Submitted by पुरंदरे शशांक on 24 January, 2019 - 09:57
मायबाप देहूमाजी
मायबाप देहूमाजी
राहतसे निश्चळसा
ढुशा तान्हेल्याच्या साहे
सोडी पान्हा अमृतसा
गाथेमाजी फावतसे
निर्मळसा कवडसा
अंतरात अवचित
प्रेमकोंब लसलसा
इंद्रायणी डोहामधे
संथपाणी काळेशार
येई अविरत कानी
गोड वीणेचा झंकार
गगनात निळ्याशार
बिंब उमटे का त्याचे
अनंतशा अवकाशा
पिसे लागले तुक्याचे
पिसे....वेड
......शशांक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गगनात निळ्याशार
गगनात निळ्याशार
बिंब उमटे का त्याचे
अनंतशा अवकाशा
पिसे लागले तुक्याचे
अतिशय सुंदर....
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
आम्हाला का सुचत नाही असं काही छानसं?
सुंदरच
सुंदरच
विठ्ठल विठ्ठल ......
मायबापा झालो वेडे पिसे....
__/\__ !
__/\__ !
निर्गुणाच्या वैकुंठात
तुका सदेह पोचला
सावलीत सगुणाच्या
भक्तिवृृृक्ष फळा आला
खुप छान !
खुप छान !
प्रेमकोंब लसलसा , लसालसा म्हणजे ??
प्रेमकोंब इवलासा पाहीजे होते का??
वा...खूप सुंदर...मनाला खूप
वा...खूप सुंदर...मनाला खूप शांत आणि प्रसन्न करणारी कविता.
...खूप सुंदर...मनाला खूप शांत
...खूप सुंदर...मनाला खूप शांत आणि प्रसन्न करणारी कविता. >>> +१
सुंदर!
सुंदर!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
@ मुक्तेश्वर कुलकर्णी
@ मुक्तेश्वर कुलकर्णी
प्रेमकोंब लसलसा , लसालसा म्हणजे ?? >> लसलसणारा प्रेमकोंब.
सर्व जाणकार रसिकांना मनापासून धन्यवाद..
____/\____