कला क्षेत्रातली गुणवत्ता लोप पावत चालली आहे ?

Submitted by पशुपत on 29 June, 2018 - 07:32

मला बर्याच पूर्वीपासून एक गोष्ट जाणवते.
सर्व क्षेत्रात, गुणवत्ता मिळवणे किंवा उत्तमतेचा ध्यास घेणे हे समाजातून , माणसातून दिवसेंदिवस कमी होत चाललय. उलट्पक्षी प्रेझेंटेशन उत्क्रुष्ठ करणे याकडे सगळ्यांचा कल दिसतो.
याचाच आणखी एक चेहेरा म्हणजे , कसेही करून यश मिळवणे !

गंमत म्हणजे या सगळ्यात जे अपवादात्मक आहेत , सर्वसाधारणांपेक्षा उत्तम आहेत , ते यशस्वी होताना दिसत नाहीत.

कुणी एक सर्वोत्तम म्हणून टिकून रहात नाही , आणि सर्वसाधारण गुणवत्ता असलेले खूप लोक थोड्या काळासाठी चमकतात आणि लुप्त होतात.

उदाहरण घ्यायच तर साहित्य क्षेत्राचं घेता येइल. पूर्वी पु. ल. , अत्रे , शिरवाडकर , जी.ए., श्री.ना., ( नमुन्यादाखल काही नावे घेत आहे) अशी नावे होती. त्यांच्या लिखाणात सातत्य होते , गुणवत्ता होती. त्यांच्या हयातभर त्यांचे लेखन हे लोकप्रियतेत राहिले.
संगीतात सुधीर फडके , खळे , मंगेशकर कुटूंब , कुमार , भीमसेनजी अशी नावे होती.

आता च्या काळात नावे खूप दिसतील पण सातत्य नाही ... कामगिरीही उत्तमतेचे शिखर गाठणारी नाही....
काय असावे याचे कारण ?
चिंतन करण्याची , अथक कठोर परिश्रम घेण्याची , ध्येयासाठी झोकून देण्याची मानसिकता लोपली आहे ? लांब पल्ले गाठण्याचे स्वप्न पाहण्याचा धीर नाही म्हणून ?
का समाजातून गुरू लोप पावताहेत ? गुरुकुलाची जागा क्लासेसनी घेतली आहे म्हणून ?

विचार करण्याची गोष्ट आहे ......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

~ ऋन्मेष ~

धागा आणि प्रतिसाद वाचून मनात आलेले काही विचार -

1) बहुतांश लोकांना कला म्हटले की सर्वप्रथम संगीतच आठवते. किंवा त्यानंतर मग लिखाण ..
पण अभिनयकला, नृत्यकला, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला... काहीतरी 64 वगैरे कला आहेत ना.. मग आढावा सगळ्यांचाच घ्यायला हवा.

2) लता मंगेशकर सहस्त्र वर्षात एकदाच कधीतरी जन्माला येतात. आणि त्या ऑलरेडी येऊन झाल्या आहेत. आता उगाच त्यालाच बेंचमार्क बनवत ईतर पिढ्यांना सरसकट बाद करण्यात काही अर्थ नाही.
पण हे अपवाद झाले. प्रत्येक कला क्षेत्रात असे होत नाही. उदाहरणार्थ दिलीपकुमार गेला राजेश खन्ना आला, तो गेला पुढे अमिताभ आला आणि आता शाहरूख.. उद्या त्याचीही जागा कोणी घेईलच. जसे खेळातही क्रिकेटमध्ये गावस्कर सचिन कोहली पुढे आणखी कोणीतरी..

3) माझा धागा होता एक, संगीताचा दर्जा घसरला आहे या आशयाचा. कारण मेलोडी हरवलीय संगीतातील. पण याचे कारण गुणवत्तेचा अभाव असे नसून डिमांड तसे सप्लाय होत असावा.
वर क्रिकेटचा उल्लेख केला आहे. ते उदाहरण समजायला सोपे आहे. सध्या क्रिकेटमध्ये 20-20 ला डिमांड आहे. त्यामुळे युवा पिढीत ज्या कडे टॅलेंट आहे तो 20-20 ला लागणारे कौशल्य आत्मसात करायला बघणार.
जर प्रेक्षकांनी 20-20 बघायचे सोडले. कसोटीला डिमांड आला तर येत्या पिढीत कसोटीपटू निपजतील.

4) हल्ली कलाकार भरनसाठ झाले आहेत. गुणवान कलाकारही या ढिगारयातच लपले आहेत. ते या यातून शोधावे लागतील. मार्केटींगचा जमाना आहे. तुमच्या समोर कमी दर्जाची कला जास्त जोरात आदळली जाणार. त्याला बाजूला सारत शोधकाम करावे लागणार.

5) तुम्हाला जर नाचायचे असेल तर तुम्हाला झिंगाट, मल्हारी अशीच गाणी हवीत. न जाओ सैय्या छुडाके बैय्या वर तुम्ही नाचू शकत नाही. संगीत प्रत्येक मूडला साजेसे हवे. खरे तर हल्ली नवनवीन प्रकारचे भरमसाठ संगीत मिळू लागले आहे हा प्लस आहे. पण परत तेच, आपल्या आवडीचे वेचता आले पाहिजे. जे समोर दिसतेय ते बघत बसलो त्र त्यात 90 टक्के तुमच्या नावडीचे सापडू शकतो.

6) तंत्रज्ञानाची प्रगती कलेला मारक ठरू शकते. सध्या त्याची क्रेझ आहे. पण हा काळ सरला की लोकं पुन्हा कलेच्या मागे धावणार. जे नैसर्गिक असते तेच चिरंतन टिकते.

7) तारुण्यातील कलाकृती... प्रत्येकाला आपल्या तारुण्यातील गाणी चित्रपट संगीत नेहमीच भारी वाटते. कारण ते अनुभव त्यांनी वयाच्या सोनेरी टप्प्यावर घेतले असतात. तटस्थपणे कलेचे मोजमाप सोपे नाही.

कधीतरी डान्स इंडिया डान्स मध्ये १० टाईट कपडे धारी स्पर्धक न जाओ सैय्या छुडाके बैय्या वर पिरॅमिड फॉर्मेशन्स आणि मध्येच कोलांट्या उड्या, कार्टव्हिल वगैरे असलेले अती कठीण नृत्य बसवून भभा यांचा ग्रह खोटा ठरवतील आणि जजाच्या खुर्चीवर बसलेले कोणीतरी 'सुपब एनर्जी.सुपब मूव्ह्ज' म्हणून त्यांना पहिले निवडून देईल :):)

गुणवत्ता लोप पावली आहे असे दिसत नाही. आपल्या आजूबाजूला आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप चांगले गाणारे किंवा इतर कला असलेले लोक खूप आहेत आणि त्यांना एक्स्पोजर मिळत आहे. पण त्या त्या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले लोक १०-२०-३० वर्षांपूर्वी जे लोक होते त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत का? तर तसे वाटत नाही.

गावसकर-कपिल-सचिन-कोहली - यात कोठे ग्राफ कमी झालेला नाही. असल्याच वाढलेलाच असेल.

लता, रफी, किशोर वगैरे जुने झाले. पण साधारण गेल्या ३० वर्षांतील गायक/गायिका पाहिले तर उलट सध्या जास्त चांगले आहेत. संगीतकार जास्त चांगले आहेत. गीतलेखक तर सध्या खूप सुंदर गाणी लिहीत आहेत - अमिताभ भट्टाचार्य, इर्शाद कामिल वगैरे लोक.

बाकी इतर कलांबद्दल त्या त्या कलांचे जाणकार जास्त चांगले सांगू शकतील. बाकी खलीबलीचा उल्लेख वरती आला आहे. ते भंकसच आहे. पण झिंगाट हे अत्यंत मेहनतीने उभे केले असणार. अगदी अस्सल वाटणारे गाणे, नाच आणि वातावरण कृत्रिम रीत्या उभे करणे सोपे नाही.

खलीबली मला आवडतं ऐकायला.पाहिलं नाही अजून.
म्युझिक आणि आवाज दोन्ही आवडतं.
अरिजित सिंग चा अतिरेक सोडून नवी गाणी पण आवडतात.जास्त करून पंजाबी नसून चांगले बिट्स असलेली असतील तर आवडतात.(पंजाबी बोल आणि चाल वाली प्रचंड बोअर होतात.)

टीव्ही शोज , रिअ‍ॅलिटी शोज जे डान्सेस सादर होतात त्याबद्दल न बोललेले बरे. यात नृत्य खूपच कमी आहे. अ‍ॅथलेटिक्सचा वापर जास्त आहे. हा बदल का आणि कसा आला हे सांगता येणार नाही. अशा वेळी डोकं बाजूला ठेवून बदल आत्मसात करावा लागतो. जे विकलं जातं ते जर नाही दिलं तर तुम्ही बाहेर फेकले जाणार ही भीती असते. हे सगळं एस्टॅब्लीश होत जातं अशा पद्धतीने.

इथे या चर्चेत कोणत्याही कलाकाराला कमी लेखण्याचा हेतू बिलकूल नाही . विषय आहे उत्क्रुष्ठतेच्या शिखराप्रत नेणार्या गुणवत्ते बद्दलचा.
कदाचित धाग्याचे नाव "कलेतल्या गुणवत्तेच्या शिखराची उंची कमी झाली आहे का !" असे मला अभिप्रेत होते .

काही मुद्दे , जे वरील चर्चेतून उद्भवलेले !
१. संख्या वाढली की गुणवत्ता कमी होते हा निसर्गनियमच आहे त्यामुळे तसे झाले नाही म्हणण्यात अर्थ नाही.
२. झटकन यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट घेण्याच्या मानसीकतेमुळे कलाकाराच्या मनात मुळातच गुणवत्तेला दुय्यमस्थान मिळते.
३. आजकाल विविध स्पर्धांमधे यशस्वी होणारे त्या "यशस्वीतेच्या सोहळ्यातच" रमतात , त्याना उत्तमतेच्या शोधाच्या पुढच्या प्रवासाचे विस्मरण होते ; as if they already have arrived at the summit !
पुढे लवकरच ते लुप्त होतात .
४. कलेतली "तांत्रिकता" खूप वाढली आहे. त्याला विविध कारणे आहेत. दैनंदीन जीवनात उप्लब्ध असलेली असलेली विविध यंत्रसाधने , communication क्षेत्रातल्या प्रगतीमुळे होणारे sharing , या सगळ्यामुळे विद्या आत्मसात करण्याला लागणार्या काळात झालेली घट ...
पण याचा परिणाम असा झाला कि विशिष्ठ दर्जापर्यंत खूप जास्त संख्येने कलाकार खूप लवकर पोहोचतात आणि तिथेच स्थिरावतात - रमतात.
उत्तमतेच्या शोधाचा प्रवास खरे तर तिथून सुरू होतो. उत्क्रुश्ठतेचे नवे मापदंड त्यानीच उभे करायचे असतात ... स्वतःसाठीच ! जे मी उदाहरणादाखल घेतलेल्य्या कलाकारांच्या बाबतीत सहज दिसते. ते आता घडताना दिसत नाही.

Pages