Submitted by भागवत on 11 July, 2018 - 03:48
आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी
एकच ध्यास वारी
पंढरीची आस वारी
एकच अट्टहास वारी
धगधगती भक्तीची ज्योत वारी
माऊलीचा गजर वारी
भक्तांचा कुंभमेळा वारी
समाज प्रबोधन वारी
जगण्याचा आधार म्हणजे वारी
वैष्णवाचा मेळा वारी
उत्साहाचा झरा वारी
भक्तीचा मळा वारी
माऊलीचा स्पर्श म्हणजे वारी
अखंड नामाचा गजर वारी
व्यवस्थापनाचा कळस वारी
सामाजिक सलोखा वारी
अमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी
मानवतेचे उत्तुंग दर्शन वारी
निरपेक्षपणाचे लक्षण वारी
अध्यात्माचे सुगम दर्शन वारी
संताचे पवित्र अधिष्ठान म्हणजे वारी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे!
छान आहे!
धन्यवाद शाली!!! आपला प्रतिसाद
धन्यवाद शाली!!! आपला प्रतिसाद मला उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!