Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 September, 2018 - 12:26
दत्त एक स्वप्न
निद्रेला गिळून
अस्तित्वा भरून
उरलेले ||
दत्त एक सत्य
विश्वाला गाळून
काळाला सारून
थांबलेले ||
दत्त एक जगणे
श्वासात भरून
हृदयात येवून
वसलेले ||
दत्त एक प्रार्थना
अवघे सुटून
एकटे उरून
उमटलेली ||
दत्त एक साधन
श्रद्धेत रुजून
शरण होवून
अंगिकारले ||
कृपे वाचूनिया
दत्तास कळणे
कदापि घडणे
नाही नाही ||
म्हणून विक्रांत
मीपण सोडून
उगाच पडून
दत्तपदी ||
डों.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे. भावना पोहोचल्या.
छान आहे. भावना पोहोचल्या.
आवडली.
आवडली.
भक्तिपूर्ण, भावपूर्ण....
भक्तिपूर्ण, भावपूर्ण....
_____/\_____
श्रद्धेने ओतपोत भरलेली कविता
श्रद्धेने ओतपोत भरलेली कविता ! सुन्दर
आवडली! -^-
आवडली! -^-
छान भक्तिमय लिखाण ... सुंदर .
छान भक्तिमय लिखाण ... सुंदर .. श्री गुरुदेव दत्त