स्वप्नवत्

Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 01:32

जेव्हा मी वाचायला शिकले, जेव्हा मी लिहायला शिकले,अन् मग मलाही वाटू लागले आपल्याला ही असेच लिहायला आले तर, आपलं लिहिणं कुणाला आवडलं तर---
हे स्वप्न त्याच लहानपणी शाळेत असताना साकारले.शिक्षक, शाळेतले विद्यार्थी माझ्या निबंधाचे कौतुक करू लागले अन् मी आs वासून स्वत:च्या आत डोकावू लागले.
हे सारे माझ्यासाठी स्वप्नवत् होते.
तशी स्वप्न झोपल्यावर ( डोळे मिटल्यावर) पडतात सहसा--- बय्राचजणांना स्वप्न पडत नाहीत किंवा आठवतं नाहीत!
काहीजणांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायची सवय असते.(शेखचिल्ली स्वप्न /दिवास्वप्न म्हणा हवी तर)
पण स्वप्न पडतात, पाहिली जातात----
कुणाची स्वप्न असतात,कुणी स्वप्न उराशी बाळगून चालतात,जगतात---
कुणी स्वप्न साकारण्यासाठी झटत राहतात,अगदी आयुष्यभर!!!! मरेपर्यंत!!!!!
कुणाची स्वप्न साकार होतात ही----
तर कुणाची स्वप्न अक्षरशः अर्धवट राहतात.
मग पुन्हा सारें स्वप्नवत वाटू लागते---
कधी कधी तर कुणी स्वप्न पाहणंच सोडून देतात.मग ती पूर्ण करण्यासाठी झटायची गरजच उरत नाही.अशाने एकतर निराशा पसरते वा जीवन जगण्याची मजाच संपते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बापरे
आभारी आहे!
मि.हायझेनबर्ग

छान लिहिलंय...
काहीतरी एकसंध लिहा. छान वाटेल वाचायला.