Submitted by स्वाती२ on 29 December, 2018 - 07:43
भारतात किंवा परदेशात विविध प्रकारचे बागकाम /शेतीकामासंबंधी लहान-मोठे अभ्यासक्रम आणि कार्यशाळा होत असतात. काहीवेळा प्रत्यक्ष जाऊन सहभाग घेणे अपेक्षित असते तर काही वेळा ऑनलाईन कोर्स किंवा वेबिनार असे स्वरुप असते. तुम्हाला अशा उपक्रमांबद्दल माहिती असेल तर ती माहिती इतरांना देण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओरेगॉन स्टेट युनिवर्सिटी
ओरेगॉन स्टेट युनिवर्सिटी तर्फे Open Education Resources अंतर्गत इंट्रो टू पर्माकल्चर हा कोर्स ऑनलाईन शिकवला जातो. हा कोर्स फ्री आहे. जगभरातील लोक नोंदणी करु शकतात. एप्रिल २२, २०१९ - मे २०, २०१९ असा कार्यकाळ असलेल्या या अभ्यासक्रमासाठी नोंदणी सध्या सुरु आहे.
Intro to Permaculture
मी हा कोर्स दोन वर्षांपूर्वी केला आणि मला आवडला. या कोर्सचे कंटिन्युअस एज्युकेशन पॉइंट्स , मास्टर गार्डनर उपक्रमातील आवश्यक वार्षिक शैक्षणिक तासांची पूर्तता करण्यासाठीही उपयोगी पडले.
https://university
https://university.upstartfarmers.com/