Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25
गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.
नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.
मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बजेटचे काही बंधन नसेल तर नवीन
बजेटचे काही बंधन नसेल तर नवीन फ्रीज घ्या.
आमचा जुना फ्रिज कधीचाच
आमचा जुना फ्रिज कधीचाच कायद्याने सज्ञान आणि मतदान करण्यास पात्र झाला आहे. पण अजूनपर्यंत काही तक्रार येणे तर दूर, आता कुठे तारुण्यात पदार्पण केलेय असेच त्याच्याकडे बघून वाटते.
तरीही केवळ ईसवी सन वीसेक वर्षांपूर्वीचे मॉडेल बघून बघून निव्वळ वैताग आल्याने आम्ही लेटेस्ट मॉडेलचा आणखी एक फ्रिज घेतला.
आणि आता दोन्ही वापरतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॉरल - पैसा असेल तर तो खर्च करत राहावा !
पैसा नसेल तर बाद झालेला फ्रिजही फेकून न देता कपाट म्हणून वापरावा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो' माणूस गोदरेजचाच होता का?
तो' माणूस गोदरेजचाच होता का?
गोदरेरेजवाल्यांचे अधुनमधून इक्चेंज ओफर फोन येत असतात.
१) दुसय्रा एका इले पॅाइंटमध्ये चालू होतो का पाहा. कुलर सेटिंग अगदी लो ठेवा.
कॉम्प्रेसरचे आयुष्य वीस वर्षे
कॉम्प्रेसरचे आयुष्य वीस वर्षे (सरासरी ) असते. बाकी फ्रीज मधे कॉईल्स आणि वेगवेगळे सेक्शन्स असतात. बॉडी सडलेली नसेल, इन्स्युलेशन चांगल्या स्थितीत असेल आणि कॉईल्स खराब झाल्या नसतील तर कॉम्प्रेसर बदलून घेतला तरी चालेल. कंपनी कडून पैसे देऊन फ्रीज तपासून घ्या. बीईआर असेल तर दुसरा घ्या.
Srd, गोदरेज नाही बोलावला,
Srd, गोदरेज नाही बोलावला, लोकल बोलावला करण इतक्या वर्षांमुळे आता वारंटी, गॅरंटी काहीच शिल्लक नाही.
मधुराआंबे, b E R म्हणजे काय? एनर्जी efficiency? हा 2001-2002 मध्ये कधीतरी घेतलाय, त्यावर 5 स्टारवाला स्टिकर नाहीय.
आज रिपेअर करणार्याशी बोलून घेइन पण नक्की काय करायचे ते ठरत नाहीय. गोदरेज फ्रिज वीज युनिट जास्त खातात हेही ऐकून आहे. घरात रेडिओ, टीव्ही नाही, दिवसभर कुणी नसते तरीही बिल कधीच 1200 च्या खाली येत नाही. इलेक्टरीशीयनला विचारले होते, तो म्हणालेला की गोदरेज फ्रिज असेल तर बिल जास्त येते. त्यामुळे फ्रिज रिपेअर करून नवा घ्यायचा खर्च टाळावा की नवीन घेऊन विजेच्या बिलात कायमस्वरूपी बचत करावी हाही मुद्दा आहेच.
ह्या निमित्ताने मी या उपकरणांवर किती अवलंबून आहे हे परत एकदा कळले. निसर्गाकडे चला म्हणून मी कितीही बोलले तरी आज फ्रिज बंद पडलाय तर भाजी, दूध, साय वगैरे नाशवंत वस्तू सांभाळणे किती जिकिरीचे आहे हे कळतेय. दोन दिवस घरात होते तर दूध तीनदा तापवुन सांभाळले, आज कठीण आहे. टोप पाण्यात ठेऊन जाईन. बाकी सकाळचे जेवण सकाळीच संपवून जावे लागेल.
BER = Beyond economical
BER = Beyond economical Repair
२१ वर्षांच्या माझ्या गोदरेज
२१ वर्षांच्या माझ्या गोदरेज फ्रीझचा कॉम्प्रेसर १६ वर्षांपूर्वी बदलला होता.मस्त चालतोय.पण मला आता त्याचा कंटाळा आला आहे.पण दुसरा घ्यायचा तर आजूबालूल तोडफोड करावी लागेल म्हणून टाळतेय.
साधना, तुम्हाला चान्स आलाय तर खरंच नवीन घ्या.
रेडिओ, टीव्ही,फ्रीज यांपेक्षा इस्त्री, गीझर,मिक्सर,ए.सी यांच्या वापराने वीजबिलात खूप फरक पडतो.
बेबे १२०० रुपये वीज बिल?
बेबे १२०० रुपये वीज बिल?
ताबडतोब बदल फ्रिज.
माझ्या मैत्रिणी कडे असलेल्या सिंगल डोअर फ्रिज मधल्या फ्रिजर चे डोअर मोडले होते. भरमसाठ बिल, त्यातून तो गोदरेज चा होता. बिल ८०० आणि वरच. मी खूप सल्ला दिला तरिही तिने तो बदलायचा तेव्हाच्च बदलला आणि आता मस्त, विजबिल एकदम कमी.
माझ्याकडे व्हर्लपूल चा फ्रिज आहे. डबल डोअर.. आणि आमच्याकडे पीपेड इलेक्ट्रिसिटी आहे पण महिन्याचा खर्च ३०० रुपये (डोक्यावरून पाणी)
आणि माझ्याकडे एसी सोडून सर्व काही आहे.
आमच्याकडे पीपेड इलेक्ट्रिसिटी
आमच्याकडे पीपेड इलेक्ट्रिसिटी आहे पण महिन्याचा खर्च ३०० रुपये (डोक्यावरून पाणी)>>>. रियली दक्षिणा?
दक्षे मस्तच गं.
दक्षे मस्तच गं.
साधना, लाईटबिल खूप येत असेल तर नवीन घेतलेला बरा फ्रीज.
फ्रिज बदला
फ्रिज बदला
कॉंप्रेसर 5 energy star
कॉंप्रेसर 5 energy star असलेला टाका. बिल कमी होते.
>> घरात रेडिओ, टीव्ही नाही,
>> घरात रेडिओ, टीव्ही नाही, दिवसभर कुणी नसते तरीही बिल कधीच 1200 च्या खाली येत नाही
हि समस्या मलाही आहे. माझा फ्रीज सुद्धा पंधरा वर्षे जुना आहे. पण गोदरेज नाही व्हर्लपूलचा आहे. होम यूपीएस असल्याने बिल येत असेलसे वाटत होते. ते बंद केले तरीही बिल तितकेच. इतर अनेक शक्यता (फ्रीज टीव्ही वगैरे) असू शकतात असे वाटले. पण शेजारीपाजारी ज्यांच्याकडे फ्रीज टीव्ही आहे त्या इतरांना इतके बिल येत नाही. अखेर मीटरचा प्रॉब्लेम असेल अशी समजूत झाल्याने बीज कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या. अर्थातच अजूनही कोणी आलेले नाही.
>> गोदरेज नाही बोलावला, लोकल बोलावला
याबाबत जस्ट डायल अॅप चा अनुभव चांगला आला. रिपेअरी करणाऱ्या आसपासच्या लोकांचे भराभर फोन येतात. तुम्हाला वणवण करावी लागत नाही. पण कॉम्प्रेसर ओरिजिनल आहे का, किती वॉरंटी आहे इत्यादी तपासून घ्या. दुरुस्त केल्यानंतर त्यावर दुरुस्त केलेली तारीख त्यांच्याकडून लिहून घ्या. नक्की किती पैसे घेणार (मजुरी, व्हिजिटिंग चार्जेस, कर इत्यादी सहित) हे आधीच ठरवा. हे लोक नंतर अव्वाच्या सव्वा बिल लावतात आणि "तुम्ही आधी का नाही विचारले?' म्हणून नंतर वाद घालत बसतात. रिपेअर करणाऱ्या लोकांशी डील करताना याबाबत फार सावधगिरीच बाळगावी लागते असा माझा अनुभव आहे. मायक्रोवेव्ह दुरुस्त करायला एकाने दीड हजार रुपये घेतले. पण नंतर धड सहा महिने सुद्धा चालला नाही. पुन्हा दीड हजार.
1200 आणि 800 जास्त...??
1200 आणि 800 जास्त...??
महिन्याचे फक्त 300 ??
या पोस्ट आमच्या घरी दाखवायला हव्यात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमचे साधारण बिल 3.5-4 हजार यायचे ..
मागचे उन्हाळ्याच्या महिन्यात 8 हजार आले.. आणि उडालोच
मग आम्ही एसीची सर्विसिंग करून घेतली. ईतर मार्गांनी वीज वाचवायचा प्रयत्न करू लागलो..
त्याला यश येत यण्दाचे बिल साडेसहा हजार आले फक्त ..
जर हजार बाराशे बिल आले तर आम्ही आनंदाने वेडेच होऊ.. वर्षभराच्या बचतीत फ्रिज ओवन वॉशिंगमशीन वगैरे घेता येतील दरवर्षाला
दक्षे फक्त ३००? अग काय गावात
दक्षे फक्त ३००? अग काय गावात राहतेस काय? गावातहि इतकं कमी नाहि येत.. आमचं २.५ आलं महिन्याचं याच रेंजमध्ये असतं..
Skip to main content
.1200 आणि 800 जास्त...??
महिन्याचे फक्त 300 ??
या पोस्ट आमच्या घरी दाखवायला हव्यात..
आमचे साधारण बिल 3.5-4 हजार यायचे ..
मागचे उन्हाळ्याच्या महिन्यात 8 हजार आले.. आणि उडालोच
मग आम्ही एसीची सर्विसिंग करून घेतली. ईतर मार्गांनी वीज वाचवायचा प्रयत्न करू लागलो..
त्याला यश येत यण्दाचे बिल साडेसहा हजार आले फक्त ..
जर हजार बाराशे बिल आले तर आम्ही आनंदाने वेडेच होऊ.. वर्षभराच्या बचतीत फ्रिज ओवन वॉशिंगमशीन वगैरे घेता येतील दरवर्षाला Happy>>>>> same pinch
फ्रिज बदलायचा की कॉम्प्रेसर
फ्रिज बदलायचा की कॉम्प्रेसर ह्याचा निर्णय अजून झाला नाही पण त्या निमित्ते एक तुलना करता येईल असे वाटते.
मुंबईबाहेरचे आपण सगळेच mseb चे ग्राहक आहोत व रेट सगळीकडे सारखाच आहे. माझी बहिण सावंतवाडीला राहते. तिचे बिल 1000 च्या आसपास येई. घरात दिवसभर टीव्ही चालु, बाकी 2 माणसांच्या 1 बेडरूम हॉल मधले दिवे, गिझर, फॅन, इस्त्री, वाशिंग मशीन हे रोजचे वापरातले.
तिने विजेचा गिझर बंद करून गॅस गिझर बसवला. 5000 च्या आसपास खर्च आला. पण बिल 1000 च्या आसपास येई ते फटकन 350-450 झाले. अर्थात गर्मीत एसी लावतात तेव्हा जास्त येतो. घरात फक्त 2 माणसे असल्यामुळे गॅसचा इतका खर्च होत नाही, तिला 1 सिलेंडर सैपाकघरात 2 महिने व 1 सिलेंडर बाथरूमात 6 महिने पुरतो. माणसे जास्त असतील तर गॅस गिझर व पॉवर गिझर तितकेच महाग पडतील.
आता अनायासे फ्रिज बंद आहे तर मला फ्रिज व गिझर बंद असताना बिल किती येईल हे तपासता येईल. बघते कितपत जमतंय. फ्रिज नसेल तर हाल होताहेत हे नक्की पण विजवापरावर याचा किती परिणाम हे कळेल.
दक्षिणाचे 300 रुपये बरोबर वाटतेय. ज्यांचे जास्त येतेय त्यांनी वीज गळती नक्की कुठे हे बघा. आणि 100-200-300 असे युनिट्स वापराचे रेट दुप्पट होत जातात, त्यामुळं वापर जितका जास्त तितका तुम्हाला लागू होणारा रेट जास्त हेही ध्यानात घ्यायला हवे.
दक्षिणा फक्त 99 युनिट्स वापरत असेल तर तिला 3 रु च्या आसपास दराने बिल येईल. तेच 201 युनिट्स वापरले तर पहिले 100 युनिट्स 3 रुच्या आसपास व पुढचे 101 युनिट्स 6.75 रु दराच्या आसपास असे बिलिंग होईल. याचा बिलावर खूप परिणाम होतो. म्हणजे 100 युनिट्ससाठी जिथे 300 रु भरावे लागतात तिथे 210 युनिट्स साठी 900 च्या आसपास बिल येणार.
इलेक्ट्रिसिटी ड्युटी 16 टक्के व व्हिलिंग चार्जेस पर युनिट आहेत. वापर जितका जास्त तितके व्हीलिंग चार्जेस जास्त.
दक्षिणा घरात माणसे किती आहेत?
दक्षिणा घरात माणसे किती आहेत?
मेक्स सेन्स.
मेक्स सेन्स.
फ्रीज किती मोठाय यावरही त्याचं वीज खाणं ठरतं काय?
माझ्या कडे २ महिन्यांपर्यंत एक ४०० लीटर्स चा फ्रीज फक्त सुरू असायचा दिनरात, तरी बील ८००/- वगैरे यायचं. हो, फ्रीज गोदरेजचा आहे.
आता गेल्या महिन्यापासून बाकी पब्लीकही घरात असल्यानं १४००/- आलंय बिल. अर्थात कूलर, पंखे जास्तच वापरल्यानी हे झालंय हे ही त्यात आहेच.
नोट - घरात सगळे (अक्षरशः सगळे) दिवे हे एलईडी आहेत आणि एकही दिवा २० वॉट च्या वरचा नाहीय.
मोठा टिव्ही (४० इंचाच्या पुढला) असेल तरी वीज जास्त लागते का ?
हे असं का होतंय नकळे...![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
, दोनदा ३००/- चं रिचार्ज मारत असेल ती महिन्यात...
आणि हो दक्षी गुंडाळतेय
इथे आहे Consumption
इथे आहे Consumption Calculator for a Month महावितरणने दिलेला. यावरून आपले बिल किती यायला हवे काढता येईल:
https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getApplianceParticulars
Mseb च्या साईटवर बिल
Mseb च्या साईटवर बिल calculater आहे। त्यावर फक्त एनर्जी चार्ज कुठल्याही इतर भाराशिवाय इतके येते
100 युनिट्स 307 रु
200 युनिट्स। 988 रु
300 युनिट्स। 1669 रु
400 युनिट्स 2645 रु
500 युनिट्स 3621 रु
यात 16 टक्के ड्युटी, सव्वा रुपया युनिट व्हीलिंग वगैरे टाकले की डोक्यावरन पाणी
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, फ्रिज किती मोठा यावर खाणे
हो, फ्रिज किती मोठा यावर खाणे ठरते.
माठावर ओले फडके टाकून आत
माठावर ओले फडके टाकून आत भाज्या ठेवा. टिकतात.
लाल विविटां एकावर एक ठेवा. आकार पिरॅमिड्सारका हव्. बेस व उंची यांचे गुणोत्तर 22/7 हवे. विटांवर पाणी मारा. आत ठेवलेल्या वस्तू ताज्या राहतात.
दक्षे फक्त ३००? अग काय गावात
दक्षे फक्त ३००? अग काय गावात राहतेस काय? गावातहि इतकं कमी नाहि येत.. आमचं २.५ आलं महिन्याचं याच रेंजमध्ये असतं.. >> मी नेहमी २००० रु चा रिचार्ज करते. ऑन अॅन्ड अॅव्हरेज मला ३०० च्या आसपास खर्च येतो.
२ ऑक्टोबर ला मी २००० चा रिचार्ज केला, त्यावर १४ फेब ला जेव्हा माझ्या खात्यात अजूनही ११३ रु शिल्लक होते तेव्हा दुसरा केला.
५ जुन ला २५७ रु शिल्लक असताना अजुन २००० चा केला कारण घरात वेल्डिंग, ड्रिलिंग चे काम होणार होते त्याला विज लागणार होती.
करा हिशोब.
उन्हाळ्यात कंटिन्युअस पंखा सुरू (घरी असेन तेव्हा) आणि टिव्हि किंवा रेडिओ तर सुरूच असतो सतत. ( घरी अस्ताना पुर्ण वेळ)
आणि हो दक्षी गुंडाळतेय Light
आणि हो दक्षी गुंडाळतेय Light 1 , दोनदा ३००/- चं रिचार्ज मारत असेल ती महिन्यात... >> योक्या फटके टाकिन तुला
माठावर ओले फडके टाकून आत
माठावर ओले फडके टाकून आत भाज्या ठेवा. टिकतात.>>>
थँक्स...
बरं मी गुंडाळतेय असं वाटत
बरं मी गुंडाळतेय असं वाटत असेल तर ५०० रुपये महिना पकडा, त्या उप्पर तर नक्कीच जात नाही माझा खर्च.
२००० चा रिचार्ज मला ४ ते साडे चार महिने सहज जातो.
हा धिस फील्स रिअलिस्टिक...
हा धिस फील्स रिअलिस्टिक...
दुसर्या कुठल्या कार्णाक्रता ठेव
फटके पेंडिंग हा आता
योक्या जेव्हा रिचार्ज मारतो
योक्या जेव्हा रिचार्ज मारतो तेव्हा अख्खे २००० आपल्या खात्यात जात नाहित, जवळ जवळ शंभर सव्वाशे कट होतात. दुसरं म्हणजे दर महिन्याला ३० का ४० रुपये कट होते भाड्यापोटी.. नक्की काय काय कट होते ते नीट पाहून सांगेनच.
हे सर्व पकडून माझा युसेज नक्कीच कमी आहे.
ही रिचार्ज वाली वीज पण mseb
ही रिचार्ज वाली वीज पण mseb देते का?
Pages