ‍ॅक्टीविटी मुळे तगून राहिल.
५. पराग (आस्ताद) किंवा विणा (she has her own identity looks like... and didn't get nominated as such.. so seems to be playing balanced. but will need one of the above Rada Co to survive.)

ज्येष्ट लोक्स हळू हळू बाहेर पडतीलच.. सुरेखा मिस्फिट वाटतात. बाप्पा व दिगंबर करमणूक करतात पण तरूणांपुढे कमी पडतील.

बिचुकले सध्या जोरात आहेत. पण ईतर सो कॉल्ड सोफेस्टीकेटेड गँग त्यांना लवकरच वेगळे करून बाहेरचा मार्ग दाखवतील हे नक्की.

मात्र बिबॉ१ मधले खेळाडू जरा जास्तच जेन्युईन वाटले होते. कदाचित बिबॉ २ मधले बहुतेक स्पर्धक आधीचे (बिबॉ१) बघून, तपासून, ठरवून, अभ्यासून आल्याने बळेच आव आणल्यागत वागताहेत असे वाटते. बिबॉ १ एक्स्प्लोरेटरी होते स्पर्धक व प्रे़क्षकांसाठी. त्यामूळे shock n awe quotient जरा अधिक होता. Happy बिबॉ २ मात्र थोडे कुरघोडी आणि राडाबाजी जास्त वाटते आहे.

बाकी शिवानी म्हणजे जुई गडकरी प्लस महा हायपर फॅक्टर असा प्रकार आहे. comes acrosss as person with emotional imbalance than attitude/aggression. Aggression म्हणजे नुसतच आरडा ओरडा, शिव्या, राडा, अरे ला कारे अशी तिची व्याख्या दिसते. Aggression can be very subtle as well.. aka: intimidation without decibels.

असो.पण हा सिझन जोरदार राडा सिझन म्हणून गाजणार असे वाटते.

नाही, जातेय कसली शिवानी इतक्यात ! ती आणि अभिजित दोघेही लांब पर्यन्त जाणार ! >>>>>>>>>>> +++++++++११११११११११

क्रॉसड्रेसिन्ग डान्स छान झाला. चौघेही छान नाचले. अभिजित छान दिसत होता मुलीच्या गेटअपमध्ये. सुरेखाताईन्नी पुरुषी वेष करण्यापेक्षा स्वत: च्याच कपडयात ( जीन्स- टि शर्ट) नाचल्या, पण ग्रेस फुली नाचल्या.

केळकरच रडण फेक होत. बाकी ते फॅमिली फोटो फाडण, टेडी बिअर कापण(हिना खानचा ' पु' आठवला Lol ), पाटी गळयात लटकवून फिरण, कपाळावर अपात्र असे लिहण हे मला क्रुरपणा वाटतो, गेम असला तरीही.

Pages