मायबोली अँड्रॉईड अॅपची खुली चाचणी (open Beta testing)
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1
चाचणी खुली असल्याने कुणालाही लिंक पाठवल्यास हरकत नाही. या आवृत्तित डेस्कटॉपवरच्या सगळ्या सुविधा अजून उपलब्ध नाहित. पण तुमच्या वापरावरून कुठली सुविधा आधी देता येईल या कडे लक्ष देतो आहे.
सध्या असलेल्या प्रमुख सुविधा
१. मोबाईल ब्राऊझरपेक्षा कमी डेटा लागेल
२. मोबाईल ब्राऊझरपेक्षा पटपट चालावे/पळावे अशी अपेक्षा.
३. एकदा लॉगीन केल्यावर, पुन्हा पुन्हा लॉगीन करण्याची गरज नाही.
सध्या नसलेल्या प्रमुख सुविधा.
१. थेट देवनागरीत लिहता येत नाही. पण तुमच्या मोबाईलमधे गुगल इनपुट टुल किंवा इतर युनिकोड कीबोर्ड असेल तर ही अडचण जाणवणार नाही.२. मायबोलीचे सगळे कप्पे /विभाग अजून दिसत नाहीत. पण एखाद्या विभागात नवीन लेखन / प्रतिक्रिया आली तर तो भाग "नवीन लेखनात" दिसेल आणि तिथे जाता येईल.३. शोध सुविधा अजून नाही.
या अगोदरच्या चाचण्यात चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड यांनी मदत केली त्यांचे आभार. त्यांनी केलेल्या सगळ्या सूचना वेळेअभावी अंमलात आणू शकलो नाही. काही आणल्या . इतरांवर अजून काम सुरु आहे.
अँड्रोईड अॅप थोडे दिवस वापरात आले की मग आयफोन अॅप तयार करायला घेऊ.
तुम्हाला काही अडचणी आल्या, काही चुका सापडल्या , नवीन कल्पना सुचवायच्या असतील तर इथेच सांगा.
शुभारंभ केला
शुभारंभ केला
सुप्पर!..... ॲप हवेच होते
सुप्पर!..... ॲप हवेच होते मायबोलीचे!
वा, अभिनंदन
वा, अभिनंदन
आयओएस अॅपची वाट पहात आहे
सुचना/विनंती
सुचना/विनंती
१) रिप्लाय देताना संबंधित आयडीला टॅग करायची सुविधा द्यावी. उदा. व्हॉट्सप्प मधे @ टाकल्यावर आयडींचे नाव दिसते अथवा आयडीला संबंधित टॅग करता येते. असे केल्याने योग्य व्यक्तीला रिप्लाय जाईल आणि पोस्ट देखील सुटसुटीट वाटेल. प्रतिसादाखाली "संपादन" जिथे येते तिथे "रिप्लाय"चा ऑप्शन दिला जावा. म्हणजे तो क्लिक केल्यावर त्या प्रतिसादाची पहिली ओळ आणि आयडी ऑटोमॅटीक "शुभारंभ केला नवीन Submitted by दत्तू on 7 May, 2018 - 15:10 असेकाहीसे दिसण्याची सुविधा मिळेल. (फॉन्ट व स्टाईल बदल केल्यास वेगवेगळे दिसतील
"
२) फॅंट छोटे करावे पानांवर धाग्याचा मजकूर मोठा दिसतोय त्यामुळे धागे कमी दिसत आहेत
(No subject)
डाव्याबाजूस मेन्यु मध्ये सेटींग वगैरे ची सुविधा असताना पुन्हा उजव्याबाजूस पण का दिली आहे?
मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती
मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती तशीच एडिटरमध्ये दिसत राहते. पेज रिफ्रेश होत नाही. मात्र प्रत्यक्षात ती पोस्ट कमिट झाली होती
अभिनंदन ! वापरून पाहते
अभिनंदन ! वापरून पाहते
अरे वा! मायबोलीचं अॅप !!
अरे वा! मायबोलीचं अॅप !! बेस्ट.
वेळ मिळताच टेस्ट करून बघेन.
Location aani file access
Location aani file access permissions havya?
सही आहे !!
सही आहे !!
माझ्या मोबाईलमध्ये 2 जी नेटवर्क आहे. आणि मी मोबाईलवरूनच माबोगिरी करतो. मला फायद्याचे ठरेल हे. चेक करतो लवकरच..
अभिनंदन, वापरून पाहतो
अभिनंदन, वापरून पाहतो
Location aani file access
Location aani file access permissions havya? ->> टाइमझोन आणि इमेज अपलोड साठी..
फेवरेट केलेले लिखाण ऑफलाईन
फेवरेट केलेले लिखाण ऑफलाईन मिळण्याची सोय हवी
काही लेखांचे प्रतिसाद पाहता येत नाहीत..
मसकीच की. बघते चेक करुन.
मस्तच की. बघते चेक करुन.
अभिनंदन.
गुगल किबोर्ड बरोबर असणार्या
गुगल किबोर्ड बरोबर असणार्या स्मायलीज वापरल्या की एरर येते आहे..
लेखन फिट होत नाहि आहे विण्डो
लेखन फिट होत नाहि आहे विण्डो मधे. खालि बार दिस्तो आहे उजवी-डावी कडे हलवण्या साठि
आवडत्या मायबोलीकरांचे लेखन ची विन्दो असायला हवी
अरे वा. मस्तच. मी मायबोलीवर
अरे वा. मस्तच. मी मायबोलीवर मोबाईल वरूनच लॉग इन करते. आता अँप डाउनलोड करेन.
मस्तच! नक्की वापरून बघणार!
मस्तच! नक्की वापरून बघणार!
मला इतका वेळ या धाग्यावरचे
मला इतका वेळ या धाग्यावरचे प्रतिसादच दिसत नव्हते. मुख्य पानावर मात्र 8 प्रतिसाद असं दिसत होतं. आत्ता वरचे प्रतिसाद दिसले.
आम्हाला तुमचे 3 प्रतिसाद नीट
आम्हाला तुमचे 3 प्रतिसाद नीट दिसत आहे
हो दत्तू.. ते प्रतिसाद
हो दत्तू.. ते प्रतिसाद
आता डिलीट नाही करणार पुढचे
मला येणारी अडचण: प्रतिसाद सेव्ह केल्याचे बटण दाबल्यावर "your comment has been saved" हा मेसेज यायला वेळ लागतोय. तेवढ्या वेळात कमेंट सेव्ह झालीये की नाही अशी शंका वाटून अजून 2-3 वेळा सेव्ह बटण दाबतेय मी.
ब्राउझरमध्ये जरा कमी वेळ लागायचा प्रतिसाद सेव्ह व्हायला.
नविन अॅप बद्दल धन्यवाद आणि
नविन अॅप बद्दल धन्यवाद आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन..
मायबोली चे देखिल एक अॅप असावे असे वाटत होते. आत्ताच ईनस्टॉल केले, आणि अॅप मधुन हा पहिलाच प्रतिसाद देत आहे.
मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती
मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती तशीच एडिटरमध्ये दिसत राहते. पेज रिफ्रेश होत नाही. मात्र प्रत्यक्षात ती पोस्ट कमिट झाली होती>> हा अनुभव मला देखील आला.. सेव्ह केल्यावर थोड्या वेळ वाट पाहिली, पण पेज रिफ्रेश झाले नाही. मग मी वर असलेल्या तिन टॅब्स पैकी एका वेगळ्या टॅबवर गेलो, आणि तिथे मला प्रतिसाद सेव्ह झाल्याचा मॅसॅज दिसला.
नोटीफिकेशन्स आहेत का?असणार
नोटीफिकेशन्स आहेत का? असणार आहेत का?
म्हणजे माझ्या लिखाणावर कॉमेंटस आल्या तर काही पॉपअप वगैरे होणार आहे का?
१.अॅप सुरू केल्यावर, सगळ्यात
१.अॅप सुरू केल्यावर, सगळ्यात पहिले गुलमोहर वर जाते. जर मला ते नेहमी नविन लिखाण वर जावे असे वाटत असेल तर तसा प्रेफरन्स सेव्ह करता येईल अशी सुविधा देता येऊ शकेल काय?
२.हे लेखन प्रसिद्ध झालं ति वेळ आणि शेवटचा प्रतिसाद आल्याची वेळ एकच दिसत आहे. शेवटचा प्रतिसाद आल्याची वेळ अपडेट होत नाहीये.
Permission dilya nahit tar
Permission dilya nahit tar kahi vachu dat nahi
चार्ली चॅप्लिन लेखावरील
चार्ली चॅप्लिन लेखावरील प्रतिसाद अॅप मध्ये दिसत नाही आहेत.
मस्त काम झालंय! काल रात्री
मस्त काम झालंय! काल रात्री डालो केलं अॅप. त्याच्याशी खेळून बघायला वेळ मिळालेला नाही पण एक लक्षात आलं. की एरवी इतर दुसर्या अॅपमधून, ब्राउजरमधून जर माबो ची लिंक आली तर ती आपोआप अॅपमध्ये उघडत नाही. ब्राउजर मध्येच उघडते. अॅमेझॉन किंवा अशा काही अॅप्सच्या लिंक्स कुठूनही आल्या तरी त्या अॅपमध्येच उघडतात. असं काही करता येईल का इथेही?
Pages