Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25
गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.
नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.
मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या वरच्या लिंक मध्ये चांगलं
त्या वरच्या लिंक मध्ये चांगलं डिटेलवार लिवलंय दक्षे...
मुंबई वगळता महाराष्ट्रामधे
मुंबई वगळता महाराष्ट्रामधे एमएसईबी जे दर आकारते ते शहरी आणि ग्रामीण भागाला वेगवेगळे आहेत. कृषी साठी वेगळा दर आहे.
शहरी भागातले दर खालीलप्रमाणे
१ ते १०० युनिट्स - रु . १.४० पैसे
१ ते ३०० युनिट्स - रु ३.४० पैसे ( १०० युनिटच्या पुढे एकूण वापर असल्यास सरसकट दर )
१ ते ५०० युनिट्स - रु. ५.५० ( ३०० युनिटच्या पुढे एकूण वापर असल्यास सरसकट दर )
१ ते ७०० युनिट्स - रु ७.८० पैसे ( ५०० युनिटच्या पुढे एकूण वापर असल्यास सरसकट दर )
१ ते १००० युनिट्स - ११.२० पैसे ( ७०० युनिटच्या पुढे एकूण वापर असल्यास सरसकट दर )
१००० च्या पुढे गेल्यास सर्व युनिट्स - १३.७० पैसे
वरचे दर मेमरीतून लिहीलेले आहेत. थोडासा फरक होऊ शकतो.
युनिट्चा टप्पा ओलांडला की जे काही रीडींग आहे त्या सर्व युनिट्सला त्या टप्प्याचा दर लागू होतो. समजा शंभर युनिटच्या वर गेले तर पहिल्या शंभरला १.४० आणि वर ३.४० अशी आकारणी होत नाही.
त्यामुळे वीजवापर थोडासा जरी वाढला की बिल जास्त येतं.
मुंबईतले दर वेगळे आहेत असे ऐकून आहे. म्हणून विचारणा केली.
अरे हो, हे संडास बाथरूम
अरे हो, हे संडास बाथरूम किचनचे फॅन राहिलेच.
बाकी पाच पंखे 4 रूम्समध्ये आहेत. हॉल 300-350,स्क्वेअरफिट असल्याने दोन पंखे.
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 13 June, 2018 - 10:53
>>
भाऊ हे घर नंबर किती? १, २ का ३ ?
मागील अवताराला स्मरून सांगा.
दोन पंखे असलेलं छत कित्ती
दोन पंखे असलेलं छत कित्ती सुंदर दिसत असेल ना ?
भभा , कृपया फोटो टाका ना ....
मुंबई, ठाणे परिसरात एव्हढे मोठे घर असणारा व्यक्ती अतीश्रीमंत म्हणायला हवा. अभिमान वाटला की अशा व्यक्तीच्या संपर्कात मायबोलीमुळे येता आलं. जय मायबोली !
दोन पंखे आणिक एक झुंबर असलेलं
दोन पंखे आणिक एक झुंबर असलेलं छत आहे माझ्या फ्लॅट च्या लिविंग रूम मध्ये... फ्लॅट पुण्यात आहे मात्र
मधुर, हॉल आडवा असेल तर दोन
मधुर, हॉल आडवा असेल तर दोन पंखे लावावे लागतात हॉल मध्ये. माझ्याही हॉल मध्ये आहेत. हॉल फारसा मोठा नाहीय 20 फूट बाय 12 फूट असेल. फॅन मध्ये असेल तर त्याची हवा पूर्ण हॉलभर पुरत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूला लावावे लागतात.
सेम केस, माझ्या फ्लॅट ची
सेम केस, माझ्या फ्लॅट ची लिव्हिंग रूम १५ बाय १९ ची आहे आणि तिथेही २ पंखे लावल्याशिवाय पर्याय नव्हता. आधी सेंटर ला १४००एमएम चा एकच मोठा फॅन होता पण त्याची हवा पुरेशी नव्हतीच...
असो, फारच विषयांतर झालंय ऑलरेडी या धाग्यावर.
साधना, तू काय ठरवलंयस फ्रीज बद्द्ल शेवटी? इथे नक्की कळव आणि नंतर वीजबिलात काही फरक आलाय का ते ही!
बहुधा निर्णय झाला असेल एव्हाना...
माझ्या मते सरळ नवीनच पाहावा आणि त्यातही फ्रीजर खाली असलेला पाहा, खरोखरीच फार उपयोगी मॉडेल असतं ते. संपूर्ण फ्रीज एरीया आपल्या एका दृष्टीक्षेपात येतो, भाज्यांचा ट्रे कमरेच्या हाईटला असल्यानी त्यातही एका नजरेत सगळं बसतं.
साधना, तू काय ठरवलंयस फ्रीज
साधना, तू काय ठरवलंयस फ्रीज बद्द्ल शेवटी? इथे नक्की कळव आणि नंतर वीजबिलात काही फरक आलाय का ते ही!>>>
महिनाभर थांबायचे असे ठरलेय पण फ्रिज घ्यावा लागणारच. टीव्हीसारखा मोडीत काढून जमणार नाही. सध्याइतका मोठा घेणार नाही, वेळ भरपूर असल्यामुळे मॉडेल बघणार आणि फॉर या चेंज, फ्रीझर खाली असलेलाच घेणार
जे काय होईल ते इथे नक्कीच लिहिणार.
साधनाताई , तुमचा हॉल देखणा
साधनाताई , तुमचा हॉल देखणा आहे. झुंबर आवडले.
९९+१ = शंभर.
९९+१ = शंभर.
@ साधनाताई, वाढदिवसाच्या
@ साधनाताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वि मु, धन्यवाद
वि मु, धन्यवाद

सकाळी वीज मंडळाकडून या महिन्यातल्या युनिट वापराचा समस आला तेव्हा या लेखाची आठवण झाली.
घरी फ्रिज 25 जून ला आला. त्यानंतर जुलै महिन्यात 124 युनिटवापराचे बिल आले. आज सकाळच्या समस मध्ये 122 युनिट्स बिल केल्याचे कळले. एवढ्या युनिट्सचे बिल जवळपास 800 रुपयांच्या आसपास येईल. या आधी 1200 रुपयांच्या खाली कधीही आले नव्हते. जास्त व्होल्टेज खाणाऱ्या फ्रिजच्या कपाळी हे 400 रुपयांचे मडके आरामात फोडता येईल.
पण हो नाही करता फ्रिज मात्र मोठाच घेतला गेला. गरज व वापर कमी म्हणून लहान फ्रिज शोधत होते. त्या साईजमध्ये सिंगल डोअर फ्रिज होते, डबल डोअर नव्हते. सिंगल डोअर मध्ये फ्रॉस्ट फ्री फारसे येत नाहीत अथवा आम्ही जी तीन दुकाने पाहिली त्यात सिंगल डोअर फ्रॉस्ट फ्री नव्हते. दुकानात नसले की विक्रेते बनतच नाही म्हणून सांगून मोकळे होतात.
डबल डोअर 200-250 लिटर फ्रिजच्या व 300 लिटर पुढच्या फ्रिजच्या किमतीच्या तुलनेत विजवापरात तितकी बचत नाही असे वाटले. आधी मोठा फ्रिज वापरायची सवय असल्याने घरच्या मंडळींच्या डोळ्यांना 200-250 लिटर फ्रिज खूपच लहान वाटत होते. शेवटी पनासोनिक एकोनावी BL सिरीज, 336 लिटर फ्रिज घेतला. 3 स्टार, 249 युनिट्स वापर. रु. 35,000 ला क्रोमातून घेतला. आत जागा भरपूर आहे, भाज्यांसाठीचा ट्रेमध्ये तर जागाच जागा. मी तशाही फक्त 2-3 दिवसासाठीच्या भाज्या एकदम घेत असल्याने त्यात भाज्यांशिवाय इतर सामानही आरामात राहते. आवाज अजिबात करत नाही. याला वेगळा व्होल्टेज स्टेबिलाईझर लागत नाही. बघू कसा चालतो ते. याचा डेमो दयायला जो बाबा आलेला त्याने रिपोर्ट चांगला आहे म्हणून सांगितले.
त्या निमित्ते बाजारात किती सुंदर फ्रिज आलेत हे पाहायला मिळाले. बॉटम फ्रिजरमध्ये खूप चांगले पर्याय आहेत पण 400 लिटर च्या पुढची मॉडेल्स मिळत होती. कपाटासारखी दोन दरवाजे असलेले फ्रिजही पाहिले व त्यांच्या प्रेमात पडले. पण तेही सगळे 450 लिटरच्या पुढे होते. मोठे फ्रिज ही गरज असल्यास खूप चांगली मॉडेल्स सध्या बाजारात आहेत.
मुंबई वगळता महाराष्ट्रामधे
ग्रामीण व शहरी भागात एकच दर आहे. मी दोन्हीकडची बिले भरते. शेतीचा दर माहीत नाही. ते बिलही येते घरी पण मी अजून पाहिले नाही.
01.04.2018 पासून दर:
Fix Charges(Rs): 65
Unit 0-100 101-300 301-500 501-1000 >1000
(Rs) 3.07 6.81 9.76 11.25 12.53
FAC(Rs) 0.19 0.33 0.44 0.51 0.55
या व्यतिरिक्त व्हीलिंग चार्जेस व इलेक्ट्रिसिटी ड्युटी आहे.
तुम्ही अजिबात वापर केला नाही तर फिक्स चार्ज रु 65 बिल येते.
मुंबईतले दर वेगळे आहेत असे ऐकून आहे. म्हणून विचारणा केली.>>>>>>>>
मुंबईत मराविमं नाही, रिलायन्स व टाटा आहेत.
कपाटासारखी दोन दरवाजे असलेले
कपाटासारखी दोन दरवाजे असलेले फ्रिजही पाहिले व त्यांच्या प्रेमात पडले. ---- me too
finally, 2016ला घेतला. बहुतेक 50k पर्यंत मिळाला. शिवाय जबरजस्ती zero finance मिळालं, एक swarosky सेट मिळाला
अजूनही तितक्याच प्रेमात आहे
एका ठिकाणी पोचा आलाय movers मुळे 
मी पहिल्यांदा तसा फ्रिज भारतात 2003 ला पाहिला. तेव्हा दीड का पावणे-दोन लाख किंमत होती. तेव्हा तर गरज नव्हती आणि परवडणार पण नव्हता. कधितरी पुढे नक्की घ्यायचा ठरवलं होतं
राजसी, ग्रेट. लकी यु.. खरेच
राजसी, ग्रेट. लकी यु.. खरेच प्रेमात पडण्यासारखा आहे. किमती 50 60 ते 80 हजारच्या रेंजपर्यंत होत्या.
आमचा फ्रिज आता १२ वर्षाचा आहे
आमचा फ्रिज आता १२ वर्षाचा आहे. अजून नीट चालतो.पण आता इतका जुना आहे की घरात शोभत नाही.
नवर्याचं म्हणणं आहे बदलावा.माझं म्हणणं आहे चांगल्या फ्रिज रंगवणार्या रंगार्याकडून मस्त ब्राऊन्/मरुन रंगवून अजून काही वर्षे चालवावा.
इथे कोणाचा फ्रिज रंगवण्याचा अनुभव आहे का?
मुंबईत मराविमं नाही, रिलायन्स
मुंबईत मराविमं नाही, रिलायन्स व टाटा आहेत....
(ऋन्म्याच्या!) दक्षिण मुंबईत 'बेस्ट' वीज पुरवते, तर पश्चिम उपनगरात रिलायन्स आणि टाटा वीज पुरवते. पूर्व उपनगरात बहुतेक मराविमं आहे, नक्की माहित नाही.
कपाटासारखे दरवाजे असणाऱ्या फ्रीजमध्ये एक सुविधा मिळते जी खूप छान आहे. त्याच्या एका दरवाज्याला बाहेरील बाजूने एक छोटा नळ असतो (water dispenser) आणि आतल्या बाजूला एक छोटा tank असतो. त्यात पाणी भरून ठेवले की पाणी गार होऊन बाहेरील नळातून थंड पाणी मिळते. पण हे फ्रीज अजूनही खूप महाग आहेत.
काही वर्षांपूर्वी बहुतेक गोदरेजनेच music system असणारा फ्रीज बनवला होता, ज्यात FM radio ची व्यवस्था होती. हा फ्रीज कोणी वापरला आहे का?
माझा गोदरेजचा होता त्यात
माझा गोदरेजचा होता त्यात फ्रिज 0.5 मिनीटापेक्षा जास्त वेळ उघडा राहिला तर संगीत वाजायचे.
30 वर्षांपूर्वी kelvinator का कुठल्याश्या ब्रँडने बाहेर पाण्याची सोय दिलेली फ्रीजमध्ये. तो usp होता त्यांचा.
Ok, दक्षिण मुंबईत बेस्ट
Ok, दक्षिण मुंबईत बेस्ट अजूनही वीज देते का? मला वाटले त्यांचे साम्राज्य लयास गेले. मी मुंबई सबर्ब्समध्ये राहात होते तेव्हा bses वीज द्यायची. त्यांचे भलेमोठे ऑफिस घरातून दिसायचे. ते आता रिलायन्सने घेतले, ती बिल्डिंग इतकी चकचकीत केली की माझ्यासारख्या अधून मधून फेरी मारणाऱ्यांना आपण कुठल्या भागात आलो चुकून असे वाटायला लागते.

Mseb बहुतेक मुलुंडपासून पुढे आहे.
धन्यवाद. टुअर /वस्तुखरेदी
धन्यवाद. टुअर /वस्तुखरेदी इत्यादिंचा सल्ला मागवून नंतर काय केले हे सर्वजण लिहितातच असे नाही. ते लिहिले की सल्ला देणाऱ्यांचा उत्साह वाढतो.
(काहींचे व्यनि/इमेल येतात प्रवासाच्या माहितीबद्दल पण जाऊन आल्यावर कळवत नाहीत.)
> काही वर्षांपूर्वी बहुतेक
> काही वर्षांपूर्वी बहुतेक गोदरेजनेच music system असणारा फ्रीज बनवला होता, ज्यात FM radio ची व्यवस्था होती. हा फ्रीज कोणी वापरला आहे का? > https://m.mysmartprice.com/appliance/godrej-rd-edgesx-185-pm-2.2-muzipla... हा का? माझ्याकडे आहे. २०११ कि १२ ला घेतला. चांगला चालू आहे अजूनही. तेव्हा विजवापरसाठी ५*होते. आता २* दिसत आहे. म्हणजे रेटिंग कसे द्यायचे त्याचे criteria बदलत रहात असणार.
पूर्व उपनगरात बहुतेक मराविमं
इथे कोणाचा फ्रिज रंगवण्याचा अनुभव आहे का?..>>>>>> आईचा फ्रीझ रंगवला होता,तो कित्येक वर्षांत चांगला होता.
मी अनु, तुमही रंगवण्यापेक्षा नवीन घ्यावा.आपल्यलाच फ्रेश वाटते.
<तुमही रंगवण्यापेक्षा नवीन
<तुमही रंगवण्यापेक्षा नवीन घ्यावा.आपल्यलाच फ्रेश वाटते.>
फ्रीजमध्ये राहायचंय की काय?
असलेली वस्तू रिपेयर करण्याच्या पलीकडे जात नाही किंवा रिपेयरचा खर्च मोठा असून त्याचा परिणाम किती काळ दिसेल, याची शाश्वती नसेल तरच नवी वस्तू घ्यावी, असा माझा भारतीय /मराठी मध्यमवर्गीय दृष्टिकोन.
एकाचा अनुभव असा की फ्रिज
एकाचा अनुभव असा की फ्रिज रंगवायला पाठवला आणि त्याच्या पितळी नळ्यांना घासताना क्रॅक गेला असावा. कारण नंतर तो बिघडायला लागला.
( मागच्या बाजूस नाही रंगवला नाही तरी चालेल. अर्थात नंतर रंगकाम करणाऱ्यांचा स्प्रेपेंट कारवाल्यांसाखाच असतो. कंपनीचे मूळचे रंगकाम भट्टी पेंट असते ते मिळत नाहीच.)
मी जो रंगवलेला फ्रिज बघितलाय
मी जो रंगवलेला फ्रिज बघितलाय ती काही छान दिसत नव्हता. कळत होतं रंग दिल्याचं. एकदा प्रोफेशनल क्लिनर कडून क्लीन करून बघा.
ओके.क्लिनिंग चा इश्यू नाही
ओके.क्लिनिंग चा इश्यू नाही.पांढरा आहे तो.आणि मध्ये मध्ये गंजलेले पॅच.
बहुतेक बदलावाच लागेल.माझ्या आई आणि साबा प्रमाणेच 'पूर्वीसारखी यंत्रं आता बनत नाहीत' यावर माझा घोर (अंध) विश्वास आहे.म्हणजे बाहेरून मस्त दिसतात पण आतून फंक्शनिंग/लॉंग टर्म स्टेबिलिटी पूर्वीसारखी नसते.
शक्य तितकी जुनी यंत्रे चालवण्याकडे कल असतो.
नवा घ्यायचा तर हिताचीचा खाली भाज्यांना मोठा ड्रॉवर,बाहेरून सेपरेट दाराने उघडता येणारा असलेला आवडला आहे.हायर चा स्वस्त आहे पण हायर चा अनुभव चांगला नाही.
Ohh, rusted patches means new
Ohh, rusted patches means new fridge.
पूर्वीसारखी यंत्रं आता बनत नाहीत' --- me too believe that. Plus our handling is also rough compared to earlier generation. Maid handling of these machines also adds age to its life.
माझ्या आई आणि साबा प्रमाणेच
माझ्या आई आणि साबा प्रमाणेच 'पूर्वीसारखी यंत्रं आता बनत नाहीत' यावर माझा घोर (अंध) विश्वास आहे.+१
वॉशिंग मशीनच्या डॉक्टरनेच हे सांगितलंय.
मायक्रोवेव्हने प्रचीती दिलीय.
बिघडला तर स्पेअर पार्टस मिळणे कठीण.
टर्नोव्हर वाढवा, जीडीपी ग्रोथला हातभार लावा.
इथे कोणाचा फ्रिज रंगवण्याचा
इथे कोणाचा फ्रिज रंगवण्याचा अनुभव आहे का?
<<
अम्माजान वर फ्रीजला लावायची स्टिकर्स्/सेल्फ अडेसिव्ह डिकॅल उर्फ वॉलपेपर असतात. हे चिकटवून फ्रीज झकास अन नवा होईल.
स्टिकर चिकटवताना स्प्रे कॅनमधे थोडा साबण घातलेले पाणी भरून त्याचा स्प्रे आधी मारावा व वरतून स्टिकर चिकटवावे. म्हणजे घड्या/गुढ्या/बुडबुडे तयार होत नाहीत, पाणी वाळले, की आपोआप स्टिकर घट्ट चिकटते.
***
रंगवायचाच असेल, तर स्प्रे कॅन्स मिळतात. शक्यतो मॅचिंग कलरची कॅन घेऊन घरच्याघरी स्प्रे करा. स्प्रे करताना नाकाला रुमाल, डोळ्याला चष्मा विसरू नका. इतर आजूबाजूच्या गोष्टी वर्तमानपत्राने कव्हर करा. शक्यतो फ्रीजला बाहेर बाल्कनी/टेरेसवर नेउन हा उद्योग करा. पण रंगाचे टवके उडालेले असतील तर प्रोफेशनल कार पेंटर (Car रंगवणारा) हवा. पत्र्यावर आधी त्यांच्या भाषेत 'कार्पेच' नावाची लांबी भरलेली असते, ती घासून मग रंगाचा स्प्रे दिलेला असतो.
माझ्यासारखे हौशी डी.आय.व्हाय. करता येईलच, पण करायला गेलो गणपती, अन झाला मारुती.. अशी गत होऊ शकते.
आरारा, छान सल्ले
आरारा, छान सल्ले
फक्त गंजलेल्या पॅच वर फार काही करता येणार नाही.
स्टिकर बघते.
Pages