सन्ध्याकाळची वेळ होती. सुर्य नुकताच अस्ताला गेला होता, अजुन पश्चिमेचा नारन्गी रन्ग निळ्या काळ्या आकशात थोडी जागा धरून होता. मन्द वारा वहात होता पक्षी आपल्या घराकडे जायला लागले होते. टेकडीवर झाडाखाली दगडावर दादा बसला होता. आम्ही सगळे त्याच्या शेजारी गोल करून बसलो होतो. या वेळी दादा आम्हाला देशो देशी च्या गोष्टी सान्गत असे. मग त्यावर आमची चर्चा रन्गत असे. गोष्टी कधी पुराणातल्या असत, कधी इतिहासातल्या असत तर कधी चालू घडामोडीतील असत. कुणाची निन्दा नालस्ती, कुचाळक्या यासाठी मात्र कधी वेळ मिळाला नाही.
मग एखादा पुराणातल्या कथान्वर एखादा विचारे "दादा, असे कसे हे ऋषी लोक सगळा समुद्र पिऊन टाकायचे? समुद्रात तर केवढे पाणी असते?"
आणि मग दादा आम्हाला त्या कथेचा मतितार्थ सान्गत असे. गप्पा गोष्टी झाल्यावर सगळे जण काही तरी मिळाल्याच्या समाधानाने घरी जात असत.
एकदा आम्हाला दादा येशू ख्रिस्ताची गोष्ट सान्गत होता. केवढे पवित्र जीवन, केवढे पीडीतान्वर प्रेम, कशी त्यान्च्या चेहर्यावर सुखाचे हास्य दिसावे यासाठी तळमळ. गोर गरीबान्पासून, वेश्येपर्यन्त सर्वाना आधार देणारा आणि जगाच्या कल्याणासाठी शरीरात खिळे ठोकण्याची भयानक शिक्षा स्विकारणारा ख्रिस्त. त्याच्यावर विश्वास ठेवून गोर-गरीबान्ची सेवा करण्याचे सोडून, त्याला शरण जाण्याचे सोडून ख्रिस्तावर अविश्वास, त्याने सान्गितलेला मार्ग आचरणार्यान्ची परिक्षा... हे सगळ्या दु:खाचे कारण आहे.. दादा सान्गत होता.
"ख्रिस्तासारखे, शन्करान्नी पण हलाहल प्यायले ज्यानी त्यान्च्या सगळ्या शरीराची लाही लाही व्हायला लागली, म्हणून त्यान्नी हिमालयात आसरा घेतला. पण, सर्व सज्जन लोकान्ना अम्रुत त्यान्नी मिळवून दिले... त्यान्ची कथा पण तू सान्ग की...", आमच्यातला एक म्हणाला.
दादा म्हणाला, "सान्गेन कधी तरी... ख्रिस्त काय, शन्कर काय यान्च्या कथा हेच सान्गतात, उघड्या डोळ्याने समाजाकडे बघा. तुम्हाला अशी माणसे दिसतील जी दुसर्याचे दु:ख स्वत:वर घेऊन, दुसर्याच्या चुकान्ची जबाबदारी स्वतः वर घेउन, चान्गल्या लोकान्ना सुख होईल यासाठी प्रयत्न करतील. गोर गरीब, दिन-दुबळे, समाजाने टाकलेले, उपेक्षीत, सर्वाना जवळ करतील आणि त्यान्ना हिताचा मार्ग दाखवतील. अशी व्यक्तीच देवाचा प्रिय पुत्र, समाजाच्या, जगाच्या हितासाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला..
अशा व्यक्तीन्वर अविश्वास, त्यान्च्या कामामध्ये मदत करणार्यान्ची चिकित्सा हेच सगळ्या दु:खाचे कारण, हाच तो सैतानाचा आदेश मानणारा पतित"
नरसी मेहता म्हणतात,
"वैष्ण्व जन तो तेणे कही येजे, पीड पराई जाणे रे |
परदु:खे उपकार करे तो... मन आभिमान ना आणे रे |"
दादा सान्गत होता. तोपर्यन्त अन्धार पडला होता. सगळे पक्षी आपापल्या घरट्यात गेले होते. आम्ही सुध्दा घरी जायला निघालो. नेहमी सारखेच काही तरी मिळाल्याचे समाधान घेउन.
खरच नशीबवान आहात तुम्हाला
खरच नशीबवान आहात तुम्हाला तुमच्या 'दादा' सारखे लोक मार्गदर्शक म्हणुन मिळाले.
असे मार्गदर्शक मिळणे (की
असे मार्गदर्शक मिळणे (की भेटणे?) हे खरोखर भाग्याचे लक्षण. आता फक्त त्या मार्गावर किती लोक चालतात ते बघायचे.
नंद्या43जी
नंद्या43जी
आपण त्या मार्गावर चालू पडलो की मग दुसरे कोणी त्यावर चालो ना चालो.. आपण आपले मार्गक्रमण चालू ठेवायचे.
खरे तर तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने समस्त मायबोलीकरांसमोर असे आदर्श उदाहरण ठेवले पाहिजे.
गुरुशिवाय विद्या फळत नाही आणि
गुरुशिवाय विद्या फळत नाही आणि मार्गदर्शकाशिवाय योग्य मार्ग मिळत नाही.
मात्र त्या मार्गावर चालायची उर्मी आतून यायला हवी.
निसर्गकृपेने वयाच्या बावीसाव्या वर्षीच माझ्यात ती दाटून आली.