" अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .
" सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .
" क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .
" बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .
" का त्याला तू किस करणार आहेस ? "
" काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .
" लुक दॅट्स मोअर युजफूल दॅन युअर सॉरी " ती त्याला समजावत म्हणाली .
" वेल ती मदत मी नाही करू शकत पण सांग ना तुझा bf कोण आहे ? " तशातही त्याने स्वतःचा प्रश्न पुढे केला .
" वेल देन मी पण तुझी मदत नाही करू शकत . " तीही पेटलीच होती .
" अग ऐक तरी " त्याने विशाखाला समजावण्याचा प्रयत्न केला .
" चल जा मी नाही सांगत " असं म्हणत ती गेली त्याच अजिबात न ऐकता .
तेव्हढ्यात तिथे संदीप आला . त्याचा प्रश्न तसाच ओठावर आला .
" अरे हिचा bf कोण आहे ? "
" ए तू तिच्यात इंटरेस्टेड आहेस का ? " संदीपने विचारलं
" नाही रे पण हवा होता "
त्याला इथे तर काही क्लू नाही मिळाला . पण त्याने त्याचे प्रयत्न सुरु ठेवले . त्याला बऱ्याच जणांकडून जाऊन शेवटी त्या फोटोचा ओरिजिन मिळाला होता . याच्या मुळाशी शरद आहे हे त्याला आता समजलं होत .
****
" तू केलस हे " तो शरदला विचारात होता .
" त्यात काय ? " शरद शांतपणे म्हणाला , " किसिंग तर आहे कुठं तुमची ब्लु फिल्म लावलीय "
हे ऐकून त्याच्या रागाचा पारा चढला . त्याने शरदची कॉलर पकडली .
त्याचे सगळे मित्र पुढे सरसावले . त्याने हातानेच त्यांना थोपवल .
शरद अजूनही शांतच होता त्याने स्वतःची कॉलर सोडवली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला ,
" अरे हिरो थंड घे "
" एव्हढं सिरीयस व्हायचं नसत रिलेशनशिपमध्ये "
" मी आहे सिरीयस " त्याला ती गोष्ट अजिबात सहन झाली नव्हती .
" ओके ब्रदर . तू सिरीयस असशील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही . हा बघ फोटो डीलीट केला . " असं म्हणत त्याने तो फोटो डिलीट केला . " रिलेशन ओके पण कधीकधी राहत जा आमच्यातही . "
खरंतर त्याचा राग शांत झाला नव्हता पण तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला " राहीन रे ब्रो . " असं म्हणत दोघांनी शेकहॅन्ड केला आणि एकमेकांची गळाभेट घेतली .
शरदच्या निरोप घेऊन तो निघाला .
तो गेल्यावर शरदवर पोरांनी प्रश्नांची सरबत्ती केली .
" भाई माघार का घेतली ? "
" अरे काय नाय रे चलता है आणि न्यू रिलेशन आहे . अभी तो चलेगा . देखते है आगे क्या होता है "
****
" आय एम सॉरी " त्याला झालेल्या गोष्टीचा खरंच पश्चात्ताप झाला होता .
" असू दे रे " म्हणत ती त्याला समजावत म्हणाली . ती पुढे बरच काही बोलत होती, तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होता . पण त्याच्या डोक्यातून काही या गोष्टी जात नव्हत्या .
****
" अग काय विचार काय आहे तुझा ? लक्ष आहे कि नाही तुझं अभ्यासात ? "
" आहे ग एव्हढं काही झालं नाहीये . " ती तिच्याच विश्वात रमली होती .
" अग मार्क पाहिलेत का तुझे ?"
" टेस्ट तर आहे त्याला काही महत्व नसत ग " ती तिच्या भावविश्वात तशीच तरळत राहिली .
****
" काय भाई आमच्याशी पण बोलत जा कधीकधी . आणि किती पझेसिव्ह राहणार आहेस ? "
" बाकी भाई आपल्याला काय पटत नाय एव्हढं पण इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसत पोरींकडे . कंट्रोल कर तिला . मग बघ सगळं सोपं होत . एकबार ट्राय मारून तर बघ पोरगी कशी तुझ्या मागे गोंडा घोळते ते बघ "
" बस यही बात लडकियोंको दिवाना बना देती है "
आधी त्याला ती त्याच्यावर हक्क दाखवतेय हे आवडायचं पण आता आता त्याला तो तीचा डॉमिनन्स वाटू लागलं होत . ते त्याला नको होत आणि मुलांनी सांगीतलेला त्याला ट्राय करायचं होत त्याला आता तिला कंट्रोल करायचं होत तो तसा प्रयत्न करु लागला पण ती त्याच ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नसायची आणि असं ती सर्वांसमोर आपलं ऐकत नाही याचा त्याला राग येऊ लागला होता आणि तो फ्रस्ट्रेट होऊ लागला होता .
" तू अजिबात जायचं नाहीस "
" का जायचं नाही ? माझ्या सगळ्या मैत्रिणी जाताहेत मी जाणारच " असं म्हणत ती फणकाऱ्याने निघून गेली तिच्या सोबतच्या मुली त्याच्याकडे पाहून हसल्या कुणीतरी ' पुअर चॅप ' अशी केलेली कमेंट त्याला जिव्हारी लागली .
" क्या यार पार कचरा केला "
" ए बस कर अपना भाई है त्याला कुणी काय बोलायचं नाही " शरदनं त्यांना आवरलं .
" देख भाई आपल्याला नाही आवडलं सगळं काही बदलू शकत . एक तरिका है ..... "
.... क्रमशः
भाग १ : https://www.maayboli.com/node/63972
भाग २ : https://www.maayboli.com/node/64112
भाग ३ : https://www.maayboli.com/node/64527
भाग ४ : https://www.maayboli.com/node/66363