Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39
काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.
एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.
अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.
तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वॉलेटमधे नोटा एकसारख्या
मला वॉलेटमधे नोटा एकसारख्या लावून ठेवायची सवय आहे. शिवाय नोटाना पडलेल्या घड्या सरळ करणे >>>>> नोटा क्रमवार लावायच्या.५००,२००,१००,वगैरे << हे सगळेच करतात ना?
मी नाही करत.
मी नाही करत.
माझ्या नवर्याला पण नोटा सरळ
माझ्या नवर्याला पण नोटा सरळ लावण्याची सवय आहे. कधी खरेदीला वैगरे एकत्र गेलो का खुप वैताग येतो मला त्याच्या या सवयीचा. प्रत्येक ठिकाणी हा दुकानदाराने परत दिलेले पैसे आधी दुमडलेली नोट (कोपऱ्यात अगदी छोटी दुमड असेल तरी) सरळ करणार, मग त्या सरळ करणार म्हंजे एकावर एक ती पांढरी बाजू असते ती ठेवणार. नंतर स्वतःकडे असलेल्या नोटा काढुन, दुकानदारने दिलेल्या नोटा त्यात रकमेप्रमाणे लावुन ठेवणार म्हणजे १०० रा वर १०० ची नोट, ५०० वर ५०० ची असे. आणि हे सगळं अगदी आरामशीर अजिबात घाई गडबड नाही. बरं हे एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी सेम. मार्केटला गेल्यावर भरपूर खरेदी असते तेव्हा खुप चिडचिड होते माझी. तशी हल्ली सवय झाल्यामुळे आता मला जास्त काही वाटत नाही उलट दुकानदारांचे 'हे काय चाललयं?' चेहरे बघून करमणूक होते.
>> लोल.
हे वाचून अगदीच राहवलं नाही. हा धागा आठवला. हॅट्स ऑफ टू फारएण्ड.
सगळ्या कमेंटस भारी आहेत.
मेधाविंच्या या काही खास.
१ , २ , ३ , ४
मला काहीपण झालं की हात
मला काहीपण झालं की हात धुण्याची सवय आहे..कधी कधी तर या सवयीमुळे सर्दिपण होते
माईल्ड ओसीडी असू शकते.
माईल्ड ओसीडी असू शकते.
माझ्या काही फार वाईट सवयी
माझ्या काही फार वाईट सवयी आहेत.
१. कुठेही बाहेर चहा पिण्या अगोदर वास घेणे. मनाची तयारी
२. सोबत नेहमी खाऊचे डब्बे बाळगणे - मनुका , खारका, चिक्की काहीपण
३. पोरगी झाल्यापासून आता ५ वर्षाची झाली तरी निघताना तिची चड्डी सोबत ठेवणे. एकदा माझ्या purse मधून चुकून रुमाल ऐवजी तिची चड्डी बाहेर आली
४. कामांची लिस्ट बनवणे . sat ला उठून पाहिलं तेच काम . डोक्यात सुद्धा लिस्ट असतेच
कामांची लिस्ट बनवणे . sat ला
कामांची लिस्ट बनवणे . sat ला उठून पाहिलं तेच काम . डोक्यात सुद्धा लिस्ट असतेच
>>> ही चांगली सवय आहे की
अमानवीय, मला पडणारी स्वप्ने
अमानवीय, मला पडणारी स्वप्ने नंतर बेहद्द आवडलेला धागा.
माझ्या काही वाईट सवयी
१. दान धर्म करणे
२. अडल्या नडलेल्यांना मदत करणे
३. परस्त्री मातेसमान या ब्रीदशी एकनिष्ठ राहणे
४. दारू न पिणे
५. बिडी न पिणे
६. नेहमी खरे बोलणे
७. प्रामाणिकपणाने वागणे
८. कष्टाच्या पैशाव्यतिरिक्त कुठच्याही दमडीला हातही न लावणे
९. रहदारीची शिस्त पाळणे
१०. प्राणिमात्रांवर दया करणे
११. नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतकार्यात सहभागी होणे
१२. युद्ध आदी प्रसंगी सैन्याचे मनोबल वाढवणे
१३. सबसिडी नाकारणे
१४. देशभक्त असणे. थेटरात जन गण मण सुरू झाले की उठून उभे राहणे
अजून ब-याच वाईट सवयी आहेत. अशाच लिहायच्या आहेत ना ?
Sat ची list कधीच पूर्ण होत
Sat ची list कधीच पूर्ण होत नाही. नंतर जाम helpless वाटत.
नेहमी लिस्ट बनवून ती घरीच
नेहमी लिस्ट बनवून ती घरीच विसरणे.
भन्नाट आहे धागा व प्रतिसाद..
भन्नाट आहे धागा व प्रतिसाद..
नखे कुरतडण्याची वईट्ट सवय
नखे कुरतडण्याची वईट्ट सवय
शरीराला प्रथिनं कमी पडले तर
शरीराला प्रथिनं कमी पडले तर नकळत माणूस नखे कुरतडतो असे ऐकले आहे.
<आॅफिसला जाता-येता समोर
<आॅफिसला जाता-येता समोर चाललेल्या वाहनक्रमांकातील अंकांची बेरीज करणे. बर्याचदा त्यातल्या दोन अथवा तीन अंकांची बेरीज = चौथ्या अंक असते. याची इतकी सवय झालीय की अशी बेरीज जुळणार्या चारपाच गाड्या मिळाल्या की मनात कुठेतरी बरे वाटते किंवा आॅफिसात पोहचेपर्यंत एकही असे वाहन मिळाले नाही तर काहीतरी राहिल्यासारखे वाटते. ट्रेन सोडून रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करायची वेळ आल्यावर बस, रिक्शा, दुचाकी, चारचाकी, टॅक्सीने प्रवास करताना ट्रॅफिकमध्ये काहीतरी चाळा म्हणून ही सवय लागली ती अजून आहे.>>>।
ही सवय मलाही आहे. सतत त्या चार नंबरांमधला संबंध शोधत राहणे, हा चाळा सतत सुरु असतो.
बाकी सवयी म्हणजे पायात सॉक्स घालूनच झोपणे, कुठलाही ऋतू असो.
वर कोणीतरी लिहीलंय तसं चालतांना चौकोनी फरशी असेल तर कटाक्षाने मधल्या रेषांवर पाय न देता चालणे.
टॉयलेट्स आणी बाथरुम ओसीडी असल्यागत स्पॉटलेस आणी ड्राय लागतात. त्यामुळे हल्ली हॉटेल्स मधे रहायची वेळ आली तर सेपरेट रुम बूक करते.
Pages