एकेकाळी म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.
ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचुदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण परेशान होऊन जायचे. त्यात मुलीच्या सासरच्यापैकी कुणी ब्युटीशीयन असली किंवा साधे थ्रेडिंग शिकत असली तरी ती आत येऊन उगाचच सासरचा तडका देऊन जाणार आणि नसलेली अक्कल पाजळणार. सासरघरची त्यामुळे तिची अक्कल भारी असाच अभिनय करायला लागणार वगैरे धमाल व्हायची. गोरी नाही दिसत असं म्हणत एका नवऱ्यामुलीच्या सासूने मेकअप टेबलावरची पावडर घेऊन केलेल्या मेकअपवरून बचाबचा चोपडून खारा दाणा करून टाकले होते. नवऱ्यामुलीचे अश्रू आणि लिंपलेली पावडर पुसून परत चेहरा होता तसा सुंदर करण्यात रिसेप्शनला स्टेजवर जायला अर्धा तास उशीर झाला होता. लग्न लागल्यानंतर काही तासातच लग्न केल्याचा पश्चात्ताप नवऱ्यामुलीला होउ लागला होता.
नाचाच्या मेकपांची अजून वेगळी तऱ्हा. एखाद्या नाचाच्या क्लासने त्यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलं असायचं. अरंगेत्रम किंवा
गुरुपौर्णिमा वगैरे. भारतीय शास्त्रीय नृत्य. ठराविक प्रकारे डोळ्यांचा मेकअप ही त्या मेकअपची खासियत. मुळात जेव्हा हे नृत्य सादर होत असे तेव्हा उपलब्ध असलेली प्रकाशयोजना म्हणजे मशाली तत्सम. तर त्यांच्या उजेडात डोळ्यांच्या मुद्रा व्यवस्थित दिसाव्यात यासाठी खरंतर भरदार डोळे रेखनाचे प्रयोजन होते. मग नंतर विशिष्ट प्रकारे आयलायनिंग करणे हा नृत्यशैलीच्या आहार्य अभिनयाचा भाग बनला. आता आपल्याकडे भरपूर प्रकाश असतो स्टेजवर तर हे डोळे रेखन सौंदर्य वर्धन आणि शैलीचा भाग म्हणूनच आणि तितपतच यायला हवे. हे सगळे मला माझ्या गुरूने शिकवले होते. पण अनेक क्लासच्या गुरूंना त्यांच्या गुरूने शिकवले नसावे.
‘गर्दभी अप्सरायते’ वयातल्या गोड मुली, तलम त्वचा वगैरे असताना नको ते मेकअपचे थर असं व्हायचं. पण कार्यक्रमाचा अवधी, नाचून येणारा घाम वगैरे सगळ्यामुळे बराच वेळ टीकेल असा मेकअप करणे ही गरज असे. तसेच शैलीदार डोळे, ओठ रेखणे ही ही. पण किमान दोन मिलीमीटर रुंदीचे आयलायनिंग केले नाही तर आयत्यावेळेला नाच विसरणार असा काही शाप असावा. त्यामुळे क्लासच्या ताईंच्या गुरू मी केलेल्या मेकपवर आपल्या प्रकारे डोळे रेखत. दोन मिलीमीटर जाडीची रेषा, तीही थरथरती आणि गाल कुणी मारल्यासारखे आरक्त. सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. माझा वैताग होई. आधीच स्टेज परफॉर्मन्सचं टेन्शन, त्यात हा वाढीव बटबटीत मेकअप तोही साक्षात गुरूंच्या गुरूने केलेला त्यामुळे गोंधळलेल्या मुली समोर असत. आरश्यातला स्वतःचा घुबड चेहरा बघून क्वचित डोळ्यात पाणी आलेले असे. यांच्यासमोर मी काय वैतागणार?
शाळेच्या गॅदरींग्जचे वेगळे नियम. सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक (शाळेत असेच म्हणतात!) लावली नाही तर मेकअपवाल्यांना पैसे देत नाहीत. मग मुले ‘आज गोकुळात’ वर नाचणार असोत की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे बनून भिंत हलवणार असोत की कोवळा शिवबा आणि मावळे बनून रोहिडेश्वराची शपथ घेणार असोत गालावर गुलाब फुललेले आणि डाळिंबाचं दानं व्हटावरी चुरडलं असायलाच हवं. अशी समस्त शिक्षक आणि पालकांची धारणा. चुकून अशी धारणा नसली तर आम्ही कौतुकाने ज्ञानेश्वर, राधा, शिवबा, टिळक वगैरे रंगवत जायचो. अचानक राधाबालेच्या माऊलीला गालावरच्या गुलाबांची हौस यायची. मग ती आमच्या मेकपवर गुलाब फुलवायची. तिच्या गालावरचे गुलाब बघून टिळकांना आपल्याशी मेकपमध्ये पार्श्यालिटी झालीये असे वाटून रडू येऊ लागायचे. ते रडू थांबवायचे तर टिळकांचेही गाल गुलाबी. मग लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी. मेकअपवाले हताश!
आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.
तळटिप: भरतनाट्यम या कलेविषयी मला अपार प्रेम आहे आणि सर्व गुरूंविषयी आदरही आहे. मात्र त्यातल्या काही गुरूंची मेकप वगैरे बाबतीतली समज थोडी अविश्वासार्ह आहे इतकेच.
आवडले
आवडले
अगदी खरंय!
अगदी खरंय!
आवडलं !
आवडलं !
सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक >>>> याचा अनुभव गेल्या आठवड्यात दोनदा घेतला. एकदा मेक-अप वगैरे करुन झाल्यावर कार्यक्रम अपरिहार्य कारणाने रद्द करावा लागला म्हणून, आणि दुसर्यांदा तो कार्यक्रम झाला ( एकदाचा) तेव्हा!
प्रत्येक आणि कुठल्याही स्टेज परफॉर्मन्स साठी मुलग्यांना मेक-अप शिवाय बरे दिसत असून नंतर हे टिळे लावून विदुषक करण्याचा शिक्षक मंडळींचा हट्ट का असतो समजत नाही !
सुंदर मुलीचे आरक्त घुबडात
सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. >> futale hya vakyala.
Bhari ahe lekh.
आवडलं लिखाण
आवडलं लिखाण
थँक्स ऑल!
थँक्स ऑल!
एका छोट्या मैत्रिणीचे नुकतेच लग्न झाले. लग्नात कसे चवळटबा दिसणे कंपलसरी असते यावर तिची एक पोस्ट होती. त्यावरून पूर्वीचे मेकपोद्योग आठवले माझे.
आरक्त घुबड ☺️☺️☺️☺️☺️
आरक्त घुबड ☺️☺️☺️☺️☺️
मस्त!
मस्त!
का छोट्या मैत्रिणीचे नुकतेच
का छोट्या मैत्रिणीचे नुकतेच लग्न झाले. लग्नात कसे चवळटबा दिसणे कंपलसरी असते यावर तिची एक पोस्ट होती. त्यावरून पूर्वीचे मेकपोद्योग आठवले माझे. >>> ह्याच्यावर लिहा ना जरा.
तेच तर लिहिलंय. लेखात आहेत ते
तेच तर लिहिलंय. लेखात आहेत ते माझे पूर्वीचे मेकपोद्योगच आहेत. मेकप आर्टिस्ट म्हणून काम करणे सोडूनही २० वर्ष झाली. चारपाच वर्षांपूर्वीपर्यंत मेकप शिकवत तरी होते नाटकाच्या विभागात आता तेही नाही.
छानच! अजून थोडा मोठा चालला
छानच! अजून थोडा मोठा चालला असता की!
मस्तच..
मस्तच..
अनु ह्यान्च्या लेखाची आठवण झाली,
दुसरी बाजु म्हणावी का ही
आवडला लेख.
आवडला लेख.
>>अजून थोडा मोठा चालला असता की!
+१
अजून थोडा मोठा चालला असता की!
अजून थोडा मोठा चालला असता की!<< एवढंच सुचलं हो आत्ता..
अनुच्या लेखाची आठवण होणे छानच. पण ही दुसरी बाजू कशी काय?
मस्त !
मस्त !
वाचताना मजा आली.पण प्रत्यक्ष
वाचताना मजा आली.पण प्रत्यक्ष अऩुभव नक्कीच वैतागवाणा असणार..
लै छोटा लेख आहे नीधपजी.
लै छोटा लेख आहे नीधपजी.
पण ही दुसरी बाजू कशी काय?>>>>
पण ही दुसरी बाजू कशी काय?>>>>> येथे काही वाक्ये मेकप आर्टिस्ट ची व्यथा दर्शवतात
अनु ह्यान्च्या लेखात मेकप करून घेणार्यान्ची व्यथा / मनोगत आहे
अर्थात कन्टेक्स्ट खुप वेगळा आहे दोघांचा, तुलना नाही होउ शकत.
मला आपलं उगीच आठवलं
अजून थोडा मोठा चालला असता की+११११
हे मनावर घ्या आणि अजुन लिहा
अनु ह्यान्च्या लेखात मेकप
अनु ह्यान्च्या लेखात मेकप करून घेणार्यान्ची व्यथा / मनोगत आहे<< तुम्ही अनूचा लेख वाचलाय ना नक्की?
ते पार्लरमधल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस आणि थेरपी बद्दल आहे. ते ब्युटिशियन्स करतात.
मी ब्युटिशियन कधीच नव्हते. विक्रम गायकवाडकडे मेकप शिकलेय. मेकप आर्टिस्ट होते.
अॅज अ थंब रूल ब्युटिशियन्स भयाण मेकप करतात. निदान तेव्हा तरी करायच्या. गोरे करणे, साडीला मॅचिंग आयशॅडो हे विनोद ब्युटिशियन्सच करायच्या.
एनीवे.. आठवण येणं चांगलंच आहे.
हे असंच आणि इतकंच सुचलं म्हणून लिहिलंय. अजून जास्त वगैरे अवघड आहे निदान सध्या तरी.
सुंदर मुलीचे आरक्त घुबडात
सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे.
ते पार्लरमधल्या वेगवेगळ्या
ते पार्लरमधल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस आणि थेरपी बद्दल आहे. ते ब्युटिशियन्स करतात.>> ओह असे आहे होय, मला वाटलं ब्युटिशियन्स आणि मेकप आर्टिस्ट एकच असतं..
फरक समजावुन सांगाल का?
कधी संबन्ध आला नाही म्हणून विचारत आहे
भारीच्च आहे
भारीच्च आहे
(No subject)
मस्त....
मस्त....
आरक्त घुबड>>>
आरक्त घुबड>>>
भारी लेख ..!! हहपूवा
अब्जावधी ची बजेट असणार्या
अब्जावधी ची बजेट असणार्या चित्रपटातल्या नायलॉन च्या निर्जीव दाढ्या यावर पण येऊ द्या...
आणि अगदी भरपूर बजेट असलेल्या
आणि अगदी भरपूर बजेट असलेल्या पिक्चर मध्ये 1800 च्या सद्दीच्या राण्या वेलवेट, पारदर्शक स्लीव्ह आणि मशीन एम्ब्रॉयडरी वाले ब्लाउज घातलेल्या पण ☺️☺️
एकदम खुसखुशीत लेख..
एकदम खुसखुशीत लेख..
मस्तं!!
मस्तं!!
@किल्ली: ब्युटीशीयन्स
@किल्ली: ब्युटीशीयन्स तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात सुंदर /स्मार्ट बनवून देतो असे म्हणून उल्लू बनवतात.
मेकअप आर्टिस्ट्स तुम्हाला उल्लूचा रोल करायचा असला तरच उल्लू बनवतात. (किंवा अज्ञानाने आपण स्वतःलाच उल्लू बनवून घेतो.)
Pages