आरक्षणामुळे अनेक मागास जाती मुख्य प्रवाहात आल्या. शिक्षण आणि नोकरीच्या संधी त्यांना निर्माण झाल्या . काही मूठभर लोकांच्या हाती असलेली मक्तेदारी आरंक्षणामुळे मोडीत निघाली. परंतु अस असलं तरी आजही अनेक जाती या मुख्य प्रवाहात नाहीत. आणि त्यांतील बहुतेकांना आरक्षण आहे. आरक्षण असतानाही त्या जाती आज मागास कशा राहिल्या त्याला जबाबदार कोण..? यावर चर्चा व्हायला हवी. मग आरक्षण असूनही जर जातींचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होणार नसेल तर आरक्षणाची गरज ती काय..?
मराठा, जाट, पटेल या बरोबर अनेक समाज आरक्षणाची मागणी करत आहेत, बहुसंख्य असलेले हे समाज मागास आहेत का याचा अभ्यास सध्या सरकार करत आहे. या समाजांना आरक्षण दिले तर जवळ जवळ 60 % पेक्षा समाज आरक्षण घेऊन बसतो मग राहिलेल्या समाजांना ही आरक्षणाची गरज भासते. आणि कदाचित काही दिवसांनी संपूर्ण भारत आरक्षणात विभागला जाऊ शकतो. मग जातपात विरहित समाज कसा निर्माण होणार..?
विविधता आणि एकता ही भारताची ओळख आपण पुसून तर टाकत नाही ना...?
जेव्हा आपल्या मागासपणा मुळे आपल्याला डावलल जात तेव्हा आरक्षण गरजेचे आहे , त्यामुळे आरक्षणाचा कुठलाही विरोध न करता आरक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून एक शास्वत समाज निर्माण करण्याची वेळ आली आहे का..? या विषयावर आम्ही चर्चा करू इच्छितो..!!!
यात कुठल्याही समाजाला किव्हा ऐतिहासिक व्यक्तिरेखांना विरोध करून आपली मते न मांडता आरक्षणाची आज गरज आहे का आणि असेल तर ते कशा पद्धतीने हवं यावर आपण आपली मते मांडावीत.. ही अपेक्षा...!!
धन्यवाद
सत्यशामबंधु
माझे मत : आरक्षण गरजेचे
माझे मत : आरक्षण गरजेचे होते म्हणून ते निर्माण झाले. पण आज स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानीही जातीवरून आरक्षण गरजेचे असेल तर हा सर्व सरकारांचा व त्यातल्या थोर नेत्यांचा पराभव आहे.
आता एकच करावे: जातीवरून आरक्षण तात्काळ बंद करून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना पूर्ण शिक्षणासाठी स्कॉलरशीप्स द्याव्यात. आणि याची सांगड गुणवत्तेशी घालावी.
अर्थात हे माझे मत असल्याने याला शून्य किंमत आहे. भारतात लवकरच 100 टक्के आरक्षण येणार. इथे प्रत्येकजण मी किती मागास आहे हे सिद्ध करण्यात गुंतलाय. कुणीही नेता असे म्हणत नाही की आरक्षण गेले खड्ड्यात, माझ्या समाजाला मी माझ्या हिमतीवर मोठे करेन. प्रत्येक नेता त्याचा समाज किती मागास आहे हे ओरडून सांगतोय व आपण मागास आहोत याचा आनंद बाळगत त्याच्या समाजाचे लोक त्या नेत्याच्या आर्थिक विवंचना कायमच्या नष्ट करण्यात मदत करताहेत.
Aarakshan aadhi band whayla
Aarakshan aadhi band whayla hawe. Ekikade magaswargiy, jati ase manayche nahi mhantat ani dusrikade Aarakshan ghetat. Svatachya himtine mehnatini sagli kade jaga milawaychi main stream madhe yaychi himmat kadhi yenar. Jowar haat sodnar nahi towar chalaycha confidence kasa yenar. Kewal aarthik drishtya kami , physically handicapped ani sainyatil Shahid Yana Aarakshan milawe. Brain drain hotach rahanar Jowar Aarakshan aahe.
<<< भारतात लवकरच 100 टक्के
<<< भारतात लवकरच 100 टक्के आरक्षण येणार. >>
------- हे म्हणजे ट्रम्पच्या "caravans are coming" सारखे वाटते.
<< आता एकच करावे: जातीवरून आरक्षण तात्काळ बंद करून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना पूर्ण शिक्षणासाठी स्कॉलरशीप्स द्याव्यात. आणि याची सांगड गुणवत्तेशी घालावी. >>
------- प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. स्कॉलरशीप्स (मोफत शिक्षण) हा एक भाग झाला, त्यान्च्या सभोवतालची परिस्थिती पण तेव्हढीच महत्वाची आहे.
आरक्षण हे वाईट नाही. आजही
आरक्षण हे वाईट नाही. आजही अनेक जाती जमाती आहेत की त्या जंगलात राहतात. विकास , सुख सुविधा यायपासून ते खूप दूर आहेत. अशा जातींसाठी आरक्षण गरजेचे आहे.
परंतु आज अनेक श्रीमंत लोक ही आरक्षण मागत आहे.
हे चुकीचं आहे. अस असल तरीही जात हा निकष दूर करून आर्थिक विषयावर आरक्षण देणे ही अडचणीचे आहे.
गरीब म्हणजे ज्याच्या कडे स्वतःच्या मालकीचे असे काहीच नाही की ज्याच्या साहाय्याने तो सुखी आयुष्य जगू शकेल. यात थोडा बदल होऊ शकतो पण गरिबीची अशीच व्याख्या करावी लागेल. आणि जर अशीच व्याख्या केली तर विजय मल्ल्या भारतात आला तर तो आपल्याही पेक्षा गरीब असेल कारण त्याची संपत्ती जप्त करण्यात मग आर्थिक निकषावर आरक्षण देताना आपण मल्ल्यालाही आरक्षण देणार आहोत का..?
त्यामुळे जात सोडून आरक्षण देताना याचा विचार होणे महत्त्वाचे वाटते..!
War Shri shubhum yani je
War Shri shubhum yani je suchawle ti garib yanchi paribhasha barobar aahe pan mulat Vijay mallya yanchya sarkhe kiti look aahet je parat yetil? Phar kami shiway barech udyagpati yanchi mule pardeshi shikshan ghetat . Aarakshan mule admission na milalela warga ha middle class asto ashya well tyanchi aarthik parthiti kami Ani regular seat nahi yamule atishay nuksan hote. Tyamule yacha wichar whawa. Shiway jya warga paryant ajun shikshan pochale nahi tyawar wegle upay hawe. Jar aarakshan mule te shikayche aste tar itki warsha jhalit tari ka nahi shiku shakle yawar chintan whawa. Saglyana saman sandhi deun ,milun misalun pudhe jaayla Hawa asa watta. America yethe financially weak, physically disabled Ani see citizen yana quota asto yamule shikshan ghetana kewal gunwatta ha niksha asto. Yamule sagli mule jati warna yapasun door astat. Ase chitra aaplyakade kadhi disel.
------- प्रत्येकाची परिस्थिती
------- प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. स्कॉलरशीप्स (मोफत शिक्षण) हा एक भाग झाला, त्यान्च्या सभोवतालची परिस्थिती पण तेव्हढीच महत्वाची आहे>>>>
मग जे शिकू शकतात, त्यांना तिथून उचलून अकॅडमी सारख्या वेगळ्या ठिकाणी ठेवता नाही येणार? जिथे त्यांना अन्न वस्त्राची विवंचना राहणार नाही, अभ्यासाला पोषक वातावरण असेल, पुढच्या वर्गाची नुसती फिच नाही तर पुस्तके वह्या व एक्स्पर्ट मार्गदर्शन विनामूल्य मिळेल?
चीनने ऑलिम्पिक विजेती फौज अशीच तयार केली ना? आपला उद्देश तो नसला तरी फक्त आरक्षण देऊन काय होते? माणूस काही शिको न शिको तरी तो पुढे ढकलला जातो, बस्स एवढेच होते. फक्त शिक्षणात नाही तर सर्वत्रच, जिथे आरक्षण आहे तिथे गुणवत्ता तपासत नाहीत. आणि भारतात जिथे गुणवत्ता लागते तिथेही कुणी गांभीर्य दाखवत नाहीत तर जिथे तिची गरज नाही तिथे ती कोण गांभीर्याने घेणार?
आरक्षणामुळे समाजाची परिस्थिती सुधारत नाही, आरक्षण दिल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या घरातील मुले रोज अभ्यासाला बसताहेत, अभ्यासाला पोषक वातावरण तयार होतेय असे काहीही होत नाही. पोषक वातावरण ही बाब कुणीही गांभीर्याने घेतच नाही. मग कसा फरक पडणार?
त्यात आईबाबाला एक वेळची जेवणाची भ्रांत असेल तर ते कितीही आरक्षण असले तरी मुलाला शाळेत न घालता मजुरीला लावणारच. अशा समाजाला काय उपयोग आरक्षणाचा?
सुरवातीपासून आरक्षण ज्या पद्धतीने दिले गेले ती पद्धतच चुकीची होती असे मला आता वाटायला लागले. आरक्षण म्हणजे त्या गोष्टीतल्या भुकेल्या माणसाला रोज एक मासा फुकट देणे. जिथे मासे पोचले नाहीत तिथले लोक कायम उपाशी राहिले. मासे फुकट देण्यापेक्षा मासेमारी शिकवली असती तर ती विद्या एकाकडून दुसरीकडे पसरली गेली असती, सगळेच मासे पकडायला शिकले असते व स्वावलंबी झाले असते. आरक्षणाच्या कुबड्यानी लोक कायमचे पांगळे राहिले हे आज 70 वर्षांनी दिसतेय.
माझ्याकडे धुणी भांडी करायला जी येते ती बंजारी आहे. या समाजाला भक्कम आरक्षण आहे. इथे आजूबाजूला उंच टॉवर्सच्या कडेला तिची झोपडीपट्टी आहे जिथे बंजारी, वडार, मांग वगैरे लोक राहतात ज्यांना भक्कम आरक्षण आहे. पण काय फरक पडला त्यांना आरक्षणामुळे? मुलगे 15-16 चे होईतो दारू प्यायला लागले, मुली पळून जायला लागल्या, विशी गाठायच्या आधीच गळयात दोन दोन लेकरे आली. ती लेकरेही तशीच वाढताहेत. गेली शाळेत तर गेली, नाहीतर नाही. कोणाला काय पडलीय त्यांची. बाईचा मोठा तांडा तिकडे सोलापूरात आहे. तिथेही तेच. काय फरक पडला आरक्षणामुळे? तिची एक मुलगी हुशार आहे, शिकायची इच्छा आहे. झोपडपट्टीत खूप त्रास होतो तिला. पण हिच्याकडे जातीचे सर्टिफिकेट नाही ज्याच्या आधारावर मुलीला चांगल्या निवासी शाळेत फुकटात ठेवता येईल. काय फरक पडला या लोकांना आरक्षणाचा?
गुणवत्ता असलेल्या मुलांना हेरून त्यांची वेगळी सोय करण्याची व्यवस्था असती तर खूप फरक पडला असता हे माझें मत बनलंय आता. सरकारने नुसते आरक्षण देऊन स्वतःची मान सोडवून घेतली, नेत्यांनीही तेच केले. अजून 100 वर्षे जरी आरक्षण राहिले तरी काहीही फरक पडणार नाही. पडायचा असता तर 70 वर्षात पडला असताच.
Sadhana Tai agdi yogya mudde
Sadhana Tai agdi yogya mudde mandlet. Kharach aaplya deshat politics na karta aaplya deshasathi mhanun koni aarakshan kadhel ka?Mulansathi khup jeev tutato ho. Hushar mule kewal aarakshan Bali padtayt. Ani jyana kharach tyacha upyog whayla Hawa tyana ajun shikshanache mahatwa nahi. Saglyana shikshan denyakarta upay whayla hawe. Aarakshan based on cast hi ek paralyze karaychi paddhati aahe.