माझ्या भावाच्या मुलीला नेहमी मी काही ना काही गोष्टी प्रसंगानुरुप सांगत असतो. तिने एकदा हट्ट केला की “मला या कथांचे ई-बुक करुन दे.” त्याप्रमाणे तिला तिस-पस्तीस कथांचे ई-बुक करुन दिले. या कथा नक्की कुणी लिहिल्या हे माहीत नाहीत. अजोंबांकडून वगैरे त्या मी ऐकल्या. मी ते ई-बुक ‘मार्मिक लघू कथा’ म्हणून सोशल साईटवरही टाकले होते. त्यातल्याच काही कथा येथे मा. ल. क. नावाने तुमच्यासाठी देतो आहे. अगोदर ‘अलक’ हा प्रकार आला, मग मायबोलीवर ‘शशक’ प्रकार आला म्हणून हा ‘मालक’ मी मागे ठेवला होता. तुम्हालाही या कथा आवडाव्यात. कथासुत्र माहित नाही कुणाचे आहे पण शब्दांकन माझे आहे. (पेजेस फाईल सापडत नसल्याने परत टाईप करुन टाकावे लागत आहे. त्या मुळे वेळ लागेल दोन कथांमध्ये.)
———————————————————————————————————————
एका गावात एक दांपत्य राहत होते. चरितार्थाचे साधन म्हणजे भिक्षुकी. परिस्थिती बेताची. म्हणजे एका भिक्षुकाची असावी तशीच. रोज जशी भिक्षा मिळेल तशी गुजराण व्हायची. अर्थात कधी कधी महिन्यातून चार-पाच एकादश्याही घडायच्या. पण या परिस्थितसुध्दा एक घास गाईला व एक अतिथीला देण्यास भिक्षुकाची पत्नी विसरत नसे. ही सवय तिने व्रत पाळावे तशी पाळली होती. प्रथम अतिथी, मग पती आणि काही उरलेच तर स्वतःसाठी असा तिचा क्रम असे. कैकदा घरात असलेली एकुलती एक भाकरीही अतिथीला द्यावी लागुन फक्त पेज पिऊन झोपावे लागे दोघांना. अर्थात यावरुन दोघाही पती पत्नीमध्ये खुपदा वाद होत. वाद म्हणन्यापेक्षा पती खुप बोले आणि पत्नीला ऐकावे लागे. भिक्षुकाची विचारसरणी अगदी सरळ होती. “आपण आहोत तर विश्व आहे, एवढेच काय, आपण आहोत तोवरच आपला ईश्वर आहे.” त्यामुळे सर्वात प्रथम आपण आपली सोय पहावी. परोपकार करुन समाजात नाव मिळेल पण नुसत्या नावाने काही पोट भरत नाही.
त्याचे पत्नीला कायम सांगणे असे की “मीच याचक म्हणून जन्म काढतो आहे, त्यात दारावर आलेल्या याचकाला काय देणार?” पत्नी सगळं ऐके आणि हसुन म्हणे “असा एक दिवस नक्की येईल की तुम्हाला माझे वागणे पटेल.”
भिक्षुक चिडून म्हणे “…आणि तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल असेही म्हण पुढे.”
“तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप करावा लागेल असा दिवस तुमच्या आयुष्यात कधीच येउ नये” असं म्हणत पत्नी कामाला लागे.
दिवस चालले होते. परिस्थितीत काही फरक नव्हताच. उलट कालचा दिवस दोघांनाही उपासंच घडला होता. त्यामुळे आज भिक्षुकाने ठरवले “नेहमी पेक्षा सकाळी लवकर निघू, चार घरे जास्त मागू.” त्याने आन्हिके उरकली. झोळी खाद्यावर अडकवली. झोळीत काही वजन हवे म्हणून घरातील उरले सुरले तांदूळ झोळीत टाकले आणि भिक्षांदेही साठी तो घराबाहेर पडला. बाहेर सकाळचे सुंदर वातावरण होते. लोकांची सकाळची लगबग दिसत होती. ‘कुठून सुरवात करावी?’ या विचारात असतानाच भिक्षुकाला अचानक लोकांची लगबग वाढल्याचे जाणवले. काही समजायच्या आत रस्ता मोकळा झाला. सर्वजण आदबीने उभे राहीले. भिक्षुकाची नजर समोर गेली. नगराची हालहवाल पहाण्यासाठी आज राजा स्वतः भल्या सकाळी बाहेर पडला होता. प्रजेला त्रास नको म्हणून अत्यंत कमी लवाजमा त्याच्यासोबत होता. काही समजायच्या आत राजाचा रथ भांबावलेल्या भिक्षुकापाशी येउन थांबला. नमस्कार करुन बाजूला व्हायचे भानच त्या भिक्षुकाला राहीले नाही. त्याला बाजूला सारण्यासाठी सरसावणाऱ्या सैनिकांना थांबवून राजा रथाखाली उतरला. आता मात्र भिक्षुक भानावर आला. त्याची चतुर बुध्दी क्षणभरात खुप काही विचार करुन गेली. आज प्रत्यक्ष राजा समोर उभा होता. आज जर झोळी पसरली तर आयुष्यभराची ददात मिटणार होती. आनंदाने त्याचा हात झोळीकडे गेलाच होता इतक्यात कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं घडले. राजाने प्रसन्नपणे हसत आपला भरजरी शेला भिक्षुकासमोर पसरला आणि म्हणाला “महाराज आज आपणच मला भिक्षा घालावी. माझ्यासाठी तोच आशिर्वाद आहे.”
हे पाहून भिक्षुक गोधळला, घाबरला, धर्मसंकटात पडला. काही द्यायची वृत्ती नव्हतीच आणि प्रत्यक्ष राजाला नाहीही म्हणता येईना.
भिक्षुकाने खांद्यावरची झोळी खाली ठेवली आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत तांदुळ भरले. पण त्याने विचार केला “या ओंजळभर तांदळात माझा उद्याचा पुर्ण दिवस निघेल, राजा काय करणार या तांदळाचे?” त्याने भरलेली ओंजळ अर्धी रिकामी केली. मग त्याने परत विचार केला “अर्ध्या ओंजळीत निदान पत्नी तरी जेवेल उद्या” त्याने ओंजळ रिकामी करुन मुठभर तांदूळ घेतले. राजा मात्र अजुनही शेला पसरुन उभा होता. भिक्षुकाने विचार केला “हे मुठभर तांदूळ तर राजाच्या शेल्याच्या जरीत कुठे अडकतील हे राजालाही कळणार नाही.”
राजा हसुन म्हणाला “महाराज, देताय ना भिक्षारुपी आशिर्वाद?”
राजाचे हे शब्द ऐकूण त्याचे डोळे चमकले. “आशिर्वादासाठी कशासाठी हवेत मुठभर तांदुळ? त्यासाठी दोन दाणेही पुरतात” असा विचार करुन त्याने चिमूटभर तांदूळ झोळीतुन बाहेर काढले आणि राजाच्या शेल्यात टाकले. राजाने अत्यंत नम्रपणे ते स्विकारले आणि “धन्यवाद महाराज!” म्हणत रथात बसुन मार्गस्थ झाला.
“एकूणच मोठी माणसे जरा विक्षिप्तच असतात” असा विचार करत भिक्षुक नगरभर फिरुन संध्याकाळी घरी आला. सकाळचा ‘राजाचा प्रसंग’ सोडला तर त्याचा दिवस आज अगदी छान गेला होता. आज त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त भिक्षा मिळाली होती. आता किमान आठ दिवस तरी त्याला ‘मिठ-भाताची’ चिंता नव्हती. खांद्यावरचे ओझे सांभाळत त्याने घरचा रस्ता धरला.
घरी येताच त्याने मोठ्या आनंदाने पत्नीकडे झोळी सोपवली आणि स्नान वगैरे उरकुन तो संध्येच्या तयारीत गुंतला. पत्नीने झोळी जमीनीवर रिकामी केली आणि तांदुळ निवडून साफ करायला सुरवात केली. तिलाही खुप बरे वाटले होते इतकी भिक्षा पाहून. स्नान उरकुन भिक्षुक जेंव्हा घरात आला तेंव्हा पत्नी आनंदाने ओरडली “अहो, हे पहा काय आहे! तुम्ही आणलेल्या भिक्षेतले दोन दाणे चक्क सोन्याचे आहेत!” ते पहाताच त्याच्या डोळ्यांसमोर सकाळी राजाच्या शेल्यात टाकलेले दोन दाणे आठवले.
पत्नी त्या दोन दाण्यांकडे अतिशय आनंदाने तर भिक्षुक हतबुध्दतेने पहात होता.
(मार्मिक लघु कथा)
कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे
मा.ल.क. - २
https://www.maayboli.com/node/66831
उच्च-मध्यमवर्गीय घरातील
उच्च-मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या बालमनावर काय संस्कार होतील अशा गोष्टीतुन?>>> Paristhiti kashi hi asali tari man moth asav lagt...
Ya varun bahina bainchya eka kavite chi ol athvali ...
Denaryane det jave ghenaryane ghet jave.. ghenaryane gheta gheta denaryache hat ghayve..
katha khupch avadli...
katha khupch avadli...
चांदोबातल्या कथा अश्या असत.--
चांदोबातल्या कथा अश्या असत.---+1
बोधिसत्व गोष्टी अश्या असायच्या
छान लिहिलंय.
हाय कम्बख्त तुझे मेरा
हाय कम्बख्त तुझे मेरा प्रतिसाद समझ्याच नही.
आणि ती कविता बहीणाबाईंची नाही तर विं. दा. करंदीकरांची आहे.
व्यत्यय,
व्यत्यय,
प्रतिसाद विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.
< मध्यम्वर्गीय मराठी घरातील मुलांनी स्वतःला भिकार्याच्या भुमिकेत ठेउन गोष्ट वाचावी की राजाच्या भुमिकेतुन? >>>
सध्या जे चाळीशीच्या आसपास आहेत त्यांना लहानपणी हि गोष्ट सांगितली असती तर त्यांनी स्वतःला भिक्षुकाच्या जागी पाहिले असते. पण आता त्यांचीच उच्चमध्यमवर्गात वाढणारी मुले काय करतील माहित नाही.े
व्यत्यय, कथा त्रयस्थपणे वाचून
व्यत्यय, कथा त्रयस्थपणे वाचून त्यातले मर्म समजुन घ्यावे ही अपेक्षा.
त्याच्या झोळीतले दाणे राजाने नाही सोन्याचे केले, ते त्याच्या वृत्तीचे फळ होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने दान केले आणि त्याचे त्याला फळ मिळाले.
राजाच्या 'पदर पसरण्या'कडे येडचापगीरी म्हणून पहाण्यापेक्षा 'दोनच दाणे' मिळूनही त्यात अपमान न मानता 'नम्रतेने धन्यवाद' म्हणन्याच्या वृत्तीकडे पहावे. मीतर सिग्नलला 'पाच रुपये दिले' म्हणून चिडून पैसे माझ्या अंगावर फेकणारे पाहीलेत.
अशा कथांमधले मर्म पहावे प्रत्येकाने नाहीतर मग 'इसापनिती' सारख्या कथा कुचकामी ठरायच्या.
अशा कथांमधले मर्म पहावे
अशा कथांमधले मर्म पहावे प्रत्येकाने नाहीतर मग 'इसापनिती' सारख्या कथा कुचकामी ठरायच्या. >>+१
शाली, खूपच छान कथा!
शाली, खूपच छान कथा!
व्यत्यय, कथा त्रयस्थपणे वाचून
कथा त्रयस्थपणे वाचून त्यातले मर्म समजुन घ्यावे ही अपेक्षा.
त्याच्या झोळीतले दाणे राजाने नाही सोन्याचे केले, ते त्याच्या वृत्तीचे फळ होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने दान केले आणि त्याचे त्याला फळ मिळाले.>>++१११
कविता बहीणाबाईंची नाही तर विं
कविता बहीणाबाईंची नाही तर विं. दा. करंदीकरांची आहे.>> आणि ते विं. दा. करंदीकर नाहीत, तर विंदा करंदीकर आहेत . गोविंद विनायक करंदीकर.
शाली, सहमत.
मल अकाही हा प्रकार कळाला नाही
मला काही हा प्रकार कळाला नाही. आपल्या माहीत असलेल्या गोष्टी स्वतःच्या शब्दात सांगायच्या आणि त्याला मा. ल.क. म्हणायचं का?
तसं असेल तर मी खुप सार्या मा.ल.क. लिहु शकते
रीया, या कथा फार पुर्वापार
रीया, या कथा फार पुर्वापार चालत आल्यात. आज्जी-आजोबांच्या कथा. या कथांचा प्रत्येकाकडे वेगवेगळा ठेवा असतो. भाषा, पदार्थांप्रमाणेच अशा कथा, म्हणी या प्रांतागणीक बदलत असतात. या पुढेही या प्रवाहात रहाव्या हा ऊद्देश आहे. नाहीतरी आजकाल आपण मुलांना कुठे ईसापनीतीची पुस्तके देतो किंवा कथा सांगतो? लहान कथेत मोठे मर्म सांगीतलेले असते म्हणून यांना मी ‘मार्मिक लघु कथा’ म्हणतो इतकेच. तुमच्याकडेही अशा कथा असतील तर जरूर लिहा. वाचायला आवडेल. आणि तुम्हाला नसेलच आवडले तर थांबवतो ही मालीका. पण वाचा हो. छान वाटतात वाचायला, मुलांना सांगायला.
प्रतिसादासाठी खुप आभार!
माझ्या आवडी निवडीचा संबंध
माझ्या आवडी निवडीचा संबंध नाही पण हा प्रकार मला कळाला नाही म्हणुन विचारलं.
यात प्रताधिकारभंग होतोय का नाही हा ही प्रश्न आहेच
त्यांनी प्रत्येक ठिकाणी
त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलच आहे कि या माझ्या माझे/ कथाबीज नाहीत, फक्त शब्दांकन माझे
@ शाली : थांबवू नका मा.ल.क. लेखन
शशांक, तुम्ही पाठवलेली लिंक
शशांक, तुम्ही पाठवलेली लिंक पाहिली. हे कथासुत्र टागोरांचेच आहे तर. मी या अगोदर वाचली नव्हती टागोरांची ही कथा.
लिंक पाठवल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!
छान कथा आहे!
छान कथा आहे!
रिया तुम्हीपण लिहा. मजा येतेय
रिया तुम्हीपण लिहा. मजा येतेय मालक वाचताना.
आणि शाली - तुम्हीपण थांबू नका.
छान बोधकथा..
छान बोधकथा..
मस्त लिहिता तुम्ही!हरकत नसेल
मस्त लिहिता तुम्ही!हरकत नसेल तर शशांकनी पाठवलेली लिंक शेअर कराल का?आगाऊ धन्यवाद.
Pages