माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही

Submitted by सिद्धेश्वर विला... on 1 September, 2018 - 04:14

माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही

मस्त आलिशान घर होतं

दिमतीला गाडी न नोकर होते

अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥

लग्नही असंच पळून केलं

पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं

जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं

एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं

जिथे चूल होती तिथेच मोरी होती

आपल्याच घरात मुतायची चोरी होती

चहा झाला कि हात लांब करून दिला

जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥

जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर

भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर

घर पार भरून जायचं

प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ? ॥

सकाळी शौचास तर हि गर्दी उसळलेली

ते पाहून तर मी खालीच कोसळली

ह्या भल्यामोठ्या लागल्या होत्या रांगा

आत्ता प्रेमात अजून काय काय करायचं असतं ते सांगा ॥

मी देखील हातात घेऊन उभी होती लोटा

पोटातून हळूहळू खाली सरकत होता गोळा मोठा

करू लागले मी देवाचा धावा

मनोमन वाटू लागले घरी संडास असावा ॥

आधी कधी वाटली नव्हती एव्हढी त्याची थोरवी

पण आता मात्र वाटत होते

कि हि जी आलीय ती संडासातच व्हावी

बाप माझा वाटू लागला मला परमेश्वर

ज्याने एवढं सुखात ठेवलं होतं अन दिलं होतं आलिशान घर ॥

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.