दिवाळीतील पाडव्याचा दिवस होता. सकाळीच जाऊबाईंच लक्ष किचनच्या खिडकीतून बाहेर गेल आणि त्यांनी आधी मला हाक मारली लवकर ये म्हणून. मी समजले साप, पक्षी काहीतरी आल आहे. जाऊन पहाते तर बदामाच्या सुकलेल्या झाडावर घार बसली होती. ती एकदम शांतपणे उन खात बसली होती पण माझी मात्र कॅमेरा आणण्याची घाई झाली आणि धावत जाऊन कॅमेरा आणला. पण घार शांतपणे इकडे तिकडे पहात उभी होती. घारी बद्दल ती शिकारी पक्षी आहे, जमिनीवर भक्ष दिसल की लगेच खाली येउन उचलून नेते, पायांमध्ये भक्ष उचलून नेते, वार करते अस बरच लहानणापासून मारकुटा पक्षी असच माझ्या डोक्यात घारीबद्दल बसल होत. पण प्रत्यक्ष निरीक्षणात त्या दिवशी मला तो पक्षी शांत वाटला. अर्थात भक्ष त्या त्यांच्या पोटापाण्यासाठी, पिलांसाठी मिळवत असतात जे नैसर्गिकच आहे. ही घार जवळ जवळ अर्धा तास तिथेच बसून होती. इतर पक्षांप्रमाणेच ती माझ्याकडे फोटोग्राफीसाठी आली असावी अस मला वाटल. काही खालून व काही टेरेसवरून काढलेले फोटो:
१) उन घ्याव की शिकार शोधावी
२) आली आली फोटो काढणारी आली. नीट काढ ग फोटो. चांगला उठून दिसला पाहिजे.
३) समोर बघू का?
४) काय ग बाई, काढेल ना ही नीट फोटो, काळजीच वाटते. हिच्या भरवश्यावर इतका वेळ इथे बसून आहे.
५) ह्या अॅन्गल ने काढतेस का?
६) झोपच पूर्ण नाही झाली ग.
७) तुमची चालू आहे बाबा दिवाळी आमच इथे भक्षा वाचून दिवाळ निघत आहे. शहरीकरण केलयत ना आमची भक्ष कमी झाली आहेत.
८) अशी गोंडस दिसते ना मी ?
९) माझी चोच आणि माझे डोळे माझ्या कर्तबगारीचे/शिकारीचे अनमोल अवयव.
१०) ही माझी शत्रूसाठी पोज घे. माझ्या पिलांच्या रक्षणासाठी, माझ्या रक्षणासाठी मला हा अवतार घ्यावाच लागतो.
११) पण ह्या निसर्गापुढे मी नतमस्तच आहे.
१२) निसर्ग देवतेला सलाम
१३) खेकडा, पक्षाच पिलू, सापाच पिलू काहीतरी दिसतय तिथे
१४) माझीही दिवाळी होणार आज.
१५) काढुन झाले ना फोटो?
१६) मी निघाले शिकारीला.
मस्त मस्त..
मस्त मस्त..

मस्त जागूताई
मस्त जागूताई
क्लोजअप मधे एकदम गोंडस दिसतेय
4, 5, 13 खासच. सगळेच फोटो
4, 5, 13 खासच. सगळेच फोटो मस्तच आलेत.
शेवटचाही मस्त आलाय. भारी!
जागूतै, सुन्दर फोटोझ....
जागूतै, सुन्दर फोटोझ....

caption/वर्णन विशेष आवडलं
सुंदर सर्वच प्रकाशचित्रे!
सुंदर सर्वच प्रकाशचित्रे!
अगदी भाव मुद्रेसह टिपलेत आणि तसेच वर्णन केलयं!
सगळेच फोटो मस्तच आलेत.
सगळेच फोटो मस्तच आलेत.
अगदी भाव मुद्रेसह टिपलेत आणि तसेच वर्णन केलयं!>>११११
सगळे फोटो आणि कॅप्शन मस्तच
सगळे फोटो आणि कॅप्शन मस्तच
छान फोटो आहेत !!! मॉडेलिंग
छान फोटो आहेत !!! मॉडेलिंग करणारी घार
जागु धमाल तुझी रनिंग
जागु अगं काय धमाल केलीस
तुझी रनिंग कॉमेंट्री एकदम कडssssक !! फार म्हणजे फार्रच आवडली, आणी घार पण एवढ्या जवळुन बघीतल्याने ती पण लय आवडली.
जागू, नेहमीप्रमाणे झकास!
जागू, नेहमीप्रमाणे झकास!
माझीपन शेजारी आहे हि..
माझीपन शेजारी आहे हि..
नेहमी समोरच्या बिल्डिंगवर येऊन ची ची करत ओरडते.. अन मग नदिवर तर घिरट्या चालुच असते..
माझ्याकडुन एखादा झब्बु देईलच तुला...
मस्त फोटो आणि कॅप्शन्स
मस्त फोटो आणि कॅप्शन्स जागूताई!
ही आमच्याकडची घार
खूप असतात इथे फिरत.
असे फोटो पाहिले आणि वर्णन
असे फोटो पाहिले आणि वर्णन वाचले की मायबोली वर आल्याचे सार्थक होते.
जियो.
लहानपणी घारीने माझ्या
लहानपणी घारीने माझ्या डोक्यावर पंजा मारला होता तेंव्हापासून प्रचंड घाबरतो मी घारीला.
पहिल्यांदाच इतक्या जवळून
पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिली घार कशी दिसते.
मस्त कॅप्शन्स आणि फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो.
झकास फोटोज, किती रुबाबदार आहे
झकास फोटोज, किती रुबाबदार आहे हा पक्षी, अगदी रॉयल!!
वावे, मस्त फोटो.
वावे, मस्त फोटो.
(तो घारोबा वाटतोय.
)
डीजे, विनिता, शालीदा, किल्ली,
डीजे, विनिता, शालीदा, किल्ली, कृष्णा, अंजली, स्मिता, गोल्डफिश, रश्मी, रश्मी, टीना, वावे, च्रप्स, अंजली, आसा, वेडोबा मनापासून धन्यवाद.
वावे फोटो छान आहे.
केदार प्रतिसाद खुप आवडला. धन्यवाद.
आणि हा अजून एक
आणि हा अजून एक

या फोटोंमधल्या घारीला भक्ष्य मिळालेलं होतं, बहुतेक उंदीर. सकाळी सकाळी मस्त नाश्ता चालू होता.

गजानन आणि जागूताई धन्यवाद.
तुमच्या फोटोंपुढे माझे फोटो म्हणजे आपले उगाचच! पण होते काढलेले म्हणून टाकले.
वावे मस्त आहेत फोटो.
वावे मस्त आहेत फोटो.
वावे, तुम्ही काढलेली
वावे, तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे देखिल छान आहेत!
ती घार आपण पकडून आणलेल्या भक्षावर अजुन कुणाचा डोळा नाही ना ह्याची खात्री करतेय जणू!
ती वावेला म्हणतेय मला सुखाने
ती वावेला म्हणतेय मला सुखाने खाऊ दे ग. फोटो नंतर काढ.
जागू मस्त आले आहेत फोटो.
जागू मस्त आले आहेत फोटो.
वावे, तुमचेहि फोटो छान आहेत!
मला सुखाने खाऊ दे ग. फोटो
मला सुखाने खाऊ दे ग. फोटो नंतर काढ.>>

जागूताई, कृष्णा आणि सामी, फोटो आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद
मस्त फोटो जागू! तू पक्षी
मस्त फोटो जागू! तू पक्षी-मैत्रिण झालीस की कॉय?
Sundar....
Sundar....
कृष्णा, सामी, वावे, चिमण,
कृष्णा, सामी, वावे, चिमण, दत्तात्रेय साळुंके धन्यवाद.
सुपर्ब सर्वच, जागू.
सुपर्ब सर्वच, जागू.
वावे, सुंदर फोटो सर्वच.