देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल
दे ना रे मजला
मी कि नई छान छान खायला
करून घालेन तुजला
कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार
कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या
कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून
लुटेल , हो फक्त लुटेल
ते सूर्यनारायणाचे ऊन
तू काया बनवलीस
सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस
खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट
तरी बी सारे शोधत बसलेत
कुठं लागतोय का ते जॅकपॉट ?
झाड बघा ना, कुठंच जात नाही
तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं
मलाही आवडेल तसं राहायला
काहीही नको ,
हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला
मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला
स्वतःच हाताने ते मी बायकोला वाढेन
आणि बदल्यात अजून थोडी मुलेबाळे काढेन
पिलावळ वाढली तरी फरक काय पडतोय
साऱ्यांचं जेवण तर मीच तयार करतोय
पगार नको कि गाडी नको
फुक्कट फालतू चढाओढी नको
किरणावरती किरण शोषित जाईन
मस्तपैकी जेवण सर्व्ह करत जाईन
त्यासाठीच अंगात क्लोरोफिल लागेल
ते असलं तरंच हे कोडं सुटेल
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}