जेव्हा मी वाचायला शिकले, जेव्हा मी लिहायला शिकले,अन् मग मलाही वाटू लागले आपल्याला ही असेच लिहायला आले तर, आपलं लिहिणं कुणाला आवडलं तर---
हे स्वप्न त्याच लहानपणी शाळेत असताना साकारले.शिक्षक, शाळेतले विद्यार्थी माझ्या निबंधाचे कौतुक करू लागले अन् मी आs वासून स्वत:च्या आत डोकावू लागले.
हे सारे माझ्यासाठी स्वप्नवत् होते.
तशी स्वप्न झोपल्यावर ( डोळे मिटल्यावर) पडतात सहसा--- बय्राचजणांना स्वप्न पडत नाहीत किंवा आठवतं नाहीत!
काहीजणांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायची सवय असते.(शेखचिल्ली स्वप्न /दिवास्वप्न म्हणा हवी तर)
पण स्वप्न पडतात, पाहिली जातात----
कुणाची स्वप्न असतात,कुणी स्वप्न उराशी बाळगून चालतात,जगतात---
कुणी स्वप्न साकारण्यासाठी झटत राहतात,अगदी आयुष्यभर!!!! मरेपर्यंत!!!!!
कुणाची स्वप्न साकार होतात ही----
तर कुणाची स्वप्न अक्षरशः अर्धवट राहतात.
मग पुन्हा सारें स्वप्नवत वाटू लागते---
कधी कधी तर कुणी स्वप्न पाहणंच सोडून देतात.मग ती पूर्ण करण्यासाठी झटायची गरजच उरत नाही.अशाने एकतर निराशा पसरते वा जीवन जगण्याची मजाच संपते.
स्वप्नवत्
Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 01:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आताही तुम्ही लिहिलेलं नक्कीच
आताही तुम्ही लिहिलेलं नक्कीच आवडत आहे.
लिहित रहा.
अरे बापरे
अरे बापरे
आभारी आहे!
मि.हायझेनबर्ग
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
काहीतरी एकसंध लिहा. छान वाटेल वाचायला.
स्वप्ने पाहिल्याने जगण्याची
स्वप्ने पाहिल्याने जगण्याची इच्छा जागृत राहते, फक्त ती दिवास्वप्ने नसावीत.
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.