तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुंबा मस्त अनालिसीस.
मोहोर उघडून खायला दिलेले कॉइन चॉकलेट असावे. (म्हणजे मोहर खर्चून आणलेले वगैरे.हस्तर काही चॉकलेट भरलेली सोन्याची नाणी जवळ ठेवेल असं वाटत नाही.)
विनायक चे शेवटचे हेतू क्वेश्चनेबल आहेत. पण मारण्याचा हेतू नसावा. आपला प्लॅन चूक झाल्यावर तो स्वतःचा बळी देऊन मुलाला वाचवतो.शेवट पर्यंत पुढच्या पिढीला काहीतरी देत राहण्याची मूळ मनुष्य प्रवृत्ती आहे. त्यामुळे इतके सगळे झाल्यावरही त्याने सोन्याची नाणी जपून ठेवलेली असतात, निदान ती मुलाने घेऊन जाऊन फायदा करावा असा विचार.(आणि राक्षस होऊनही पूर्वीची धनावरची वासना आहे तशीच आहे.फक्त आता मला वापरता येणार नाहीत निदान मुलाने तरी वापरावे असा विचार.)
हस्तरच्या नक्की कुठून त्या मोहरा पडतात हे मला नीट बघता आले नाही.(आधी वाटले त्याच्या भूत कॉश्च्युम च्या बॅक/हिप पॉकेट मधून पडतात, पण मग शेवटी मुलगा हस्तर चा पंजा घेऊन येऊ वगैरे म्हणतो म्हणजे पंजातून पडत असतील बाहुली खाताना.)

. विनायक हे वर्तूळ तोडण्यासाठी आपले बलिदान देतो. मात्र मोहरांचे अमिश दाखवत पांडूरंगला जवळ बोलावतो तेव्हा त्याला पांडूरंगला ठार मारायचे असते का? >>>>>>
हे अधांतरी ठेवले आहे, हवे तसे इंटरप्रित करा

आता सध्या मिळते ते कॉइन चॉकलेट म्हणजे दोन सोनेरी पत्रे आणि आत चॉकलेट असे असते.हा फंडा जुना असावा कारण माझ्या लहानपणी पण ते पाहिल्याचे आठवते.आता मुंबई पुणे हायवे वर चिक्की स्टॉल्स वर बंच मध्ये मिळते.
त्या काळी चॉकलेट मिळणे/खाणे हा एकदम अप्रुप प्रकार असावा चहा पिण्यासारखाच.
वाडा गव्हर्नमेंट कडे जाणार तर त्या मुलाने विनायक ला दहन करुन मुक्ती द्यायला हवी होती.सरकारी लोक वाडा पाडायला आल्यावर त्या राक्षसाचे काय करणार?

<आता सध्या मिळते ते कॉइन चॉकलेट म्हणजे दोन सोनेरी पत्रे आणि आत चॉकलेट असे असते.हा फंडा जुना असावा कारण माझ्या लहानपणी पण ते पाहिल्याचे आठवते.आता मुंबई पुणे हायवे वर चिक्की स्टॉल्स वर बंच मध्ये मिळते.
त्या काळी चॉकलेट मिळणे/खाणे हा एकदम अप्रुप प्रकार असावा चहा पिण्यासारखाच.>
अच्छा! म्हणजे आपले ट्रेड सिक्रेट आईला न सांगण्याचे पांडुरंगचे ब्रिद कायम आहे तर!
पटले. तो त्याने कमावलेली मोहोर दाखवत नाही, तर तसे चॉकलेट देतो तिला.

मुलगा विनायकला जाळतो

आत जिथे उतरतात ते देवीचे गर्भाशय. तिने हस्तरला परत गर्भाशयात लपवलेले असते.

म्हातारीचे संवाद अजिबात कळले नाहीत। Sad Sad

(मुलगा विनायक ला कधी जाळतो? मला इतकं आठवतंय की तो मोहरा नाकारुन रडत लांब गेला आणि दार बंद करुन वाड्याबाहेर गेला.)
मला पिक्चर परत बघायला हवा.
पांडुरंग वरही बाप आपल्या आईला कसे वागवतो ते पाहून 'स्त्रिया चूल आणि मुल यापुरत्या.याउप्पर आर्थिक गणितं, गुपितं त्यांच्याशी शेअर करण्याची गरज नाही' हे संस्कार झाले आहेत.त्याला मुख्य आकर्षण बापाच्या रंगेल आयुष्याचे आहे.बाकी पैसा घरात असल्याने खाणं पिणं कपडे खेळ हे त्याला भरपूर मिळाले असतील.
पेटी भोवती वर्तुळ विनायक ची 'हाय रिस्क प्लॅन' आणि मुलाला घेऊन अश्या हाय रिस्क मिशन वर जाणार म्हणून ऐन वेळी सुचलेली योजना असावी.
कथेचे २ चॅप्टर धारप कथा बळी आणि आजी यांचे अप्रतिम मिक्स अधिक स्वतःचे टचेस आहेत. हस्तर चावून राक्षस बनण्याचा फंडा थोडा झाँबी कल्पनेतून इन्स्पायर्ड असू शकतो.अर्थात हे राक्षस ज्यांना चावतात ते राक्षस झाल्याचे दाखवले नाही.राक्षस भुकेपोटी माणसांना खाऊ शकतात इतकेच कळते.

मोहरा त्याच्या पंचात असतात बहुतेक. तो खायला म्हणून वळला की त्याच्या कासोट्यावर विनायक हात मारायचा व मोहरा उधळायच्या.

मुलगा म्हणतो की पंचाच चोरला तर...

मोहरा नाकारतो पण आग लावतो असे मला आठवतंय. तो विहिरीच्या बाहेर कसा येतो ते कळले नाही. बहुतेक सगळे हस्तर संपल्यावर ते गर्भाशय वगैरे सगळे नष्ट झाले व विनायक बाहेर येऊन पडला.

काय हे Happy
भूताच्या लज्जा रक्षणाची चिंता नाही. आणि फक्त भरपूर बाहुल्या खायला दिल्या म्हणून हस्तर या लोकांना अंगावर पंचाहरण करु देईल असे गृहीत धरणे जास्तीच आहे ना?

संवाद ऐकू न येण्याच्या तक्रारीशी सहमत आहे. आवाज कमी आहे असं नाही. तर डबिंग स्वच्छ नाही. सावकार मित्र आणि विनायक मधले संवाद पण असेच अस्पष्ट. ब्रिटीश अधिकारी आणि सावकार यांच्यातले संवादही तसेच.

मी_अनु = कालच स्पॉयलर्स संबंधी बदल केला आहे शीर्षकात.
इथल्या शंका जेयुईन आहेत.

Happy पंचा कसा चोरणार कळले नाही. हस्तर खाण्यात गढला असता पडलेल्या सगळ्या मुद्रा गोळा करु म्हणण्याऐवजी मुलगा पंचा चोरुया का म्हणतो कळले नाही.

इंग्रज सांगत असतो की माझी बदली होतेय त्याआधी पैसे देऊन ते लायसन्स ताब्यात घे.

सून म्हणून कुणी भलतीच तो आणून उभी करतो ना? नंतर तीच बस्तान मांडते ना त्याच्या माडीवर?

मुलगा तिच्याशी बोलताना निष्पाप वाटतो, सामान्य मुलांसारखा. प्रत्यक्षात तो तसा नसतो हे नंतरच्या दृश्यावरून कळते. त्यामुळे लग्नाचा संवाद मला अस्थानी वाटला.

आता हा सगळा मिसहॅप झाला म्हणून.पांडुरंग च्या मुलापर्यंत केटी गेली तर तो लांब दांड्याचे सोने पटकन गोळा करणारे फावडे वगैरे ने मॅनेज करेल.शिवाय एआय ची मदत घेऊन सरळ रोबो खाली पाठवता येईल नाणी जमा करायला.खालीपिली रिस्क नकोच.
शिवाय एकच पिठाचा जायंट बाहुला खाली दोरीने सोडता येईल.बस म्हणावं १ तास खात.

दोन दिवस विनायकला घराच्या बाहेर पडू देऊ नकोस असे इंग्रज सुचवतो. ते लैच सूचक घेतलं आहे. त्या आधीचे बाजारातले संवाद स्पष्ट तरी नव्हते (किंवा मग पुणे बघायच्या नादात लक्ष नीट दिले नाही ). बहुतेक त्या ऑफीसरला या सावकारांच्या व्यवहारची खबर लागली असल्याने दोन दिवस याला घरात डांबून खजिना घेऊन ये अशी ताकीद दिलेली असते. पण ती बाईच ५० रू. च्या बदल्यात हे रहस्य फोडते. म्हणून विनायक ताबडतोब तुंबाडला जायला निघतो..

विनायक अंगाला हस्तरच्या बाहुल्या बांधून दोराला धरून वर वर जातो जेणेकरून हस्तरच्या अंशांचे ध्यान त्याच्याकडे वळेल. पिठाच्या रिंगणावरून वर गेल्यामुळे हस्तरचे अंश त्याच्यावर हल्ला करणार हे त्याला माहित असते. निदान पोरगा तरी वाचावा या उद्देशाने तो ही रिस्क घेतो. मध्यंतरी तो हस्तरच्या अंशाच्या स्पर्षामुळे शापित होतो व त्या दरवाजातून बाहेर पडायला बघतो, मात्र पिठाचे वर्तुळ वरदेखिल असते त्यामुळे त्याचा प्रभाव होतो व सारे अंश जळून पिठ होतात. पण पांडूरंग वर न जाता सरळ रस्त्याने चालत जाऊन त्या पेटीच्या इथे कसा पोचतो हे कळले नाही.

<राक्षस भुकेपोटी माणसांना खाऊ शकतात इतकेच कळते.>
अनु, हे कसे कळले? मला वाटते, शापित व्यक्ति माणसांना खाऊ शकत नाहीत. म्हातारी विनायकला घेऊन चालली असते मात्र ती त्याला खाणार असते या?

<दोन दिवस विनायकला घराच्या बाहेर पडू देऊ नकोस असे इंग्रज सुचवतो. ते लैच सूचक घेतलं आहे. त्या आधीचे बाजारातले संवाद स्पष्ट तरी नव्हते (किंवा मग पुणे बघायच्या नादात लक्ष नीट दिले नाही ). बहुतेक त्या ऑफीसरला या सावकारांच्या व्यवहारची खबर लागली असल्याने दोन दिवस याला घरात डांबून खजिना घेऊन ये अशी ताकीद दिलेली असते. पण ती बाईच ५० रू. च्या बदल्यात हे रहस्य फोडते. म्हणून विनायक ताबडतोब तुंबाडला जायला निघतो..>

नाही बहुतेक.

गांज्याचे परमीट मिळवन्यासाठी इंग्रज सावकाराकडे पैसे मागत असतो. सावकाराला विनायक तुंबाडमधील सरकार्वाड्यातून मोहोरा आणतो याचा संशय असतोच. तो त्या बाईला(जी त्याची खरोखर सून असेलही किंवा नसेलही. स्पष्ट नाही) विनायकला विकतो. तिला टास्क हे की तिने २ दिवसांसाठी विनायकला गुंतवून ठेवावे म्हणजे तोपर्यंत तो वाड्यातल्या खजिन्यावर हात साफ करून घेईल. इंग्रजाला विनायकवर संशय आहे परंतू, खजिन्याबाबत त्याला ठाऊक नाही. तिथे जाणे हा राघवचा स्वतःचा आगाऊपणा आहे.

<पंचा कसा चोरणार कळले नाही. हस्तर खाण्यात गढला असता पडलेल्या सगळ्या मुद्रा गोळा करु म्हणण्याऐवजी मुलगा पंचा चोरुया का म्हणतो कळले नाही.>
साधना, पंचा नव्हे, पंजा.
मोहोरा हस्तरच्या अंशांच्या हातातून गळत असतात. त्याचा हातच तोडून आणल्या तर अगणित मोहोरा मिळतिल असा उद्देश.

<शिवाय एकच पिठाचा जायंट बाहुला खाली दोरीने सोडता येईल.बस म्हणावं १ तास खात.>
नाही ना! मग हस्तरचा अंश त्याच्या समनुपातात मोठा होईल. (डायरेक्टली प्रपोर्शनल) असे मला वाटले. जेवढे खाद्य उपलब्ध तेवढा मोठा अंश फडशा पाडण्यासाठी हस्तर पाठवणार.

राघव त्या बाईबरोबर घाटाच्या पाय-या चढून वर येत असतो तेव्हां इंग्रज त्याला विचारतो. बाई कोण आहे.. तेव्हां राघव सून आहे असे सांगतो. ते ऐकून इंग्रजाला हसायला येतं. आणि तो हाताची दोन बोटं करून टू डेज .. असं सांगतो. त्याचा उलगडा नंतरच्या दृश्यात होतो. अर्थात हा ही अंदाज. खूपच टाईट पटकथा आहे. मधली दोन दृश्य गाळल्यासारखे वाटते अनेक ठिकाणी.

दोन दिवसात मी निघून चाललो आहे तेवढ्यात पैशाचा बंदोबस्त कर असे तो म्हणतो असे माझे आकलन. चुकीचेही असेल.
इंग्रजाच्या मागे चिनी दाखवलाय ते कसले भारी आहे. तेव्हा पुण्यात अनेक चिनी वास्तव्य करून होते त्यातले काही अधिकार्‍यंच्या दिमतीलाही असत असे वाचल्याचे आठावते.

चित्रपट बघेन कि नाही नक्की ठरवले नव्हते म्हणून हा लेख याआधी वाचला नव्हता. आत्ता लेख आणि सगळे प्रतिसाद वाचले.

लेख छान आहे. प्रतिसादमात्र सगळे डोक्यावरून जातायत.
धारप किंवा स्टिफन किंग न वाचणार्यांना हा सिनेमा कळतो, आवडतो आहे का?

धारप किंवा स्टिफन किंग न वाचणार्यांना हा सिनेमा कळतो, आवडतो आहे का? >> नाही.
बायकोने यापेक्षा स्त्री चांगला होता असं बाणेदारपणे उत्तर दिलेलं अजून ठणकतंय.

<पुंबा, आजी आधीचं वाक्य म्हणते. मला भूक लागलीय लवकर खायला दे नाहीतर तुला खाईन असं.>
ओह! हे मिसलं वाटतं.

दोन दिवसात मी निघून चाललो आहे तेवढ्यात पैशाचा बंदोबस्त कर असे तो म्हणतो असे माझे आकलन. चुकीचेही असेल>>≥
Barobar, माझे प्रमोशन झाले , महिन्या भरात मी गेलो तर मध्यस्ती करणारा कोणी उरणार नाही असे तो आधीच्या दृष्ज्यात म्हणतो,
मग राघव पार्टनरर्शीप ची ऑफर देतो जी विनायक धुडकावतो,

नंतर हे 2 डेज वाले येते, म्हणजे मध्ये महिना गेला असे आपण समजायचे.
दरम्यात विनायक ला बिझी ठेऊन तिकडे जाण्याचा प्लॅन राघव ने बनवला आहे, त्या नुसार त्या बाई ला घेऊन येतो तो

Pages