Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 September, 2018 - 08:35
मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो
प्रयत्न केला , तरी नाही आठवले
तेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येक सुखाला
माझ्या कॅमेऱ्यात साठवले ॥
मला माहीत नाही, असे का होते
मी सुखी असतो तेव्हापण
अन दुःखात रडत असतो तेव्हाही
हे साठवलेले सुखद क्षण बघून, अजून रडायला येते ॥
ह्या आठवणी जरी च्छान असल्या
तरी किंमत त्यांची , साठवलेली माणसं ठरवतात
फोटोतलं कुणी एकजरी जवळ नसेल
त्यांच्या आठवणी अजून बेचैन करतात ॥
इतरांना त्याची किंमत नसते
त्यांच्यासाठी ती फक्त तसबीर असते
आपण मात्र हरवतो त्या दृश्यात
बाहेर फक्त आपले शरीर असते ॥
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा