काव्य-गीतांचा खेळ- कवितांचा ऋतु हिरवा

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2019 - 23:11

मराठी काव्य विश्वात ऋतू आणि महिने वेगवेगळ्या भावनांशी घट्ट निगडित झालेले आहेत.
कोणतीही भावना अधोरेखित करायला कवी निसर्गातील प्रतीके वापरतो.

कठीण परिस्थिती सांगताना वैशाखवणवा, ग्रीष्म आठवतो.
विरहिणीची अवस्था सांगताना कवीला रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा आठवतात, तर फर्मास लावणीतला शृंगार माघाची थंडी असेल तर अधिक खुलतो.

आज आपण ऋतू आणि मराठी महिन्यांच्या उल्लेख असणारी गाणी/ कविता घेऊन एक खेळ खेळणार आहोत "कवितेतील ऋतू"

खेळाची पद्धत नेहमीचीच,

पहिला भिडू ऋतू / महिना चा उल्लेख असणाऱ्या ओळी लिहील , हे झाले आपले कोडे
पुढचा भिडू त्या गाण्याचा/ कवितेचा मुखडा लिहील आणि वरच्याप्रमाणे पुढचे कोडे घालेल.

भिडू १ :-
ग्रीष्माची नाजूक टोपली , उदवावा कचभार तिच्यावर
गर्द विजेचा मत्त केवडा , तिरकस माळावा वेणीवर

भिडु २ :-
रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

नवीन कोडे:-
कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत.

पण नियमांशिवाय खेळ कसा खेळता येईल!
दोनच नियम पाळायचे.
१.नुसताच पाऊस, ऊन, थंडी असा उल्लेख नको. शिशिर, हेमंत ,वसंत, ग्रीष्म, वर्षा , किंवा उन्हाळा पावसाळा असे स्पष्ट ऋतू चे नाव हवे.
२.मराठी १२ महिन्यांची नावे चालतील.

तर मंडळी , स्मरणशक्तीला ताण द्या आणि ऋतुवैभव मिरवणाऱ्या कविता/ गाणी येऊ द्या.

पहिले कोडे:-
कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे इथे कुणीच नाही?
कवी, कविताप्रेमी मंडळी ऋतुवैभव मिरवणाऱ्या कविता वाट बघतायत.
मला तरी ही कविता येत नाही. कुणाला येतेय का?

@ संयोजक,
कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत
या कवितेतील अधल्या मधल्या ओळी आहेत. आता याची सुरूवात लिहायची ना?

वरती कोड्यात दिलीय ती बहुतेक इंदिरा संत यांची पानगळ कविता आहे पण वरती उदाहरणात गाणं दिलंय मग गाणं ओळखायचंय की कविता ??

अक्षय बरोबर, सुरवातीच्या ओळी लिहायच्या (नाव नसेल तरी चालेल)
मुखडा/
आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलीना लागली.

अक्षय तुम्ही पुढचे कोडे घालू शकता

वरती कोड्यात दिलीय ती बहुतेक इंदिरा संत यांची पानगळ कविता आहे>> मा येत असेल तर लिहा न उत्तर .. आणि पुढचं कोडं पण विचारा Wink
गाणं ओळखायचंय की कविता ??>> काहीही असू शकतं ना ? गाणं किंवा कविता .. तसही गाणं हे आधी कविता च असते ना ? :विचार करणारी बाहुली:

कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत.

हे कडवे ज्याच्यात आहे ते गाणे / कविता / भावगीत -- काहीही -- त्याची सुरूवात / मुखडा ओळी लिहायच्या

अधल्या मधल्या ओळीवरून कविता/ गाणे ओळखणे कठीण जात आहे का?
एक छोटीशी पळवाट आहे यात,
कोडे गुगल केले तर बर्याचदा लगेच उत्तर मिळते Wink

मात्र कोडे विचारणाऱ्याला हि पळवाट उपलब्ध नाही
एकंदरीत या खेळात उत्तर देण्यापेक्षा कोडे विचारणाऱ्याला जास्त विचार करावा लागणार आहे .

ओलेत्याने दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध
नि:स्तब्ध मनाची वेस

>>ऋतू / महिना चा उल्लेख असणाऱ्या ओळी >>
खरतर अक्षय च्या कोड्यात रुतुचा उल्लेख नाही त्यामुळे हे ग्राह्य आहे की नाही माहिती नाही तरी उत्तर देते Happy

पाउस असा रुणझुणता
पैजणे सखीची स्मरली
पाउल भिजत जाताना
चाहुल विरुन गेलेली

संदीप खरे ची कवीता

संयोजक बिझी असतील मीच वेगळं कोडं देतो
मंतरला हा कुंज लाजरा
महिवरला सुम-भार हासरा
झिरमिर झिरमिर पाऊसधारा गाती श्रावण-गाणें

एकंदरीत या खेळात उत्तर देण्यापेक्षा कोडे विचारणाऱ्याला जास्त विचार करावा लागणार आहे .>>
अगदी खरय....:-)
हे घ्या पुढचं कोडं

आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला

आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
>>>नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा ...

पुढचं कोडं >>
लपे ढगांमागे धावे माळावर
असा खेळकर श्रावण आला .
सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला

पुढचं कोडं -

रोज नवा ऋतू येतो देही तुझ्या वसतीला
आला आला म्हणताना बहर तो झाला जुना
क्षण उन्ह, क्षण छाया, क्षणी सारे जलमय

पुढचं कोडं >>
पेटून कशी उजळेना
हि शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापशी
पाउस असा कोसळला

ओक..घे उत्तर

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
-ग्रेस

पुढचं कोडं -

विसरली का गं ? भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं, मनं आचवलं

पुढचं कोडं >> सोप्प
मनभावन हा श्रावण प्रिय साजण हा श्रावण
भिजवी तन भिजवी मन श्रावण
थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा

आता जरा वेगळं देते..बघ सापडतं का ते Happy

वसंतातल्या वस्तीसोबत ग्रीष्माचेही भान मला
झाडाईतके सोंग प्रीतीचे वठले उत्तम वठले गं Happy

Pages