Submitted by पाडस. on 1 October, 2018 - 10:55
तिच घरट तिनं,
एकटीनंच थाटायच होत.
स्वप्न फाटली तरी,
ध्येय मात्र गाठायचं होत.
पंखात बळ असूनही,
झेप न्हवती.
आयुष्याच्या महासागरात,
पुन्हा खेप नव्हती.
भुकेल्या पिल्लाना चारा,
तिलाच भरवायचा होता.
मोडून पडलेल्या संसाराचा गाडा,
तिलाच आवरायचा होता.
त्याच्याबरोबर तिनं,
कितीतरी स्वप्न आखली.
तिचं नशीबच फुटक,
काळानं सारी गणितच पुसून टाकली.
अस होईल काहीतरी,
कधी तिला वाटलंच नव्हतं,
मेघ तर नेहमी दाटायचे,
पण आभाळ कधी फाटलच नव्हतं.
त्याला जाऊन आज चार वार झाले,
तरी ती रडली नाही.
हा थोडीशी वाकली आहे,
पण अजून मोडली नाही.
जाणवलय तिला, आपल्या पिलांसाठी आता,
आपणच लढलं पाहिजे.
कधी झालच नाही,
असच काहीतरी घडलं पाहिजे.
आपलं पोट,
आता आपणच पिकवल पाहिजे.
स्वतःची पंख मोडली तरी,
पिलांना उडणं शिकवलंच पाहिजे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान !
छान !