दसरा

Submitted by Asu on 18 October, 2018 - 10:17

दसरा

झेंडुफुलांच्या करुनि माळा
दीप ज्योती उजळा
आनंद उधळित आला हसरा
आला आज दसरा
असुरांवर सुरांचा जय
जना वाटो पापाचे भय
सदासर्वदा जना मिळू दे
आनंदी आयुष्य निरामय
विजयाचा उन्माद नसावा
पराजयाचा सन्मान असावा
घास खाता पक्वांनांचा
गरिबांचा विसर नसावा
आपट्याची पाने सांगती
हृदय आपुली एकसंगती
प्रेमाचे हे नाते सगळे
सोन्याहून का असे वेगळे !
घेऊ आशिर्वाद जाणत्यांचे
मोल तया माणकांचे
उरी भेटूया देऊन सोने
गाऊ आंनदाचे गाणे

-प्रा. अरुण सु. पाटील (असु)
सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults