लता स्वरपुष्प ३: सुनो सजना पपीहे ने

Submitted by अश्विनीमामी on 19 May, 2018 - 09:36

चैत्र महिना लागला, वसंत ऋतु येउ घातला आहे. मन व शरीर बधिर करणारा कृर गारठा संपून सर्वत्र नवे चैतन्य, नवे जीवन नवी हिरवळ उगवू पाहते आहे. सुकुमार बालिकेच्या जीवनातही प्रेमाचा उगम झाला आहे. कोणी तरी खास तरूण चेहरा मनासमोर तरळतो आहे. त्याच्याकडूनही उत्सुकतेची पावती मिळाली आहे. आता भेटायचे आहे त्या प्रियकराला, मनातील फुलासारख्या कोमल भावना त्याच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत. त्याच्या स्पर्शाच्या कल्पनेने शरीर मोहरते आहे. आणि ही कोकिळा कुहु कुहू करते आहे.

उत्तर भारतात हा मौसम आपल्या राकट देशापेक्षा उशीरा म्हणजे श्रावणात येतो. सस्यशामल धरती तेव्हा नाजूक हिरवी नक्षी अंगावर घेउन मिरवत असते. मीत शोधणारे प्रेमोत्सुक मन सजनाच्या दर्शनासाठी अधिर होते. त्यात हा पपिहा आवाज देतो आहे बघा.

पंजाबात मैं छत पे आ गयी चांद देखने के बहाने असा थेट प्रकार असतो. तर मध्य भारतातली शालीन मुलगी सजनाला म्हणते: सुनो सजना पपीहेने कहा सबसे पुकारके.......

ह्या आधी लताताईंनी जी तान घेतली आहे. .त्यावर दिल कुर्बान. कितीही त्रासलेले चिड्चिडलेले मन असले तरी त्या तानेच्या गारव्याने उल्हसित होते... निळ्या भोर आकाशात एखादी गुलाबी ओढणी स्वछंद लहरावी तशी ही तान आहे. लताच्या ओपनिंगच्या तानांबद्दल लिहिताना कल्पना शक्तीच्या लिमिट्स लगेच समोर येतात. आपण स्वतः ऐकूनच घ्या.

त्यात लक्ष्मी- प्यारे चे दिमाखदार संगीत व कंपोझिशन. आनंद बक्षींचे साधे, गुणगुणण्याजोगे शब्द
कुठे कमी नाही. स्वरलता स्वतः गातेय म्हटल्या वर सप्तसूर विनम्र पणे समोर उभे आहेत
सतार, संतूर, बासरी व्हायोलीन, साथ करायला उत्सुक आहेत. पाच मिनिटे ब्रेक घेउन हे गाणे ऐका मन प्रफुल्लित होउन जाईल बहार घरात अवतरेल.

सुनो सजना पपीहे कहा सबसे पुकारके
संभल जाउ चमन वालों के आये दिन बहार के.

सुनो सजना सुनो सजना

आता संतूर हल्की रिमझिम बरसात करते, एक बासरीची लट्की ओळ, मग व व्हायो लिन्स चा संच
एक पक्की फिनिश करतो.

गुलाब जाईजुई, चंपा चमेली, मधुमालती...

वार्‍यावर मंद झुलणारी बागेतली हर प्रकारची फुले पण हेच आतुरतेचे गीत गात आहेत
आता तो येणार व मला मिठीत घेणार.. स्वर्ग सूख यापरता वेगळे काय असते सखी.... ह्या हवेतच अनेक प्रेम कहाण्यांचा सुवास भरून राहिला आहे बघ.

फूलोंकी डालियांभी यही गीत गा रही है.
घडियां पिया मिलन की नजदीक आ रही है.
नजदीक आ रही है.

हवाओ नें जो छेडे हैं फसाने है वो प्यार के.
संभल जाओ चमन वालों के आये दिन बहार के.
सुनो सजना

आता सतार व बासरी थोडी जुगलबंदी आहे.

तो आला. आपल्या थेट व आव्हानात्मक नजरेने त्याने माझी शिकार केलीच आहे. असे नको बरे बघूस. लटका का होईना विरोध मी करायला हवा नाही का? पण तुझे प्रेमाने भरलेले कटाक्ष मला अस्वस्थ करतायत. अशाने मी स्वतःचे भान हरपून बसेन. आणि तुला तेच तर हवे आहे. मला देखिल...

देखो न ऐसे देखो मर्जी है क्या तुम्हारी.

बेचेन कर न देना तुमको कसम हमारी

हमीं दुशमन न बन जाये कहीं अपने करारके

व्हायोलिन चा संच आता पुढा कार घेतो.

हे श्रावणात गावाबाहेर उद्यानात आपल्याच मस्तीत झुल्णारे झोपाळे आपल्यासाठीच आहेत
ही वेळ, हे प्रेमाचे अजोड क्षण आपले आहेत. मीच काय कोणी ही ह्या शांत सुखद, प्रेमळ वातावरणात मोहित होउन इथेच राहायचा बेत करेल ह्यात नवल ते काय? मला तरी माझे सर्व श्वास ह्या पहिल्या उत्कट मीलनाच्या क्षणातच गुंतवायचे आहेत. पुढे जायचे नाही. मागे पहायचे नाही. हेच जीवन. तुझ्या मोहमयी मिठीत मी जीवन भर फुलत राहीन रे जिवलगा...

बागों पड गये है सावन के मस्त झूले
ऐसा समां जो देखा राही भी राह भूले

की जी चाहा यही रखदे उमर सारी गुजारके
संभल जाओ चमन वालों के आये दिन बहार के.

सुनो सजना सुनो सजना.

आता ह्या गाण्यासाठी लताचा आवाजच का? तर त्या भावनांमध्ये जी निख्ळ प्युरिटी आहे त्यासाठी तो आवाज आवश्यक आहे. आपल्या मनात भावनांचा कल्लोळ खूप चाललेला असतो पण शुद्ध प्रेम, त्यातील गोडवा, दोन जिवांची एकमेकांबरोबर सुखाचे नवे रस्ते शोधायची सुरुवात हे इतके खरे नैसर्गिक व वैश्विक आहे कि ते संगीतात उमटवायला हाच आरस्पानी निर्मळ आवाजाच स्त्रोत हवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता संतूर हल्की रिमझिम बरसात करते, >>>> मस्त.सुरेख लिहिलंय.गाणं ऐकताना किती सजगपणे गाणे ऐकलंत याचा वस्तुपाठ आहे.

नक्कीच.
ओ सजना बरखा बहार आयी बद्दल वाचायला आवडेल.

सुरेख गाणं. हे खास श्रवणभक्तीचंच गाणं आहे.
टिपेचे लख्ख सूर चकीत करतात. हीच गत 'अजी रूठकर अब कहा जाईयेगा' ऐकताना होते.
ती गळ्यानं जिथे असते तिथे कान पोचवतानादेखिल कष्ट पडतात.

>>>>निळ्या भोर आकाशात एखादी गुलाबी ओढणी स्वछंद लहरावी तशी ही तान आहे.
वाह!!! खरच गानकोकीळा आहे लता. ही उपमा अगदी चपखल.

फार सुंदर लिहिलं आहे.
>>निळ्या भोर आकाशात एखादी गुलाबी ओढणी स्वछंद लहरावी तशी ही तान आहे."
सुंदर.

अमा, ये दिल और उनकी निगाहोके साये ..वर लिहा ना प्लीज...>> हो गं ही मालिका परत सुरू करायची आहे. तीन चार गाणी डोक्यात पण होती. आता लिहि ते. मध्यंतरी आजाराच्या धक्क्याने सर्व च बंद पडलेले. उत्साहच नव्हता.

अवांतर - आज होशवालोंको खबर क्या ऐकत होते. कॉलेजवयीन झाल्यासारखे वाटले. खरे तर १९९९ मध्ये कॉलेजवयीन नव्हते पण इतकी फ्रेश ट्युन आहे ना.

WFH मधे मायबोलीवर येऊन एखादा लेख/कथा वाचली कि चांगला ब्रेक मिळतो. आता ह्या आवडत्या गाण्याबद्दल वाचले आणि खरंच दिन बन गया. तीन वेळा रिपीट मोड वर गाणे ऐकले, चहा प्यायले आणि फ्रेश होऊन बॅक टू वर्क. खूप छान लिहिले आहात अमा .

हो गं ही मालिका परत सुरू करायची आहे. तीन चार गाणी डोक्यात पण होती. आता लिहि ते. मध्यंतरी आजाराच्या धक्क्याने सर्व च बंद पडलेले. उत्साहच नव्हता.> काळजी घ्या आणि मालिका सुरु करायचे आता परत मनावर घ्या. खूप सुरेख लिहीता.

>>>>>>>>>>आपल्या मनात भावनांचा कल्लोळ खूप चाललेला असतो पण शुद्ध प्रेम, त्यातील गोडवा, दोन जिवांची एकमेकांबरोबर सुखाचे नवे रस्ते शोधायची सुरुवात हे इतके खरे नैसर्गिक व वैश्विक आहे कि ते संगीतात उमटवायला हाच आरस्पानी निर्मळ आवाजाच स्त्रोत हवा.

_/\_ काय सुंदर लिहीले आहे. गाणे फार आवडीचे. पपीहा हा शब्दच इतका गोड आहे!! त्यात लताच्या आवाजात म्हणजे मऊसूत, गोड रसमलाईच.

राग बिहाग मधे गाण्याची बांधणी आहे. (बिहाग मधे आहे हे माहिती नव्हते. मला ऐकून ओळखता येत नाहीत रागांची नावे).
सुरूवातीचा आलाप हार्मोनियम वर घेताना असे नोटेशन्स येतात.

सां सां सा सा, नी प म, रेम
रेमप नीधप, रेमरे सासासा

नोटेशन्स काढल्यावर ऐकताना जादू झाल्यासारखे वाटतेय. वेळ मिळाला कि पुढचे गाणेही पाहतो.
चुका असतील तर कळवा.