आभास भाग - 1

Submitted by ..सिद्धी.. on 10 May, 2018 - 12:42

अधरा आज काॅलेजमधनं लवकर घरी आली. आल्या आल्या ती पटकन आपल्या रूममध्ये गेली. फ्रेश होऊन तीने लगेच पीसी ऑन केला. आज कामच तसं होतं. इतके दिवस पेंडिंग राहिलेली असाईनमेंट पूर्ण करून द्यायची होती.
तितक्यात आईची हाक ऐकू आली;"अधरा; खाली ये . नाश्ता तयार आहे. पटकन खाऊन घे आपल्याला बाहेर जायचय."

अधराला आठवलं. आज ती आणि आई आत्याच्या घरी तिला भेटायला जाणार होत्या. पण नेमकी महत्वाची असाईनमेंट करायची राहिल्यामुळे जाऊ की नको अशी तिची द्विधा अवस्था झाली . तीने पटकन काहीतरी ठरवलं.आणि आईला हाक मारली;
"आई मी नाही येत आत्याकडे...काम आहे महत्त्वाचं..आणि प्लीज नाश्ता वर घेऊन येतेस का? खूप लिहायचय अजून!"

आई हातात प्लेट घेऊन वर आली. " काय गं ; काय राहीलय लिहायचं. तास दीड तासात येऊ ना परत. चल ना. दोन वर्षांनी आलीयेना आत्या युएस वरून. भेटून येऊया."

अधरा म्हणाली ;" आई आज नको ना प्लीज. उद्या काॅलेज सुटल्यावर मीच भेटून येईन तीला. उद्या असाईनमेंट सबमीट करायचीये गं. प्लीज ना"

"ठीक आहे. चालेल. उद्या तू आणि बाबा जाऊन या . आता मी निघते मी थोड्या वेळात. जेवण तयार आहे. मला उशीर झाला तर तुम्ही दोघं खाऊन घ्या." आई टेबलावर काॅफीचा मग ठेवत म्हणाली.

अधरा; देशमुखांची एकुलती एक मुलगी. लहान असल्यापासून सगळ्यांचीच लाडकी. अभ्यासातही हुशार होती. हुशारी बरोबरच तिच्या लाघवी बोलण्याने समोरच्याला पटकन आपलंस करून घ्यायची. म्हणून काॅलेजमध्येही प्रसिद्ध होती. बारावी नंतर शहरातल्या घरी एकटी रहायची. नाही म्हणायला शांतामावशी असायच्या दिवसभर पण संध्याकाळी जेवण बनवून निघून जायच्या.
आता आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी काही दिवस आई बाबा रहायला आले होते. आठवड्याभराने लग्न होतं. त्याची तयारी सुरू करायची होती. म्हणून आई आत्याकडे गेलेली. बाबांना यायला वेळ होता अजून. आता सात वाजलेले.

अधराने पोहे खाऊन प्लेट बाजूला ठेवली. हातात मग घेऊन हवी ती माहिती गोळा करण्यासाठी नेटवर सर्फींग करत होती. काॅफी पिऊन संपल्यावर तिने लिहायला सुरूवात केली. सलग दोन तास लिहून झाल्यावर अर्धा प्रोजेक्ट पूर्ण झाला. तितक्यात बेल वाजली. तीने दार उघडलं तर बाबा आलेले. ते फ्रेश झाल्यावर दोघंही जेवायला बसले. बाबांशी गप्पा मारून झटपट जेवण करून ती पुन्हा काम करायला गेली. अकरा वाजता तीची असाईनमेंट रेडी झाली. फायलींगचं काम ती बाबांकडे देऊन वरती आली. तितक्यात आईचा फोन आला. आज ती तिथेच रहाणार होती.मग आरामात तीने पीसी ऑन केला तेव्हा एक नोटीफिकेशन आलेलं दिसलं. ईशानचा मेसेज होता. तीने पटकन रिप्लाय केला. त्यानंतर दोघांच्याही नेहमीसारख्या गप्पा सुरू झाल्या.रात्री तीन वाजता ईशान भानावर आला. तिलाही त्याने घड्याळात बघायला सांगितलं . तीनेही मग आवरतं घेतलं. "उद्या बोलूया!" असं म्हणत दोघांनीही लाॅग आऊट केलं. तीला जरा बरं वाटलं त्याच्याशी बोलल्यावर.असाईनमेंटचा सगळा स्ट्रेस कुठच्याकुठे पळून गेला.

अधरा बेडवर पडल्या पडल्या विचार करू लागली.तीला आठवलं तीन महिन्यापूर्वी
'ईशान सरदेसाई' नावाच्या मुलाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली. तीने सहज त्याचा प्रोफाईल उघडून पाहिली. प्रोफाईलचा फोटो तर भन्नाट होता. मस्त गोरापान; जिम करून कमवलेली बाॅडी; आणि शाहरूख सारख्या हसताना गालावर पडणार्या खळ्या. एकदम हिरो मटेरीयल होता ईशान. तीने पटकन त्याची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. खरं तर ती कुठल्याही अनोळखी माणसाची रिक्वेस्ट अशी कधीच अॅक्सेप्ट करत नसे. नंतर आठवड्याभराने त्याचा गुड माॅर्निंगचा मेसेज आला...मग हळूहळू गप्पांना कधी सुरूवात झाली हे त्यांच त्यांनाही कळलं नाही...पण एक मात्र होतं एकमेकांशी गप्पा मारून दोघांनाही बरं वाटायचं..एक एनर्जी मिळायची ...हळूहळू त्याचा विचार करता करता तिली झोप लागली...

पहाटे चार वाजताच्या सुमारास तीला काहीतरी पडल्याच्या आवाजाने जाग आली... तीने डोक्यावरची चादर बाजूला काढली...सहज तिची नजर ड्रेसिंग टेबलकडे गेली.. तिथलं दृष्य पाहून ती हादरली... रात्रीच्या त्या वेळेला तिच्याच वयाची एक मुलगी टेबलसमोर उभी राहून काहीतरी गुणगुणत तयारी करत होती... आणि परफ्युमची बाटली जमीनीवर पडली होती... अधरा काही म्हणणार तितक्यात त्या मुलीने मागे वळून बघीतलं...तिला बघून मात्र अधराच्या काळजात धस्स झालं.. त्या मुलीला फक्त डोळे होते.. नाक आणि तोंडाची जागा रिकामीच होती..तिचे ते हिरवे डोळे बघून अधरा थरथर कापायला लागली...भीतीने तिचा घसा कोरडा पडला... हळूहळू ती मुलगी अधराच्या जवळ येऊ लागली.. भीतीची थंड लकेर अधराच्या शरीरातनं गेली..तीने पटकन डोक्यावर चादर ओढून घेतली आणि रामनामाचा जप सुरू केला..पाच मिनीटं झाली तरी कसलाच आवाज येत नव्हता..तीची चाहूलही लागत नव्हती..म्हणून अधराने डोळ्यावरची चादर हळूहळू काढली आणि किलकिले डोळे करत अख्ख्या रूममध्ये नजर फिरवली.. पण आश्चर्य म्हणजे तिथे कोणीच नव्हतं..हवेत विरून गेल्यासारखी ती मुलगी गायब झाली होती.. अधराला फार भीती वाटत होती.. बराच वेळ झोपायचा प्रयत्न केल्यावर कुठे तिला झोप लागली..

काल रात्री अलार्म लावायला विसरल्यामुळे सकाळी सूर्याची किरणं खिडकीतून आत येऊन चेहेर्यावर पडली तेव्हा तिला जाग आली. आई अजूनही आली नव्हती. ती पटकन उठली आणि लगेच तीने आवरायला सुरूवात केली. सगळा गोंधळ सुरू होता तिचा. बाबा सकाळीच वाॅकला गेलेले ते अजून आले नव्हते.शेवटी कसंबसं स्वतःचं आवरून ती निघाली. घरातला पसारा आल्यावर आवरायचं तीने ठरवलं . घाईघाईत अधरा काॅलेजला पोहोचली. दारातून वर्गात जाणार तितक्यात तीने ब्रेक मारला. तिला शंका आली. बॅगेत हात घातलन तर सबमीशनची फाईल घरीच टेबलवर होती. सगळे वर्गात डेस्कवर फाईल जमा करत होते. तिला आठवलं ईशानशी चॅटींग करताना बाबा फाईल टेबलावर ठेवून गेलेले. आठवणीने घे असंही म्हणालेले. पण गप्पांच्या नादात आपण हा बावळटपणा केलाय हे तिच्या लक्षात आलं. आता वर्गात जाऊन सरांच्या शिव्या खाण्यापेक्षा घरी जाऊन फाईल आणणं चांगलं असं म्हणत तीने पायर्या उतरायला सुरूवात केली. घरी जाऊन पुन्हा फाईल घेऊन येईपर्यंत फार दमायला झालं तीला. शेवटी एकदाचं सबमीट झाल्यावर तीने लेक्चरला बंक मारायचं ठरवलं.
क्रमशः
-- आदिसिद्धी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग.
आजची सुधारणा पुढीलप्रमाणे, तीन वाजेपर्यंत गप्पा मारल्या. मग दोन वाजता काहीतरी पडल्याच्या आवाजाने जाग आली.

अरे वा अधरा।।। मोगम्बो खुश हुआ..(काल Mr. India लागला होता म्हणून आपल टाकलं वाक्य)
आता वाचली कथा...दिवसा घाबरले ना मी... बिना तोंडाची मुलगी
मस्त लिहलय...आवडली...बाकीचे भाग वाचते आता...