ह्या चित्रपटाचं परीक्षण मी खूप दिवसांपूर्वी लिहिणार होतो, पण अशा चित्रपटाचं परीक्षण करताना कुठेही आपला राजकीय कल त्यावर प्रभाव टाकणार नाही, हे मोठं जिकिरीचं काम होत. राजकीय भाष्य टाळून परीक्षण करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे परीक्षण तुटक वाटू शकतं.
प्रत्येक चित्रपटाची एक USP असते, ती एका विशिष्ट वर्गाला भावते, मग तो क्लास असो वा मास. या चित्रपटाच्या ट्रेलर ने एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अध्यक्षानी भारताच्या सर्वात प्रभावशाली पदाची केलेली हेटाळणी ठळक जाणवेल, अशा रीतीने दाखवली होती. हाच या चित्रपटाचा USP होता. त्यावरून बरंच वादंग वगैरे उठेल आणि त्याचा फायदा चित्रपटाला होईल, असा निर्माता-दिग्दर्शक यांचा होरा होता, पण...
...लेखणी खूप टोकदार असते, आणि चित्रपटाचा पडदा सपाट, हे या चित्रपटाने दाखवून दिलं.
the accidental prime minister मीसुद्धा वाचलंय, आणि त्यातील बारु यांची मते खरी की खोटी, चांगली की वाईट, यावर मी भाष्य करणार नाही, पण पुस्तकाचं चित्ररूपांतर करतांना चित्रपट अक्षरशः उघडा पडतो.
या चित्रपटात मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यापासून, ते २०१४ साली पद सोडण्यापर्यंत कालावधी दाखवला आहे. संजय बारू हे 2004 ते 2008 पर्यंत त्यांचे मीडिया सल्लागार होते, आणि त्यांनीच हे पुस्तक लिहिल. त्यात ते सत्ताबाह्य शक्तिकेंद्राकडे कसे शरणागत होते, आणि स्वतः स्वच्छ असूनही, कसे ते कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवले गेले, याचं चित्रण पुस्तकात केलंय.
मात्र पुस्तकात जी एक मनमोहन सिंग नावाची एक अगतिक, हताश पण एक खरी, दृढनिश्चयी आणि विचारी व्यक्तिरेखा होती, त्यालाच हा चित्रपट हरताळ फासतो.
चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं, तर ती सगळ्याना माहितीये, त्यामुळे जास्त खोलात शिरत नाही, पण पटकथा? अत्यन्त सपाट पटकथा, एकांगी राजकीय डायलॉग, यावरच सगळी पटकथा निभावून गेलीये. या पटकथेत काहीही ठोस नाहीये, ना एक दृश्याच दुसऱ्या दृष्याशी जोडणारं नरेशन, ना कुठलीही व्यक्तिरेखा व तिची विचारधारा स्पष्ट करणाऱ्या ओळी. तर, माती खाल्ली, पूर्णपणे. आणि हो, बराचसा खोटेपणाही भरलाय पटकथाकाराने. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मी दुर्लक्ष केलं.
मुजिक, गरजही नव्हती या चित्रपटाला, आणि जे आहे ते वाईट आहे. यापुढे काहीही बोलणार नाही.
डिरेक्शन च्या बाबतीय मी तर म्हणेल, कमाल केलीये दिगदर्शकाने. अत्यन्त एकांगी व भडक चित्रीकरण, ढिसाळ एडिटिंग आणि ठिसूळ कॅमेरा अँगल यावरून एका चांगल्या पुस्तकाची पुरेपूर वाट लावण्याची कामगिरी दिसदर्शकाने केलीये. मनमोहन सिंग हे किती कर्तव्यशून्य व बिनकण्याचे होते, हा एकच मोटो दिगदर्शक प्राणापलिकडे जपतो.
आता वळूयात अभिनयाकडे. या चित्रपटात प्रत्येक सहकलाकाराने मला भडक अभिनय करण्याची शेवटची संधी आहे, असं जाणवून अभिनय केलाय का? असं वाटतं. यात चूक पटकथा आणि दिगदर्शक या दोघांची आहे.
अनुपम खेर, हा अभिनेता कधीकधी मुद्दाम मनमोहन सिंग यांच्या शारीरिक लकबी यांची खिल्ली उडवतोय का, असं वाटतं. एक, तो मनमोहन सिंग शोभत नाही. दोन, त्याने शारीरिक हालचाली अक्षरश: व्यन्ग असल्यासारख्या दाखवल्या आहेत. सिरियसली, संताप झाला बघून.
अक्षय खन्ना, ह्या माणसाने कमाल केलीये. पटकथा आणि दिगदर्शन कसंही असलं, तरीही हा माणूस छाप पाडतो. एक कसलेला सल्लागार, छद्मी हास्यबरोबर तो दाखवतो. येस... एवढंच या चित्रपटात बघण्यासारखं आहे.
असो, बघावाच असं नाही. किंबहुना बघितला नाही तर वेळतरी वाचेल असं वाटतं. पण, पुस्तक जरूर वाचा. इट्स वर्थ!
ता.क. (हा रिव्ह्यू राजकीय भाष्य न करता लिहायचा होता, म्हणून बऱ्याचदा एडिट झाल्याने संक्षिप्त झाला. आता यात मी यशस्वी ठरलो का नाही, ते मायबोलीकरच ठरवतील)
तटस्थ परीक्षण आवडले.
तटस्थ परीक्षण आवडले.
चित्रपट अर्थातच बघणार नाही.
धन्यवाद एमी!
धन्यवाद एमी!
(No subject)
नायक २००१चा आहे ना ?
नायक २००१चा आहे ना ?
Sorry अज्ञातवासी,
Sorry अज्ञातवासी,
तुमचे परीक्षण हायजॅक करत नाहीये,
पण जे लिहायचे तुम्ही टाळलेत, ते या रिव्ह्यू मध्ये लिहिलंय
https://divyamarathi.bhaskar.com/news/sujay-shastri-write-about-movie-th...
@सिंबा कुणी काहीही लिहो, पण
@सिंबा कुणी काहीही लिहो, पण मी माझ्या परीक्षणाच्या उद्देशाशी प्रामाणिक राहिलो, याचा मला आनंद आहे.
आणि जोपर्यंत काही गोष्टी स्वहिताला बाधा पोहचवत नाही, त्याविरोधात मत न मांडणं मी श्रेयस्कर ठरवतो, आणि काही गोष्टी पटल्याच नाहीत, तरीही माझी भाषा सौम्यच असते...
आफ्टर ऑल, आय एम अ कॉमन मॅन!!!
https://mtwiki.blogspot.com
https://mtwiki.blogspot.com/2019/01/the-accidental-prime-minister-movie-...
हिट ऑर फ्लॉप ?
नेहमीप्रमाणेच मला तुझ परीक्षण
नेहमीप्रमाणेच मला तुझ परीक्षण आवडलं.
खर सांगायच तर मनमोहनसिंग यांच्याबद्दल माझ काही फारस चांगलं मत नव्हतं. बरं ते रबरस्टँप आहेत हे कोणी सांगायची गरज नव्हती.
न्यूक्लिअर डीलची खेळी तर लाजवाब.
मला मनमोहनसिंग हे व्यक्तिमत्त्व आवडलं, मत बदलून गेलं
साखर स्रमाट रत्नाकर गुट्टे
साखर स्रमाट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाने (DGGI) ही कारवाई केली आहे. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर ५२० कोटी रुपये ITC मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टेवर आहे. सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/sugar-baron-ratnakar-gutte-son...
हे ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर ना ?
Pages