घासावी भांडी... तासावे मन
एकदा एका कार्यशाळेअंतर्गत एक प्रश्नावली देण्यात आली होती.प्रश्न होता खूपच राग आला असेल तर राग शांत होण्यासाठी काय करता?फारसा विचार न करता माझं उत्तर तयार होत ते म्हणजे भांडी घासते.त्यावेळी पडली नसतील तर तांब्या पितळेची भांडी घेते घासायला(आश्चर्य वाटलं काय,पण हे खरंच खर आहे)हा काही माझा लक्षवेधी उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीचं न्हवता .स्वयंपाक घरातील माझं सर्वात आवडीचं काम भांडी घासणे हेच आहे. शिवाय घरात कितीही भांडी पडली तरी माझ्या अस्तित्वाने मम्मी ला (आणि भांड्यानाही)आश्वस्त वाटत असत त्याचा वेगळाच आनंद मिळत असतो.खरंतर भांडी घासणे हि एक मैफिलच असते.खूप भांडी पडली, कमी भांडी पडली हा विचार तिथे गौणच असतो.भांडी घासताना पाळायचा सर्वसामान्य नियम म्हणजे चिल्लीपिल्ली आधी म्हणजे छोटे मोठे चमचे,पक्कड,प्लेट्स,छोटे डबे हि छोटी छोटी भांडी एकाच चोथ्याच्या रट्यात घासून घ्यायची ती संख्येने हि अधिक असतात त्यामुळे ती पटकन घासून झाली कि अर्धी भांडी घासल्याच समाधान मिळत ते वेगळंच. मग मोठया प्लेट्स,ताटे,छोटी पातेली यांच्याकडे मोर्चा वळवायचा विमबारच्या जाहिरातीत दाखवतात तसे एकदाच हाथ फिरवला कि अशी भांडी निघतात(खरंच...माझ्यावर विश्वास ठेवा)कारण ही भांडी पदार्थ बनवताना आपल्या जागी आराम करीत असतात. पदार्थ पदरात पाडून घेणे हा पुढचा रोल त्यांच्या वाट्याला येत असल्याने पदार्थाचा गुणधर्म त्यांच्यात फारसा काही उतरत नाही. हो मात्र जेवून फारवेळ ताट तशी राहिली कि ताटेही पातेल्यासारखी जिद्दी होतात. माझा भाऊ मधूनच येऊन वाढून घेऊ लागला की, मी लगेच जेवून झालं की ताट भिजवून ठेव! अशी आगाऊ सूचना देऊन ठेवते.त्यावर ,माझं पोरगं आता आलंय आधी जेऊदे कि कार्टे! असा मम्मीचा त्याच्यासाठी बचावात्मक पवित्रा तयारच असतो.असो..ताटे, भाजी काढून ठेवण्यासाठी वापरलेली छोटी पातेली घासून झाली की प्रत्यक्ष स्वयंपाक कार्यात ज्यांनी गॅस चे चटके सहन केले आहेत त्यांच्याकडे मोर्चा वळवायचा या पातेल्या, कुकर, तव्या सारख्या मोठया भांड्यांबद्दल मला नेहेमीच आदरयुक्त भीती वाटत आली आहे. गॅसच्या सहन केलेल्या चटक्यांचे डाग त्यांच्या अंगोपांगी विसावलेले असतात.शिवाय प्रत्यक्ष पाकक्रियेत यांचा सक्रिय सहभाग असल्याने पदार्थाचे गुणधर्म यांच्या अंगी आपोआप येतात .एखादा पदार्थ जळला असेल तर 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' हि म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते. (गावाकडे असताना चुलीवरच्या अश्या भांड्यांची अवस्था कालांतराने अशी होते की अफ्रिकन जमातीसारखी ती बाहेरून पूर्ण काळ्या वर्णाची होतात आत कोणत्या धातूच भांड आहे हेच ओळखून येत नाही मग ती कालांतराने बाहेरून घासण्याचा नाद सोडून दिला जातो)अशी मोठी भांडी घासण्यासाठी मोठी ताकद हि खर्च करावी लागते.चपातीचा काळा तवा पांढराशुभ्र निघणे हि खुप मोठी Achievement असते.कढई आणली तेंव्हा कशी दिसत होती हे बघायला सुरवातीलाच तिचा फोटॊ काढून ठेवणे चांगले नंतर संसाराच्या रहाट गाडग्यात तिची त्वचा रापते तिचे कान पकडून पकडून ते तेवढे पूर्वीसारखे राहतात जे लोक भांडी घासतात त्यांना माहित असेल हे.असो..
विमबार साबण व भांडी घासण्यासाठी इतर द्रवरूप प्रकार निघण्यापूर्वी आम्ही चुलीतील राखेने भांडी घासायचो. राखेने भांडी घासणे हा तर माझ्यासाठी एक आनंदसोहळा असायचा . त्यातल्या त्यात शेणकुटे जळुन चुलीत उरलेली राख भांड्यासाठी सर्वोत्तम(हे माझे अनुभवाचे बोल आहेत बरं का!)लाकूड जाळून बनलेली राख भांडी घासताना आवश्यक असणारा ग्रीप नाही द्यायची.ती छोट्या छोटया भांड्यांना योग्य असायची ,शेणकुटाची राख थोडी चाळून त्यात थोडा निरमा (हा तो तो वॉशिंग पावडर निरमा वाला निरमा) घातला कि भांडी घासायची साग्रसंगीत तयारी पूर्ण व्हायची.मी त्या राखेत किती निरमा घालतेय या कडे मम्मी च कटाक्षाने लक्ष असायचं चिमूट च्या जागी बचाकभर निरमा घातला कि भांडी धुताना मिळणार फेसाळता आनंद पाणी हमखास वाया घालवायचा त्यामुळे चिमट म्हणजे चिमटच निघतात त्यानेहि तेलकट भांडी जरा जोर दे म्हणत मम्मी निरम्याची बरणी आत घेऊन जायची.
अलीकडे बाहेर शॉपिंग ला गेले की जनता किंवा ग्राहक बाजारात भांडी घासण्यासाठी जे काही नवीन पर्याय उपलब्ध होतात ते सगळे वापरून बघते. आमच्या घराच्या वास्तूशांती कार्यक्रमासाठी मी पहिली खरेदी भांडी घासण्यासाठी लिक्विड आणि चोथ्यांची केली होती. भांडी घासणाऱ्या बायकांना वस्तूंचे वाटप, पाणी , भांडी घासण्याची योग्य जागा याचे नियोजन मी जातीने केले होते. मध्ये मध्ये त्यांना चहा ,नाष्टा अशी बडदास्त ठेवल्याने त्यांनी निर्मळ मनाने निर्मळ भांडी घासली होती पंगतीतील कुणीही ताट वाटी बद्दल अनुद्गार काढले नाही सगळेच प्रसन्न मनाने जेवले होते हि, रुचकर पदार्थांबरोबर स्वच्छ भांड्यांचीही किमया होती. यात काही शंकाच नाही.
खरतर स्वयंपाक,भांडी घासणे,कपडे धुणे हि केवळ बायकांनी करायची कामे नाहीतच मुळी. मला तर भांडी घासताना घासायच्या भांड्यांचं आकारमानानुसार आणि वापरावयाच्या शक्ती नुसार त्यांचे वाटप करावेसे वाटते. चिल्ली पिल्ली भांडी घरातील चिल्ली पिल्ली घासतील त्यांच्या साठी अंघोळीला जॉन्सन बेबी साबण काय निघतो,छोटुकला डव काय निघतो त्याच प्रमाणे त्यांच्या साठी छोटुकला विमबार साबण निघायला काहीच हरकत नाही.त्याच बरोबर छोटासा चोथा पण निघेल.'तुमच्या मुलांनाही शिकवा भांडी घासणे म्हणजे काय असते' या किंवा अश्या Slogan खाली अश्या साबणांची जाहिरात हि करता येईल. लहान मुले अंगावर डाग पाडून घेऊ 'दाग अच्छे है' असं म्हणतात तर मग भांड्यांवरील डाग काढल्यावर 'हमारे बच्चे अच्छे है' असही त्यांच्या पालकांना अभिमानाने म्हणता येईल. मध्यम आकाराची ताटे,छोटी पातेली,डबे घरातील बायका घासतील आणि मोठी पातेली,मोठया कळश्या, पराती, घमेली आणि इतर मोठी मोठी भांडी घरातील पुरुष मंडळी घासतील कारण तिथे जास्त ताकद वापरावी लागते.खरंच असा ठराव एखाद्या हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशनात मान्य करून घेण्यास काहीच हरकत नसावी.
घरातील काचेच्या वस्तूं घासताना मात्र त्यांची बडदास्त VVIP सारखीच ठेवणं क्रमप्राप्त असते.त्यांना special ट्रीटमेंट देण्यात आली नाही तर ते जखमी होऊन त्यांना कायमचं अपंगत्व आलं तर आपलीही काही खैर नसते. मग कान तुटलेला कप येईल उपयोगात मी त्यात रोप लावेन,त्याच शोपिस बनवेन म्हणत केलेली सारवासारव आणि एका कडेला सरकावलेला तो कप कित्येक दिवस अंगाला भस्म लावल्यासारखा अंगोपांगी धूळ माखून संन्यास घेत असतो.टवके उडणे हा असाच छोट्याश्या जखमेचा प्रकार असतो. अशी बशी पाहुण्यांना चुकून दिली गेली तर घरातील अब्रू(ते नेमकं काय असत बुवा)वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे असं आमच्या मम्मीचा ठाम समज आहे. मग 'एक टवका....अनेक टवके' करीत ती बशी देखील कपाच्या लाइन ला जाऊन बसते. अस एक एक करीत इमानी इतबारीने(हे काय असतं)सेवा करण्यासाठी एकदम आलेले सहाजण व सहाजनीची ताटातूट होते.(ये कहा आ गये हम ....यू हि साथ साथ चलते... हे गाणं म्हणत असतील काय ते मनात) एखादाच किंवा एखादीच त्यातील उदंड आयुष्य लाभलेले असतात पण त्यांना काळानुरूप मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडत असतो घरात आधुनिक अश्या त्यांच्या पुढच्या पिढीचं आगमन झालेलं असत.त्यांना मग दुय्यम वागणूक मिळत जाते ती कायमचीच.अडीनडीला बशीला झाकण म्हणूनही भूमिका पार पाडावी लागते.येता जाता त्यांचा उद्धार होतो तो वेगळाच.काही तात्पुरतं ठेवायला तो फुटका कप घे नायतर ती टवके उडालेली बशी घे चांगल्या मात्र करू नको म्हणत त्यांना अतिरिक्त व जॉब चार्ट च्या बाहेरची पण कामे दिली जातात.४ गेले २ राहिले त्यातला एक कानतुटका कश्याला ठेवालस त्याला टाकून दे म्हंटल कि माझा जीव तीळ तीळ तुटतो(म्हणजे कसा)अगदी घरात आले तेंव्हापासून मीच तर त्यांना घासून धुऊन निथळत ठेवत होते ना...अस म्हंटल कि मम्मी ची माझ्यासाठी एक म्हण तयारच असते ती म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर कारण ह्या कप बश्या(एक बशी अनेक बश्या कि मग बशीच....?) मीच फोडल्या आहेत असा तिचा ठाम समज असतो(आणि माझाही)यातही माझे विचार सध्या उत्क्रांती अवस्थेत पोहचले आहेत. कारण हो! हो! माझ्याकडूनच तुटला या कपाचा कान, चुकून तुटला मुद्दाम नाही तोडला! असा टिळकांचा बाणेदारपणा (मी शेंगा खाल्ल्या नाहीत च्या धर्तीवर) माझ्या अंगी आला आहे. लहानपणी माझ्या हातून कपाचा कान तुटला अन्यथा बशी फुटली कि मम्मी च्या दहशतीपुढे मला नामनिराळेपणा धारण केल्याशिवाय काही पर्याय नसायचा. किंवा मग घडलेल्या घटनेचा स्थितीजन्य पुरावा नष्ट करण्यासाठी तुटक्या कपाला उकिरड्यावर फेकत अलविदा म्हंटल जायचं. कधी कधी आपल्या घरात नेमके चांगल्या अवस्थेतील किती कप शिल्लक होते हेच मम्मी च्या लक्षात यायचं नाही पण शिल्लक कप आणि उपस्थित पाहुण्यांची संख्या यांच प्रमाण व्यस्त झालं की चौथा कप कधी फोडलास? असा प्रश्नाचा तीर माझ्या रोखाने सुटायचा, मी साळसूद चेहेरा करून तिसरा मी फोडला होता चौथा नाही ! असं विनम्रपणे सांगायचा प्रयत्न करायचे. 'घरात तुझ्याशिवाय धांदरट कुणी नाही तूच फोडला असणार' असा पाहुण्यांदेखतच माझा उद्धार व्हायचा.आता मात्र खिशात चार पैसे खुळखुळायला लागल्यापासून मी कप फोडला मीच तर विकत आणला होता असंही मी कबूल करायला कमी करत नाही.
माझी घरी सांगकाम्या आणि हो नाम्या,हरकाम्या अशी नामकरण सोहळ्या व्यतिरिक्त ठेवलेली नावे माझी भांडी घासण्याची आवड अधोरेखित करतात.लहानपणापासून आमची तायडी , मम्मी गावाला निघाली कि मी घरातील सगळी कामे करेन राजू भांडी घासेल अशी दोन शब्दात माझी जबाबदारी मला देऊन टाकायची. त्यामुळे घरातील कामांच्या वाटणीमुळेच असेल बहुदा मला घरात एक 'लिंबू टिम्बु ' व्यक्तिमत्व म्हणूनच वावरावे लागते.एखाद्या गोष्टीचा राग आला की रडणे,आदळआपट याच्या पार गेल्यामुळे मी जरा जास्त जोर देऊन भांडी घासून काढते भांडीही निर्मळ होतात आणि मनही!
थोडक्यात काय भांडी घासणे हि एक कलाच आहे.यात समयसूचकता(वेळेत भांडी घासली नाही की मग लवकर निघत नाहीत)आहे,वर्गीकरण आहे, सहनशीलता आहे , कष्ट आहेत ,सातत्य आहे, काटकसरीने पाणी वापरण्याची शिकवण आहे आणि मनाचीही मशागत आहे. तुकाराम महाराजांनी शब्द वापरण्याबद्दल जी रचना करून ठेवली आहे त्याच्याच संदर्भाने तुकाराम महाराजांची क्षमा मागून म्हणावेसे वाटते
घासावी भांडी।तासावे मन।
आणि साक्ष्यात तुकाराम महाराजांनी जरी माझे भांडी घासण्याबद्दलचे हे विचार वाचले असते तर म्हणाले असते keep it up राजश्री ! ! !
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
घासावी भांडी तासावे मन
Submitted by राजेश्री on 19 January, 2019 - 22:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त! मस्त!!
मस्त! मस्त!!
झकास लिहिलय! मलाही आवडतात भांडी घासायला.
मस्त! मस्त!!
मस्त! मस्त!!
झकास लिहिलय! मलाही आवडतात भांडी घासायला. Happy>>>>>>>>धन्यवाद
मस्त लिहीलय. अगदी अगदी अस
मस्त लिहीलय. अगदी अगदी अस होत होतं मनात वाचताना.
माझं पण फेव्हरेट काम ...भांडी घासणे ... कामवाल्या बाईला मी कशासाठी ठेवलं आहे हा सवाल असतो घरच्यांचा कारण मीच घासून टाकते जवळ जवळ सगळी भांडी. सिंक मध्ये भांडं दिसलं की शिवशिवताच हात माझे ... काय करू ?
झक्कास लिहिलंय!
झक्कास लिहिलंय!
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहता मन डिस्टरब असताना, रिपितेटिव्ह क्रिया केल्याने आपली लय परत मिळते असे म्हणतात
या रिपितेटिव्ह कामा मध्ये भांडी घासणे, कपड्यांच्या घड्या, इस्त्री, चालणे, पोहोणे, धावणे अशी कोणतीही कामे येऊ शकतात.
झक्कास लिहिलंय ! सिम्बा +१११
झक्कास लिहिलंय !
सिम्बा +१११
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
सगळी भांडी मी कधीकधीच घसतो. चकचकीत घासून, पुसून लावून ठेवली की चांगलं वाटतं.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मलाही आवडतात भांडी घासायला. घासून झाली की असं एक समाधान मिळतं. पूर्वी जेव्हा वॉशिंग मशीन नसायची तेव्हा कामवाली बाई नाही आली तर कामाच्या वाटणीत मी कपड्यांऐवजी भांडी निवडायचे
याचं कारण असं असणार, की भांडी स्वच्छ झालेली डोळ्यांना लगेच दिसतात. कष्टाचं चीज झाल्यासारखं लगेच वाटतं आणि म्हणून समाधान मिळतं
अर्धच वाचले ... भांडी
अर्धच वाचले ... भांडी घासण्यावरचा लेख.... मला झेपलाच नाही.
मला कुठलेच घरकाम करायला आवडत नाही म्हणून असावे कदाचित,
अन म्हणून जे लोक हे काम आवडीने करतात त्यांना माझा _/\_
अन म्हणून जे लोक हे काम
अन म्हणून जे लोक हे काम आवडीने करतात त्यांना माझा _/\_>>>>>> आज कामवाली आली नाही.तेव्हा भांडी घासताना हा लेख आठवला. _/\_
मला फारशी पुसायला आवडते.
मला फारशी पुसायला आवडते.(झाडायला अजिबात आवडत नाही.)
भांडी घासणं पण ओके आहे.खरकटे अन्न ताटात टाकलेले बरेच असेल तर बोअर होते. ऑफिस कँटीन ला ताट देताना पण खरकटं कमीत कमी असेल, वाटीत काढून ठेवलेलं असेल ही काळजी घेते.
टेबल घाण करून, खूप अन्न नासुन, चटण्या वाईट प्रकारे त्यात आणि काहीतरी अन्न पाडून थोड्या संपवून चटणी वाटी बरबटलेले करणाऱयांचा वैताग येतो.अश्या सर्व पब्लिक ने कोणत्या तरी गुरुद्वारा किंवा मंदिरात (किंवा लग्न पंगतीत) ताटे घासण्याचे काम 1 महिना करावे असे वाटते.
भांडी घासायला आवडतात असे नाही
भांडी घासायला आवडतात असे नाही, पण सिंक मोकळे , स्वच्छ करण्याची सवयच आहे.
छान लिहीलेस राजश्री !
खूप छान ! अशी कामे करणे आणि
खूप छान ! अशी कामे करणे आणि त्याही पेक्षा ती करण्याचा आनंद घेणे हे कौटुंबिक जीवनात आनंदाने रमले असण्याचे द्योतक असते. तुमची निरिक्षणे आणि त्या अनुशंगाने केलेली टिप्पंण्णी अतिशय रोचक झालेली आहे.
मला भांडी घासणे आणि कपडे धुणे ही कामे उन्हाळ्यातच आनंददायी वाटतात.
स्वच्छ विसळून सुबकपणे ओट्यावर पालथी घातलेली भांडी पाहून खरच एखादे सुंदर रेखाटलेले चित्र पाहिल्याचा आनंद मिळतो !
जमलं तर पूर्ण वाच VB. खूप छान
जमलं तर पूर्ण वाच VB. खूप छान नाही पण बरा आहे. मीपण 'भांडी घासण्यावर काय लेख लिहायचा eyeroll' म्हणतच लेख उघडला.
मलापण कुठलेच घरकाम करायला आवडत नाही पण त्यातल्यात्यात भांडी घासणे-कपडे धुणे बरी कामं वाटतात.
भांडी घासणे हे माझेदेखिल
भांडी घासणे हे माझेदेखिल आवडते काम आहे. रूमवर चिकन वगैरे करणार असतील तर चिरणे- कापणे व बल्लवगिरी ही कामे खुशाल दुसऱ्यांना घेऊ देतो. जेवण झाल्यावर आरामात भांडी घासून टाकतो.
कपाचे कान, टवके छान लिहिले
कपाचे कान, टवके छान लिहिले आहे.
भांडी घासायला आवडतात असे नाही, पण सिंक मोकळे , स्वच्छ करण्याची सवयच आहे. >>+१
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
भांडी घासणं आणि ओटा आवरणं हे
भांडी घासणं आणि ओटा आवरणं हे अतिशयच माझं कंटाळवाणं काम आहे. पण मध्ये काही कारणाने, बाई आणि घरचा भांडी घासणारा माणूस( ;)). दोन्ही गायब होते तर बर्याच वर्षानी , मी भांडी घासायचे काम केले काही दिवस. दुसरी कामवाली बाई खुपच भाव खात होती तर म्हटले मरो...
कंटाळा यायचा पण एकदा घासायला लागले की, उगाच बरे वाटायचे. आणि मनात यायचे, एवढे काही कठिण नाही.
पण तो उत्साह तेवढेच दिवस होता. म्हणजे अजुनही, जीवावार येतेच पण जितका. तिटकारा वाटायचा तो कमी झालाय.
मला कोणी विचारले की राग आला
मला कोणी विचारले की राग आला तर काय कराल? मी मस्त बाहेर जाईन जेवेन.
माझं भांडी घासणं अगदी शिश्तीत असतं. आधी मी विभागणी करते. सिंक घासते. उष्टी भांडी कधीच ठेवत नाही. घासेपर्यंत विसळुन ठेवतो. चमचे एकत्र , ताटं एकत्र मग पातेलं असे केले की पटपट घासायला बरे.
झंपी +१ मी ही असंच करते
झंपी +१
मी ही असंच करते
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा
खूप आवडले.
खूप आवडले.