प्रश्न ....? जॉर्ज मार्टिनचं गेम ऑफ थ्रोन्स किंवा स्टीफन किंगच्या कादंबऱ्या मराठीत अनुवादित का होत नाहीत

Submitted by शुभम् on 12 February, 2019 - 10:35

जॉर्ज आर आर मार्टिन यांची सोंग ऑफ आईस अंड फायर ही पुस्तकांची सिरीज किंवा स्टीफन किंगच्या सत्तरच्या वर असणार्‍या कादंबऱ्या मराठीत उपलब्ध का नाहीत.....?

फॅण्टसी fantasy या साहित्य प्रकाराला मराठीत काय नाव आहे....?

जी आर आर टॉल्कीन , जॉर्ज आर आर मार्टिन या लेखकांंसारखं मराठीत कोणी फॅन्टसी लेखन केलेलं आहे का.......?
मला जास्त माहित नाही नारायण धारप रत्नाकर मतकरी आणि जुन्या वीरधवल सारख्या आणि दातार शास्त्रींच्या कादंबऱ्या सोडल्या तर......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टीफन किंग च्या कादंबऱ्या ऑफिशियली मराठीत आणण्याचे हक्क बरेच महाग असावे.किंग च्या जवळजवळ सर्व कादंबऱ्या चित्रपटात रूपांतरित होतात.
शिवाय अनुवाद करणारा मनुष्य ताकतीचा लेखक असावा लागतो.ड्रॅकुला चा प्रसिद्ध अनुवाद चांगला असला तरी काहीवेळा 'his face ashened' चे 'चेहरा राखेने सारवल्या सारखा झाला' असं अतिशय शब्दशः भाषांतर आहे.भाषांतर डेस्टिनेशन भाषेतले त्यातल्या त्यात जुळणारे वाक्प्रचार टाकावे लागतात.थेट शब्दाला शब्द देऊन चालत नाही.

<जी आर आर टॉल्कीन यांच्या कादंबऱ्यांचे मराठीत छान भाषांतर झाले आहेत>
होय......... वाचल्यात त्या ..... डोक्यातून जात नाहीत लवकर .....
<स्टीफन किंग च्या कादंबऱ्या ऑफिशियली मराठीत आणण्याचे हक्क बरेच महाग असावे.किंग च्या जवळजवळ सर्व कादंबऱ्या चित्रपटात रूपांतरित होतात.>
Harry Potter series मात्र उपलब्ध आहे.......

वाचक मिळत नसतील असं नसेल ना ......?
आणि हो त्या fantasy प्रकाराला मराठीत काय म्हणतात ..... ?

१. अनुवाद करायला खूप चांगले लेखक आहेत, त्यांनी चांगले अनुवाद सुद्धा केले आहेत,

२. हॅरी पॉटर पासून डॅन ब्राउन यांच्या प्रत्येक कादंबरीचे अनुवाद झाले आहेत. आत्ताच फिफ्टी शेडस ऑफ ग्रे सिरीजचे मराठी अनुवाद झाले आहेत. जेफ्री आर्चर, ली चाईल्ड, पौलो कोहेलो, जॉन ग्रीन, खालिद हुसेनी, जेम्स पॅटरसन, जॉन ग्रिशम या बेस्ट सेलर लेखकांच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत, पण मग आमच्या किंग काकांच्या पुस्तकांचे अनुवाद का होत नाहीत?

स्टीफन किंग च्या कादंबऱ्या अनऑफिशियली मराठीत आणल्यात कि धारपांनी. किंगच्या किती कादंबर्‍यांची बीजे धारपांनी वापरली आहेत. त्यांचे हे रुपांतर एकदम चपखल मराठी माती मधले वाटते.

गॉट चा मूळ बाज आहे तो मराठीत आणता येईल असे मला वाटत नाही. sex and war is all about power ह्यातून त्यात जो क्रूड पाअ उतरलाय तो मराठीत उतरवता येणे जमेल असे वाटत नाही.

काही नमुन्यादाखल

रात का राजा
खलिसीपुत्र ड्रॅगन
उत्तरप्रदेश चा राजा जॉन अक्करमाशी
भिंतीवरील रात्रीचे पहारेकरी
लोहासन
विलायती पोलाद

जमलं तर उरलेला करून टाका

मराठी प्रकाशक पुढे येणे , त्याने कायदेशीर हक्क मिळवणे , अनुवादक मिलणे व पुस्तक छापून तयार होणे,

किचकट प्रोसेस असते

मराठी प्रकाशक पुढे येणे , त्याने कायदेशीर हक्क मिळवणे , अनुवादक मिलणे व पुस्तक छापून तयार होणे,

किचकट प्रोसेस असते

शिवाय अनुवाद करणारा मनुष्य ताकतीचा लेखक असावा लागतो

>>> अनुवादाचा संपादकही तितक्याच ताकदीचा नसेल तर अनुवादाची माती होते. Sad

>>शिवाय अनुवाद करणारा मनुष्य ताकतीचा लेखक असावा लागतो.
अनुवादासाठी क्राउड्सोर्सिंगचा आधार घेतलेल्याची काही उदाहरणे आहेत का? पुरेश्या लोकांनी हातभार लावल्यास हे शक्य होईल असं मला वाटतं. We need active community and a wiki like platform for the same.

अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे..
मराठीत दुर्देवाने अश्या प्रकारच्या कादंबऱ्या नाहीत
fantasy साठी कल्पनाविलास >> अगदी योग्य शब्द आहे

50 शेड्स ऑफ ग्रे चं मराठी भाषांतर ही कल्पना मला भयंकर विनोदी वाटली. Proud फक्त मी नाही, माझ्या जाऊ आणि नणंदेला सांगितली त्यांना चर्चा न करता नुसतं ऐकूनच हसू आलं, म्हणजे एकुणातच विनोदी पुस्तक झालं असणार.

भाषांतर आणि स्वैर अनुवाद यात मी स्वै. अनुवाद प्रिफर करते, करेन. वाक्यच्या वाक्य भाषांतरित केलं की मजाच जाते आणि मूळ आशयाला धक्का न लावता साहित्य भाषांतरित करायचं तर चांगल्या चांगल्या लेखकांची पण तारांबळ होते. ताजं उदाहरण म्हणजे नुकतंच वाचलेलं - The yearling - by Marjorie Kinnan Rawlings
मराठी अनुवाद - 'पाडस' - राम पटवर्धन . फारच शब्दशः अगदी वाक्या वाक्याच भाषांतर आहे, स्वैर अनुवाद किंवा मग अजून छान भाषा प्रभुत्व असलेल्या कोणी लेखकाने हे पुस्तक हाताळले असत तर वाचायला अजुन मजा आली असती. असं तोडकमोडक वाचण्यापेक्षा मग मूळ इंग्रजी पुस्तक मिळवून तेच वाचावं.

भाषांतरावरून आठवलं, इंग्रजी सिनेमाचं हिंदीकरण हा अजून एक प्रचंड विनोदी प्रकार. माझ्या मेडच्या मुलांसाठी मी ज्यूरासिक पार्कची हिंदी CD आणून दिली होती. त्यातलं एक वाक्य ऐकलं 'वो देखो वो देखो, वहा है बडी चिपकली' अस डायनोसॉरला म्हटलेलं ऐकल्यावर डायनोसॉर स्वतःहून पृथ्वीतलावरन नष्ट झाले असतील याची खात्री पटली.

मीरा.., मला पाडसची भाषा खूप म्हणजे भयंकर आवडलेली.
मी मूळ पुस्तक घेऊन ठेवलंय, वाचलं नाहीए अजून.

शब्दशः अनुवादाची भयंकर उदाहरणं मी' मी वाचलेले पुस्तक' वर लिहिलीत.

> चांगली अनुवादित मराठी पुस्तके, असा एक धागा काढायला हवा. > धागालेखकची हरकत नसेल तर या धाग्यालाच बदलता येईल.

> हॅरी पॉटर पासून डॅन ब्राउन यांच्या प्रत्येक कादंबरीचे अनुवाद झाले आहेत. आत्ताच फिफ्टी शेडस ऑफ ग्रे सिरीजचे मराठी अनुवाद झाले आहेत. जेफ्री आर्चर, ली चाईल्ड, पौलो कोहेलो, जॉन ग्रीन, खालिद हुसेनी, जेम्स पॅटरसन, जॉन ग्रिशम या बेस्ट सेलर लेखकांच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत, > कायदेशीर हक्क मिळवून झाले आहेत हे सगळे अनुवाद? विकत घेऊन वाचली जातात ही अनुवादीत पुस्तक? कोण वाचतं? याचे मार्केट, व्यवसाय गणित कसे चालते?

===
पाडस आणि चौघीजणीचे आतापर्यंत कौतुकच ऐकलंय.

चौघीजणी द बेस्ट आहे!! आणि याच तोडीचा अनुवाद म्हणजे पुलं लिखित "काय वाट्टेल ते होईल!!"नक्की वाचावीत प्रत्येकाने ही 2 पुस्तकं.(चौघीजणी मेल्स ना बोअर होतं असा थोडा अनुभव आहे.मी अगदी गहिवरून भारावून भावाला वाच म्हणून सांगितलं तर तो वाचून "हे काय चार बहिणी चादर शिवतात, मोजे विणतात यावर 10 पानं खर्ची घातली आहेत.हे काय वाचायचं" म्हणून अर्ध्यात सोडून बसला.)

मी पण "पाडस"चा मोठ्ठा फॅन. नंतर कधीतरी मुळ इंग्रजीत ते वाचायला घेतलं पण मी जास्त पुढे नाही जाउ शकलो. मराठी पाडसची मात्र कित्येक पारायणं केलीत.

"राग दरबारी" हे मला आवडलेलं अजुन एक मराठी भाषांतर. मुळ हिंदी मी नाही पुर्ण करु शकलो.

> चौघीजणी मेल्स ना बोअर होतं असा थोडा अनुभव आहे.मी अगदी गहिवरून भारावून भावाला वाच म्हणून सांगितलं तर तो वाचून "हे काय चार बहिणी चादर शिवतात, मोजे विणतात यावर 10 पानं खर्ची घातली आहेत.हे काय वाचायचं" म्हणून अर्ध्यात सोडून बसला. > Little Women मलादेखील बोअरच होईल असे वाटतेय. पण Catcher in the Rye वाचलेली आणि आवडणारी कोणी स्त्री आहे का Wink मला जाम बोअर झालं होतं ते पुस्तकं तरी पूर्ण वाचलं.

मी सध्या चौघीजणी वाचत आहे. आवडत आहे.
<<<<हे काय चार बहिणी चादर शिवतात, मोजे विणतात यावर 10 पानं खर्ची घातली आहेत.>>>> Lol

Catcher in the Rye >>
मराठीत मैलाचा दगड असलेल्या कोसला कादंबरी वर ह्या पुस्तकाचा प्रभाव आहे
असं म्हणतात. इंग्रजी वाचल नाहीये पण कोसला भारीये..
बाय द वे चौघीजणी शाळेत असताना वाचलेलं.. मस्त अनुभव होता
शांत शेळकेंनी अनुवादपण सुंदर केलाय

मी मूळ पुस्तक घेऊन ठेवलंय, वाचलं नाहीए अजून. >>>. भरत, वेळ झाला की नक्की वाचा. फार सुंदर पुस्तक आहे. माझं मराठी फार उच्च नाही, पण तरीही भाषांतर करताना शब्दशः केलं आहे असं वाटत होतं आणि त्यामुळे वाक्यरचना थोडी टोचत होती.

चौघीजणी निःसंशय सुंदर पुस्तक आणि उत्कृष्ट अनुवाद आहे.

चिनूक्स, मी ताजं उदाहरण माझ्या दृष्टीने म्हणाले कारण मी भाषांतरित पुस्तक मागच्याच महिन्यात वाचलं.

> मराठीत मैलाचा दगड असलेल्या कोसला कादंबरी वर ह्या पुस्तकाचा प्रभाव आहे
असं म्हणतात. इंग्रजी वाचल नाहीये पण कोसला भारीये. > अरे हो की कोसला विसरलेच होते. बरं मग कोसला आवडणारी कोणी स्त्री आहे का? असतील बहुतेक...

{कायदेशीर हक्क मिळवून झाले आहेत हे सगळे अनुवाद? विकत घेऊन वाचली जातात ही अनुवादीत पुस्तक? कोण वाचतं? याचे मार्केट, व्यवसाय गणित कसे चालते?}
मेहता प्रकाशन अधिक करून भाषांतरित पुस्तकंच छापतं असं वाटू लागलंय.
लायब्ररीत मूळ मराठीपेक्षख भाषांतरित काद़ंबऱ्यांची थप्पी मोठी दिसते

मेहता प्रकाशन अधिक करून भाषांतरित पुस्तकंच छापतं असं वाटू लागलंय.
लायब्ररीत मूळ मराठीपेक्षख भाषांतरित काद़ंबऱ्यांची थप्पी मोठी दिसते>>>>

गेल्या 8 10 महिन्यात माझ्या लायब्ररीत मेहता प्रकाशनाच्या भाषांतरित पुस्तकांचा इतका मोठा स्टॉक आलाय की दुसरी पुस्तके दिसतच नाहीत. आणि बहुतेक भाषांतरे दोन पानात बाजूला ठेवावीशी वाटतात इतकी भयंकर पद्धतीने भाषांतरित केलेली आढळतात.

याचं कारणही तेच.इंपोर्टेड मालात नेहमीच जास्त चांगला कंटेंट आहे असं वाटून त्याला/त्याच्या इंडिया प्रोडक्शन ला चांगला भाव.त्यामुळे मेहता प्लेइंग सेफ गेम.

हम्म. मेहता पब्लिकेशन बहुतेक कायदेशीर परवानगी घेत असेल.
हॅरी पॉटर पुस्तकांचा कॉपीराईटबद्दल घोळ झालेला आठवतोय. अनुवादकाचे नाव विसरले ते कोण ते ज्यांची मअंजावर टर उडवतात 'फार मोलाची माहिती दिलीत सर' म्हणत. त्यांच्या भावाची प्रिंटिंग प्रेस होती...

मूळ लेखकाला किती पैसे मिळतात आणि अनुवाद करणाऱ्याला किती एक कॉपी विकली गेली तर?

किंमतीत किती फरक असतो मूळ इंग्रजी पुस्तकाच्या आणि मराठी अनुवादाच्या?

<मराठीत दुर्देवाने अश्या प्रकारच्या कादंबऱ्या नाहीत>
असायला पाहीजेत पण .....
कल्पनाविलास हा शद्ब इंग्रजीसाठी एक साहित्य प्रकार आहे ,
ज्या ठिकाणी फक्त 115 मिलियन लोकांची इंग्रजी ही मातृभाषा आहे उलट 83 मिलियन लोक हे मराठी मातृभाषा असणारे आहेत यामध्ये फार फरक नाही पण आपल्याकडे हा एक केवळ शब्द आहे साहित्यप्रकार नाही

चौघीजणी मी शाळेत असताना वाचलं नव्हतं. नंतर अ‍ॅडल्ट वयात वाचताना मलाही फारच बोर झालं. भावानुवाद असता तर आवडलं असतं असं वाटतं. बिलिव्हेबल मराठी वाटणारी कॅरेक्टर्स घेऊन.

चौघीजणी बोअर झालं. मूळ Little Women वाचलेलं असल्याने भाषांतर फारसं आवडलं नाही. पण त्यातल्या कवितांचं भाषांतर शांताबाईंनी खूप सुरेख केलं आहे, त्या stand alone कविता म्हणून वाचायलाही मजा येते.
शांताबाईंनीच Anthony Hope च्या Prisoner of Zenda आणि Rupert of Hentzau चे मात्र सुरेख रूपांतर केले आहे. त्यातल्या पात्रांना भारतीय साज चढवला आहे आणि बोली भाषा एकदम छान जमली आहे. मूळ पुस्तकं वाचली असली तरी ही रुपांतरे वाचायलाही मजा आली. पहिल्या पुस्तकाचे मराठी नाव आठवत नाही, बहुतेक 'कैद्याची कहाणी' असं काही तरी असावं, दुसरे पुस्तक 'गाठ पडली ठका ठका'. आता ही मिळायला तशी दुर्लभ झाली असावीत पण कधी कुठे मिळाली तर जरूर वाचा.

पण मराठीतच का नाही कुणि लिहीत असल्या गोष्टी?
जयंत नारळीकरांनी लिहिल्या आहेत अश्या गोष्टी. मायबोलीवर सुद्धा एकजण (बहुधा अ‍ॅस्ट्रोनॉट कुणितरी) लिहितात अधून मधून.

मला कोसला आणि चौघीजणी दोन्ही आवडतात.
दोन्ही वाचून य वर्षं लोटली, लायब्रीत मागितली तर सदासर्वदा वेटिंगच स्टेटस. आता सहज मिळाली तरच वाचणार.

कोसला व चौघीजणी दोन्ही आवडले होते पण लहान वयात वाचलं त्यामुळे कोसला फार काय कळलं नव्हतं.

बाकी भावानुवाद म्हटलं की चिराबाजारात बर्फ आणि डुकराच्या मांसाची भजी हेच आठवतं.

द गुड अर्थ या पर्ल बकच्या कादंबरीचा ' काळी' हा उत्कृष्ट मराठी अनुवाद आहे. भारती पांडे यांनी केलाय. मी मूळ इंग्रजी कादंबरी खूप नंतर वाचली.
इंदिरा गांधींच्या पुपुल जयकरांनी लिहिलेल्या चरित्राचा अशोक जैनांनी केलेला अनुवादही मला आवडला होता. मूळ पुस्तक मी नाही वाचलेलं.
गॉडफादर हे मूळ पुस्तक वाचल्यावर अनुवाद सपक आणि गुळमुळीत वाटला Happy
नॉट विदाऊट माय डॉटर अनुवाद छान आहे. अर्थात मूळ पुस्तक वाचलं नाहीये.
प्राइड ॲन्ड प्रेजुडिसचा मराठी अनुवाद ( ताराबाई शाळिग्राम) भयंकर कृत्रिम आहे. मूळ नाही वाचली.
चौघीजणी मस्तच वाटलं होतं.
एका कोळियाने हा अनुवाद खूप जणांना आवडत नाही. मला आता खरं तर आठवत नाही कसा वाटला होता ते. पण अगदी आवडला नव्हता असं नसावं. मूळ पुस्तक ' द ओल्ड मॅन ॲन्ड द सी' ग्रेटच आहे. ते मी बहुतेक आधी वाचलं आणि नंतर अनुवाद वाचला.

कन्नडमधून उमा कुलकर्णींनी मराठीत अनुवाद केलेली भैरप्पांची बरीच पुस्तकं वाचली आहेत. ती आवडली.पूर्णचंद्र तेजस्वींची २ वाचली. ती मात्र जरा कृत्रिम वाटली. ' कार्वालो' वाचून तर अगदीच निराशा झाली.

जे वाचक मूळ पुस्तक वाचण्याची फार शक्यता नाही, त्यांनाही त्या पुस्तकाचा आनंद घेता यावा आणि पुढेमागे त्यातल्या काही वाचकांनी तरी मूळ पुस्तकाकडे किंवा त्या लेखकाच्या इतर पुस्तकांकडे वळावं इतपत तरी रस त्यांना निर्माण व्हावा यासाठी अनुवाद महत्त्वाचे असतात असं मला वाटतं.

भरपूर अभ्यास आहे अनुवादांचा तुझा.
गॉडफादर इंग्लिश मध्ये असलं सणसणीत आहे की डायरेक्ट भाषांतर केल्यास मराठी लेखकावर खटला लागू शकतो.त्यामुळे मराठी अनुवाद नेवाळे मिसळ चा बेडेकर मिसळ केलाय ☺️☺️

अनु Lol
नेवाळे मिसळ कोल्हापुरातली फेमस आहे का?
शनिवारी दुपारी विविधभारतीवर शेरलॉक होम्सच्या एका कथेचं हिंदी नाट्यरूपांतरण ऐकलं. बदकाच्या गळ्यात हिरा लपवलेला असतो ती कथा. मस्त होतं रूपांतर. कृत्रिम वाटलं नाही. मि. होम्स वगैरे संबोधनं हिंदीत ऐकताना खटकत नव्हती. ( मी रोज दुपारी विविधभारती ऐकत नाही. Wink कारमध्ये सहज रेडिओ लावला आणि हे ऐकायला मिळालं )

कन्नडमधून उमा कुलकर्णींनी मराठीत अनुवाद केलेली भैरप्पांची बरीच पुस्तकं वाचली आहेत. >>>. हो, अगदी छान अनुवाद आहेत.

जे वाचक मूळ पुस्तक वाचण्याची फार शक्यता नाही, त्यांनाही त्या पुस्तकाचा आनंद घेता यावा आणि पुढेमागे त्यातल्या काही वाचकांनी तरी मूळ पुस्तकाकडे किंवा त्या लेखकाच्या इतर पुस्तकांकडे वळावं इतपत तरी रस त्यांना निर्माण व्हावा यासाठी अनुवाद महत्त्वाचे असतात असं मला वाटतं. >>>>> हो नक्कीच. मी सुद्धा वंशवृक्ष वाचल्यावर, Dr S L भैरप्पाची बाकी पुस्तकं शोधून वाचली. तो काळ, तेव्हाचा समाज वेगळा होता, त्यामुळे कथा पटत नाहीत, पण मग जुन्या कन्नड संस्कृती आणि तेव्हाच्या काळातील घटना गोष्टी वाचण्यात मजाही येते.

Pages