सेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल)

Submitted by हरिहर. on 7 June, 2018 - 03:27

मी पहिल्यांदाच 'सेल्फ पोर्ट्रेट'चा प्रयत्न केला आहे. वेळेची मर्यादा घालून घेतली होती आणि पेन्सिलचा कमित कमी वापर करायचा असं ठरवले होते. संदर्भासाठी समोर पासपोर्ट साईज फोटो होता. अपलोड करताना पेपरला ग्रे-शेड दिली. पांढरा फारच खुपत होता डोळ्याला. ईतर एडिटींग नाही. मला फारसे आवडले नाही. जाणकारांनी काय हवे होते आणि काय टाळायला हवे होते हे सांगितले बरे वाटेल. तुम्हाला आवडेल असे वाटते.

harihar.jpg

याच पोर्ट्रेटवर 0.5 पेनने 'पेन-वर्क केले आताच आणि पेन्सिल वर्क खोडरबरने खोडून टाकले. ते ही चित्र येथे देतो आहे. या पेन-वर्कला मात्र फक्त अर्धा तास लागला. कारण पेन्सिल वर्कवरच काम केले त्यामुळे जास्त त्रास नाही झाला. पेन्सिल शेडींगचे चित्र मात्र गेले.

pen-work1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही चित्रे आवडली.

दुसऱ्या चित्रातली सही उर्दुमध्ये आहे. मला वाटतं, 'पद्मनाभ रंगनाथ' लिहिलं असावं.

@हिम्सकूल,
हो मी मोडी आणि ऊर्दुमध्ये सही करतो. शक्यतो मोडीतच करतो.

@सचिन काळे
हो, ही ऊर्दुमधेच सही आहे आणि 'पद्मनाभ रंगनाथ' असेच लिहिले आहे. तुम्हाला ऊर्दु येते वाटतं! अरे वा!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

पेन्सिल वर्क खोडून त्याच्यावर पेन वर्क केले, तर पेन्सिल पोर्ट्रेटवर तारीख १४-५-२०१८ आणि पेन पोर्ट्रेटवर तारीख ७-५-२०१८ कशी काय?

ते चुकून झाले आहे. लक्षात आले होते पण मग खाडाखोड नाही केली. याचा अर्थ तुम्ही बारकाईने पाहीलीत स्केचेस. खुप धन्यवाद!

खूप छान !
(पेनने करताना भुवुईवर जी उभी रेष आली आहे, त्याने चेहरा पेनसिलपेक्षा अकारण किंचित उग्र वाटतो, असं मला वाटतं )

Sonalisl, जाईजुई प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!
भाऊ, ही दोन्ही चित्रे सेल्फ पोर्ट्रेट म्हणून पुर्ण फसली आहेत. चित्र म्हणून तुम्ही नोंदवलेले निरिक्षण अगदी योग्य आहे. भुवयांवरच्या, डोळ्यांच्या कडेच्या, ओठांच्या बाजुच्या अशा रेषांमधूनच चेहऱ्यावरचे भाव दाखवतात शक्यतो. पण माझ्याकडे ते कौशल्य नाही आणि पेन फार गतीने फिरवलाय त्यामुळे असे झाले खरे. धन्यवाद!

<< ही दोन्ही चित्रे सेल्फ पोर्ट्रेट म्हणून पुर्ण फसली आहेत.>> असहमत. उलट प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे, कारण -१] << पहिल्यांदाच 'सेल्फ पोर्ट्रेट'चा प्रयत्न केला आहे. व २] << संदर्भासाठी समोर पासपोर्ट साईज फोटो होता. >>