ईपुस्तके आणि मराठी साहित्य

Submitted by वाचनप्रेमी on 4 July, 2018 - 01:47

ईपुस्तके आणि मराठी साहित्य

बुकगंगावर नुकतंच एक ईबुक विकत घेतलं. बुकगंगाचं ईबुक बुकगंगा रीडरमधून वाचावं लागतं, म्हणून बुकगंगा रीडरसुद्धा install केलं. ईबुक म्हटलं की epub किंवा kindle च्या format मधलं पुस्तक अपेक्षित असतं. त्यात नाईट रीडिंग व font कमीजास्त केल्यास अक्षरांच्या फ्री flow ची सुविधा असते. त्यामुळे अक्षरे मोबाईल स्क्रीनच्या बाहेर जायचा प्रश्न उद्भवत नाही. पण इथे तर चक्क पुस्तकाची स्कॅन केलेली कॉपी ईबुक म्हणून खपवली होती. font मोठा केल्यास pdf फाईलप्रमाणे अक्षरे स्क्रीनच्या बाहेर निघून जातात. सध्यातरी या धक्क्यातून सावरतो आहे.
मराठी साहित्यात सध्यातरी मेहता व साकेत प्रकाशनाचीच ईपुस्तके प्रामुख्याने दिसत आहेत. ईबुकच्या बाबतीत इतर मराठी प्रकाशक एवढे उदासीन का आहेत ते कळत नाही.
खरंतर ईबुकमुळे निर्मिती खर्च बराच कमी होऊन (ई) पुस्तकं वाचकांना स्वस्तात उपलब्ध करून देता येतील. पायरसीची भीती वाटत असेल, तर तीसुद्धा तितकी खरी वाटत नाही. पीडीएफ फॉरमॅटमधल्या पुस्तकांची पायरसी सोपी असू शकेल. पण किंडल किंवा इतर प्रोप्रायटरी बुक रीडरमध्ये उपलब्ध असलेलया ई पुस्तकांची पायरसी होणे कठीण वाटते. अर्थात त्या क्षेत्रातील जाणकार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

Group content visibility: 
Use group defaults

.

<कारण किंडल किंवा इतर प्रोप्रायटरी बुक रीडरमध्ये उपलब्ध असलेलया ई पुस्तकांची पायरसी होणे कठीण वाटते.>
आजिबात कठीण नाही. एका टिचकीवर किंडलवरील पुस्तक इपब, मोबि व पिडीएफ या तीनही फॉरमॅट्समध्ये उपलब्ध होते. असे अ‍ॅप्स आहेत.

http://www.esahity.com/ प्रसारासाठी जर तुम्ही दहा वाचकांचे इमेल आय डी त्यांना कळविले तर तुम्हाला व्हिआयपी दर्जा मिळून , प्राधान्याने तुमच्याकडे सर्वात अगोदर पुस्तके पाठवीली जातात.