फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा की फ्रिजच बदलावा?

Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25

गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.

नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.

मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे जेव्हा ऑफिसमध्ये हे बिल सांगितलेले तेव्हा लोकांनी सहानुभुती देणे तर दूर उलट विजेची नासाडी आणि गैरवापर करत असणार म्हणून फैलावर घेतलेले.>>>>>

तेव्हाच विजमंडळाच्या ऑफिसात जाऊन तक्रार करायला हवीय कारण आपले बिल इतरांपेक्षा खूप जास्त येतंय हे कळायला हवे होते.

जाऊदे, तेव्हा माबोवर धागे काढणे व काढलेल्या धाग्यावर वेळ घालवणे हे महत्वाचे काम होते. आता तरी जागे होऊन पैसे वाचवा.

बिलाची तुलना करताना घराचा एरिया ,खोल्यांची संख्या, माणसांची संख्या, त्यांचा घरात असण्याचा वेळ या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

हो. आणि कित्येकदा लोक लाइट फॅन लावून बंद करायला विसरतात हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. बिल त्यानेही वाढते. ज्या गोष्टी रिमोटने चालू बंद होतात, जसे म्युसिक सिस्टीम, टीव्ही, एसी वगैरे स्टँडबाय मोडवरही वीज खातात. त्यामुळे वीज वाचवायची तर लाईट बटन प्रत्यक्ष बंद हवे.

किती युनिटला किती बिल हे मला ठाऊक आहे. तो तक्ता छापील बिलावरही दिला असतो. शाळेतही त्यानुसार आकडेमोड करायचा छंद होता. प्रश्न आहे तितके युनिट खरेच जाळले गेले का. याचे उत्तर सध्या तरी येस वाटतेय. तरी बघतो आजूबाजुच्यांचे किती बिल येते आणि किती वापर करतात. नाहीतर तक्रार करायला फार पैसे पडत नसतील तर करून ठेवतो.

मधुरांबे,
पाच पंखे शेजारी शेजारी लावले आहेत का ?
कि संडास बाथरूम मधे पण लावलेले धरून ?
>>>
अरे हो, हे संडास बाथरूम किचनचे फॅन राहिलेच.
बाकी पाच पंखे 4 रूम्समध्ये आहेत. हॉल 300-350,स्क्वेअरफिट असल्याने दोन पंखे.

महिन्याला 7-8 हजार वीजबिल येतेय व ते परवडतेय मग मध्यमवर्गीय कसले?
>>>>
परवडत असे नाही. पण प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या खर्चाच्या प्रायोरीटी वेगळ्या असतात. कोणी कपड्यांवर खर्च करते तर कोणी हॉटेलिंगवर, कोणी पोरांच्या शिक्षणावर तर कोणी मौजमजेवर.. प्रत्येकाचे सेविंगचे कन्सेप्टही भिन्न असतात.. असो. बोलायला फार मोठा विषय आहे. ईथे अवांतर होईल

बाकी पाच पंखे 4 रूम्समध्ये आहेत. हॉल 300-350,स्क्वेअरफिट असल्याने दोन पंखे. >>> मुंबईत आहात का ? तुमच्या घरी गेट टूगेदर ठेवायला काही हरकत नाही ना ?

साधना सर्व चर्चा वाचली. फ्रिज घेताना पुढील दहा पंधरा वर्शे काय गरजा अस णार आहेत त्याचा विचार करून घ्यावा. सध्यात माझ्या कडे हायर कंपनीचा फ्रीझर खाली असलेला फ्रीज आहे उत्तम सर्विस. घेतला तेव्हा वर्किंग मदर शाळेत जाणा री मुलगी अशी सिचुएशन होती. त्यामुळे आस्वपू करोन फ्रिज भरलेला असे. हर तर्‍हेचे फ्रोजन फूड घरी उप लब्ध असे मी टूरवर जाई किंवा कामावर असे तेव्हा मेड करून देउ शकेल असे पदार्थ, सॉसेजेस, अंडी, मॅरिनेट केलेले पदार्थ ह्यांनी फ्रिज भरलेला असे.

आता ते फारसे नाही. एकट्याला लागत नाही त्यामुळे आता मी परत घेइन तेव्हा छोटा बेसिक फ्रिज घेइन. मीतर दूधही घेत नाही. दही, पाण्याच्या बाटल्या, मिरची कोथिंबीर टाइप वस्तू असतात. अर्धा पाव किलोच्यावर ग्रोसरीच घेत नाही. एकून किचन वरचे लोड कमी आहे. मार्केटात एक अगदी छोटा स्क्वेअर शेप फ्रिज पण येतो जसा हॉटेल मध्ये असतो. हा फ्रिज बेडरूम मध्ये ठेवल्यास उन्हाळ्यात गार पाणी, थंडगा र द्राक्षे, आंबे कापलेले, नारळ पाणी, सरबत, चॉकोलेट्स किम्वा हर्शे चॉकिलेट स्प्रेड , नटेला असले आयटेम , आइसक्रीम इत्यादी ठेवता येतात व टीव्ही बघत आरा मात तिथल्या तिथे घेउन खाता येतात. बेडरूम व किचन मध्ये फार अंतर असल्यास दमल्या वर कंटाळा येतो तेव्हा इथले सलाड, ब्रेड बटर चीज घेउन खाता येते.

ही मला लक्षरी वाटत नाही. आपण मेहनत तर कर्तो मग थोडे लाड केले स्वतःचे तर काय हरकत आहे? पण हा वेगळ्या बाफचा विषय आहे.

तुम्ही फ्रिज घेतलात की आम्हाला आइसक्रीम पार्टी द्या.

@साहिल,

आमच्या सोसायटीत 3.5bhk, 4.5bhk घरं आहेत. प्रत्येक रूममध्ये कमितकमी एक 15 ऍम्पिअरचा सॉकेट आहे एसीसाठी, मास्टर बेडरूम मध्ये फ्रिजसाठी पॉइंट्स आहेत, जितके बेडरुम तितकेच बाथरुम, त्यात गिझरसाठी पॉईंट, काहीजणांनी सर्वनट्स रुममधेपन बाथरूम घेतले आहे त्यातला गिझर पॉईंट, परत वॉशिंग मशीन, अक्वागार्ड, मायक्रोवेव्ह साठीचे पॉइंट्स.
हे सगळे सिंगल फेजवर एकाच वेळी चालू शकेल का शंका आहे. बिल्डरने नीट गणित करूनच थ्री फेज दिले असावे.

===
@उपाशी बोका,

Biggrin आणि त्या धाग्यावर आपापला पेट्रोलचा खर्च किती येतो याबद्दल लोक चर्चा करतील Wink

===
@अमा,

तो छुटकुसा फ्रिज घ्यायचा विचार मीपण करत होते. पण 2011 साली त्याचे energy consumption 200 लिटरच्या 5* रेटिंग फ्रिजपेक्षा कितीतरी जास्त होते. म्हणून मग मोठाच फ्रिज घेतला.

अमा, खरेतर आता तोच विचार सुरू आहे. सध्याचा 300 लिटरचा आहे पण आता तेवढा मोठा गरजेचा आहे असे वाटत नाही. अन्नाचा प्रश्नच नाही पण इतर जे सटर फटर फ्रिजमध्ये ठेवत होते तेतरी का ठेवावे हा प्रश्न पडतोय आता... फ्रिजशिवाय अजून थोडे दिवस गेले तर अजून काहीबाही वाटायला लागेल...

टिव्हीही असाच, बिघडला तेव्हा आता ledच घ्यायचा म्हणून रिपेअर न करता देऊन टाकला (घेऊन जाणाऱ्याच्या घरी तो आजही उत्तम सेवा देतोय). मग घेऊ घेऊ करत राहून गेले आणि नंतर गरजच संपून गेली म्हणून घेतलाच नाही.

बेडरूममधे फ्रीझ ठेवल्यावर फ्रीजच्या कॉम्प्रेसरने गरम केलेली हवा एसी वापरून पुन्हा गार करायचा खर्च मोजायला विसरू नका.

आरारा मग फ्रिज विंडो एसीसारखा बसवायचा.
<<
जोक्स अपार्ट.
फार पूर्वी (गरीबीच्या काळात) हॉटेलमधे राहताना विण्डो एसी च्या ब्लोअरला बांधून बियर कॅन गार करायची ट्याक्टीक सापडली होती Wink

फार पूर्वी (गरीबीच्या काळात) हॉटेलमधे राहताना विण्डो एसी च्या ब्लोअरला बांधून बियर कॅन गार करायची ट्याक्टीक सापडली होती Wink>. अय्या खरेच. झर्‍यामध्ये ठेवलेली शांपेन ची बाटली. नॉन एसी कार मधून फिरताना ओला नॅपकिन करून काचेतून घट्ट फिट करून बसवलेला. दोज वेअर द डेज. आमच्याकडे शेती कामासाठी कंपनीने दिलेली सॉफ्ट टोप जिप्सी होती. त्यामुळे एसी इल्ले. परवा अचानक जाग्वार मध्ये बसाय चा योग आला बाहेर उतरल्यावर मी स्वत लाच चिमटा घेतला. क्या एसी, क्या क्वायेट पर्फॉरमन्स. वा वा.

माझे पण टीव्ही ची गरज नाही असेच झाले आहे. सर्व लॅप टॉप वर दिसते त्याहूनही बेटर फोन वर काम होते . प्लेस्टेशन पुरता त्या टीव्हीचा उपयोग. मावे कार्सिनोजेनिक म्हणून बंद. चांगले बेकिंग केलेले पदार्थ आता बॅन म्हणून अव्हन चा उपयोग नाही.

मी आता बेड रुमात एक इले़ क्ट्रिक किटली आहेच ती ठे व णार आहे. चहा बनवायला किचन मध्ये जायचे म्हणजे कुत्र्याची झोपमोड होते. ( हे नायतर हिर नाय मोडत मोड मध्ये वाचावे. )

आजच आमच्या तिथे सकाळी दोन एसी एकदम चालू होते. व मी बाहेर पडल्यापडल्या गेम्स खेळायला टीव्ही लावला तर एक फेज उडाली. ती आता रिपेअर झाली आहे. लोड आले सिस्टीम वर. माझे बिल इंडक्षन कुक टॉप दोन गीझर
दोन एसी एक फ्रिज दोन तीन पंखे सकट उन्हाळ्यात ३००० व एरवी १२०० ते १६०० येते. माझा एनर्जी युसेज इतकाच आहे. मला यायला उशीर झाला अंधार पडला तर म्हणून एक लाइट फॅन व रेडिओ चालू ठेवून जाते.

Capture2.JPGच्यामारी एव्हढे नंबर टाकयचे हे पाहुनच घाम फुटला, त्या एक चुकला तर परत सगळे टायपायचे काय? जाउदे आपले पोस्ट्पेडच बरे आहे

रेट माहीत नाहीत, आता भावाकडे गेले की त्याचे बिल पाहायला हवे. पण तिथे चॉईस आहे म्हणे. रिलायन्स की टाटा हा. मुंबई वगळता सगळीकडे mseb.

ऐन वेळेला रिचार्ज खतम झाला तर काय पर्याय आहे यात दक्षे? की बॅलन्स कमी असं काही नोटिफिकेशन येतं त्या लहान डिव्हाईसवर (कारण ते बाहेर पार्किंगमध्ये असल्यानी विजिबल आहे)? फोन वर तर नाही येणार काही नोटिफिकेशन कारण कुठे वेब कनेक्टिविटी नाहीय या प्रोसेस मध्ये. >>
योकु मीटरात १०० रु. उरत आले की मीटर बिप बिप करू लागते. फोन वर वगैरे नोटिफिकेशन येत नाही. तशी काही सोय नाही. आपणच स्वयंस्फुर्तीने थोड्या थोड्या दिवसांनी चेक करत रहायला लागते. शिवाय (-१००) पर्यंत वीज राहते आणि मग बंद होते. पुढचा रिचार्ज केला की ते १०० रू. वजा करून वीज मंडळ उरलेल्याची रक्कम जमा करते.

मीटरात १०० रु. उरत आले की मीटर बिप बिप करू लागते.
>>>>
याचा विडिओ टाकता येईल का?
अगदी टाईमबाम सारखे वाटत असेल ना Happy

मग कठीण आहे. मी सहसा वेळेत बिल भरून डिस्काउंट मिळवते पण कधी कधी 2 महिन्याचे थकते. मग mseb वाला फोन करून 'ताई बिल भराहो बिगी बिगी नैतर मला येऊन लाईट कापावी लागेल' असे दोन तीनदा फोन करतो तेव्हा बिल भरले जाते. मटेनिलीचेही तेच. दोन महिने बिल थकले तर ते डेटा बंद करतात, व्हॉइस सुरू राहतो. मग डेटा का बंद केला नालायकांनी म्हणत कंप्लॅन्ट करायला जावे तेव्हा अररर, बिल तर भAरलेच नाही हे लक्षात येते.

भारतात घरगुती वापरासाठी 3 फेज का, कधी देतात याचे उत्तर इथे सापडले:

https://www.bijlibachao.com/electricity-bill/what-are-single-phase-and-t...

But I have a three-phase connection and my electricity distribution company assigned me that?
After reading the above explanation, a few people may think that I do not run so many ACs together, then why has my distribution company assigned me a three-phase connection? Well it is quite interesting to note, that in North America, as a rule three-phase connections are meant only for commercial and industrial connections and residential connections are always assigned single-phase connections. But in India we have observed with most distribution companies that if the residential connected load is more than 5-7 kW, they assign a three-phase connection to that house. And typically connected load is evaluated by assuming that a certain percentage of all the appliances in your house will run together. So if you have 3 ACs and few water heaters and even if you do not run them together, a three-phase connection will be assigned to you. The reason for that is, in case you run them together, it will have potential to bring down the electricity distribution system.

Ok, म्हणजे बिल्डरने जर तीन बेडरूम वाली घरे बांधली तर तुम्हाला तो 3 फेज देणार, तुम्ही तीन एसी वापरणार हे गृहीत धरून.

अदर वे राऊंड... तुम्ही किती अप्लायंसेस वापराल त्याचा विचार करून ३ फेज देतील, इर्र्रिस्पेक्टीव ऑफ नंबर ऑफ रूम्स, एरीया इ...

Pages