Submitted by पुरंदरे शशांक on 27 February, 2019 - 00:54
वैभवशाली मराठी
ज्ञानदेवी बोले । मर्हाठी सोज्वळ । जाये परिमळ । दाही दिशा ।।
तुकयाची गाथा । मर्हाठाचि बोल । सर्वदा सकळ । लोकमान्य ।।
शाहीर गर्जतो । पोवाडा गर्वाने । छाती अभिमाने । फुलतसे ।।
नवरसपूर्ण । समृद्ध भांडार । भाषा हीच थोर । आम्हांलागी ।।
मर्हाठी भाषेचे । ऋण न फिटेचि । माऊली आमुची । जन्मोजन्मी ।।
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम कौतूक केले आहे माय
अप्रतिम कौतूक केले आहे माय मराठीचे.
सु...रे...ख...!
नितांत सुंदर!
नितांत सुंदर!
नितांत सुंदर!>>>+१०१
नितांत सुंदर!>>>+१०१
नितांत सुंदर !
नितांत सुंदर !
मस्त. आवडली .
मस्त. आवडली .