अमिताभबद्दल वेगळ्याने काय लिहिणार? त्याचे अनेक चित्रपट आवडले तरी राजश्री पिक्चर्सचा १९७३ साली आलेला "सौदागर" चित्रपट मनात एक वेगळेच स्थान पटकावून आहे. चित्रपटाबद्दल केव्हातरी लिहायचं मनात आहेच. पण येथे मात्र एका आवडत्या गाण्याबद्दल काही बोलावंसं वाटतं. "तेरा मेरा साथ रहे" हे माझं लताने गायिलेल्या आवडत्या गाण्यांपैकी एक गीत. लताबाई गाताना अनेक चमत्कार करतात, मात्र ते त्यांच्या आवाजात गाणार्या अभिनेत्रींना पडद्यावर पेलवतातच असे नाही. येथे मात्र नुतन पडद्यावर असल्याने सोन्याला सुगंध मिळाला आहे. बाकी आवाजात ओलावा, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलची समर्पणाची भावना आणावी ती लतानेच.
गावात राहणारी, विधवा प्रौढा, आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे असेल पण जराशी फटकळ, खाष्ट. तिच्या आयुष्यात येतो तो तरणाबंड मोती नावाचा रसिया. ताडाचा रस काढण्यात वाकबगार असलेला तरुण. तिला आधी विश्वास बसत नाही. पण या तरुणाने घातलेल्या लग्नाच्या मागणीने तिच्या आयुष्याच्या जणु सुकलेल्या वेलीला जीवनरस मिळाल्यासारखे होते. लग्नानंतर तृप्त नुतनने आपल्या अपेक्षांचे एक सुरेख चित्र या गाण्याने रेखाटले आहे.
तिला फक्त ती दोघं नेहेमी बरोबर रहावेत इतकीच अपेक्षा आहे. बाकी काही नाही. "दर्द की शाम हो या, सुख का सवेरा हो, सब गवारा है मुझे, साथ बस तेरा हो, जी के भी, मरके भी हाथोंमें हाथ रहे..." समर्पित भावना असलेली गाणी हा आमचा वीक पॉईंट. आणि या गाण्याचा शब्द न शब्द समर्पणाने भिजलेला आहे. रविंद्र जैन यांचे शब्द आणि त्यांचेच संगीत. कधी कधी वाटतं दोन्ही गोष्टी एकाच माणसाने केल्याने हे गाणं इतकं परिणामकारक झालं असेल का?
जीवनरसाने भरलेली वेल जशी हिरवीगार होऊन डोलु लागते, जणु तिचा कायापालटच होतो त्याप्रमाणे पांढरी साडी नेसलेली खाष्ट माजुबी आता गुलाबी साडीत घरातील कामे करताना गुणगुणु लागते, लताने हे सुरुवातीचे गुणगुणणे इतके सुरेख घेतले आहे की एखादी तृप्त ललनाच नजरेसमोर यावी. आणि समोर येते ते हसरी, लाजरी नुतन. लाजरी या अर्थाने जणू एखादी नुकतंच लग्न झालेली नवथर तरुणी ज्या प्रमाणे चेहर्यावर दिसेल न दिसेल असा लज्जेचा भाव घेऊन वावरते आणि त्यामुळे ती आणखी सुरेख दिसते तशी नुतन दिसली आहे.
मातीने लिंपलेलं साधंच घर पण अंगणात नुतनचा गाणे म्हणत वावर अगदी सहज झाला आहे. ते तिचं मिरच्या वाळवायला घालणं, हुक्का खांबावर टांगणं सारंच काही हौसेने नवीन संसार सजवणार्या तरुणीला सजेसं. हे दिग्दर्शकाचं कौशल्य खरंच. पण जेव्हा नुतनसारखी अभिनेत्री असं करते तेव्हा त्यात अलैकिक प्रतिभेचा रंग मिसळलेला असतो.
संसारासुखात भिजून तल्लीन होऊन गाणार्या माजुबीला काय ठावूक की तिचा मोती एका फुलबानु (पद्मा खन्ना)नावाच्या मदनिकेत अडकलेला आहे. आणि तिच्याशी लग्न करता यावे, त्यासाठी पैसे जमवता यावे म्हणून त्याने या माजुबीशी लग्न केले आहे. ती तर या रसियासाठी केवळ एक शिडी आहे. गाण्याच्या शेवटी अमिताभ येतो. गाणे ऐकून त्याचे पाय थबकतात. त्याला आपण जे करीत आहोत ते गैर आहे असं क्षणभरासाठी तरी जाणवत असेल का?
बहुधा नसेल कारण गाण्यातच हे प्रकरण फार पुढे गेलेलं दिसून येतं. तो येण्याआधी मात्र येथे समर्पित भावनेने वातवरणच पवित्र व्हावे अशा तर्हेने नुतन गात असते " तु कभी मेरे खुदा मुझसे बेजार न हो...!" नुतनचं हे समर्पण, तो भाव मनात कायम वस्ती करून राहिला आहे.
अतुल ठाकुर
गाण्याचा विडियो येथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=DKRHhVY6kQw
नूतन थोडी मोठी दिसते वयाने.
नूतन थोडी मोठी दिसते वयाने.
फारएण्ड, मला वाटतं चित्रपटात तसेच अपेक्षित आहे.
सुरेख.
सुरेख.
खूप लहानपाणी tv वर हा पिक्चर बघितला होता, फार आठवत नाही. अंगण साफ करणारी नूतन, गुळ छान करणारी नूतन एवढंच आठवतं. ती काहिली, ती ढवळत असलेला गुळ. मग अमिताभच्या दुसऱ्या बायकोला गुळ करता येत नाही, ती खाऊन थुकते हा शॉट आठवतोय आणि मग बाजारात गुळ विकायला जातो अमिताभ तर वाईट गुळ घेऊन लोकं बोलतात त्याला, हे असं सर्व जास्त आठवतं. शेवटी नूतन, तिचा दुसरा म्हातारा नवरा आणि ती गुळ करून देते अमिताभला शेवटी. असं अजून काही आठवतंय.
गाणे हे आठवत नाहीये, आता बघते. पद्मा खन्नाचे आठवतंय सजना है मुझे सजनाके लिये.
बघितलं गाणं. सुंदर आहे, त्यानंतर परत लेख वाचला. परत आता बघायला हवा पिक्चर फार काही कळत नव्हतं तेव्हा बघितलेला. अमिताभ नूतनला सोडून दुसरीशी लग्न करतो पद्मा खन्नाशी तेव्हा राग आलेला आणि तिला गुळ करता येत नाही, बरं झालं असंच पाहिजे, असं मी आणि मैत्रीण म्हणालेलो.
छान लेख !!
छान लेख !!
हा लेख वाचून चित्रपट पाहिला; आवडला.
चित्रपट कुठ बघता येईल?
चित्रपट कुठ बघता येईल?
माझंही हे प्रचंड आवडतं गाणं
माझंही हे प्रचंड आवडतं गाणं आणि अर्थात पिक्चरही.
यु ट्यूबवर आहे.
यु ट्यूबवर आहे.
मला नाही मिळाला पूर्ण..
मला नाही मिळाला पूर्ण..
लिंक मिळेल का?
पूर्ण चित्रपट मलाही नाही
पूर्ण चित्रपट मलाही नाही मिळाला,पण खालील लिंक पहा.त्या भागानंतर २ टाईप करून पुढचे भाग पहा.
https://www.youtube.com/watch?v=JQlhsl8sWIw
तुकड्यात आहे. राजश्रीच्या
तुकड्यात आहे. राजश्रीच्या चॅनेलवरच आहे, पहिला भाग पहिला की पुढचे आपोआप लिंक होतात, आपल्याला ओपन करावे लागत नाहीत.
तुकड्यात आहे. राजश्रीच्या चॅनेलवरच आहे, पहिला भाग पहिला की पुढचे आपोआप लिंक होतात, आपल्याला ओपन करावे लागत नाहीत.
https://www.youtube.com/playlist?list=PLC5BA55926FC15979
छान सिनेमा! नूतनचे काम अगदी
छान सिनेमा! नूतनचे काम अगदी मस्त.तुलनेत अमिताभ बराच डावा पडलाय.सॉफिस्टिकेट भाव लपत नाहीत.उगाच वाटते की आता है कोई माई का लाल म्हणेल म्हणून! त्याचा हेयरकट ,लूक सामान्य रस काढणारा वाटत नाही.अशावेळी मंडीतला नासिरुद्दीन,दो बिघा जमिन मधले बलराज सहानी आठवतात.
अतुल ठाकुर यांच्या या धाग्यामुळे सिनेमा परत पाहिला. धन्यवाद!
धन्यवाद देवकी आणि साधना..
धन्यवाद देवकी आणि साधना..
जुना सिनेमा सहसा पाहिला जात नाही.. असं वाचल्यावर बघावासा वाटतो. नक्की बघणार.!
माझा सुद्धा आवडता पिक्चर आणि
माझा सुद्धा आवडता पिक्चर आणि गाणं..
Downloading now
Pages