फक्त नावच नको मला

Submitted by प्रियकांत राठोड on 19 March, 2019 - 22:59

फक्त नावच नको मला , ज्यात माझी जात भासते
मौन ठेऊ नका मला , फणा त्याची कात भासते

भूक भागते कोणाची , दुःख त्यांची पात सोलली
रात्रीतील चंद्र हीच , किती ताटात भासते

हुंडा देत जन्मभर , बहिऱ्या व्याधीस रात गिळून
खिन्न झाले जीवन , मृत्यू विचारात भासते

घातपात किती झाले ,फतवे कसे शांत जरी
कुढले स्वर कंठात , हे प्रेम ज्यात भासते

आई न होताच हत्या ,कोण शोकांत देईल
त्यांना स्वर्ग लाभले , नाही घरात भासते

Group content visibility: 
Public - accessible to all site users