चाळीतल्या गमती-जमती (३)
अव्या बद्दल मागे मी लिहिलं होतं पण ते आता मलाच सापडेना तर अव्या म्हणजे अविराज माझ्याबरोबर नसती खुन्नस घेऊन राहायचा.मी त्याला माझ्या तासात अभ्यास करायला सांगते ,उतारा देते शिवाय त्याच्या पप्पांना अवि माझं ऐकत नाही अश्या तक्रारी करते म्हंटल्यावर त्याचा माझ्यावर जास्त राग असायचा.कारण अवीचे पप्पा खूप चिडके त्यामुळे मी अवीची तक्रार केली की त्याचा मार ठरलेला असायचा.
एका बाबतीत मात्र अवि माझ्याशी चांगलं वागायचा ते म्हणजे पहाटे लवकर उठून फिरायला जाणे.त्यालाही माझ्याबरोबर पळायला यायच असायचं.मुलखाचा खोडकर अव्या एक दिवस धड धावेल तर शप्पथ काय ना काय उचापती तो करायचाच.मी त्याला न सांगता जाईल म्हणून हा पट्ट्या पहाटे पाच लाच आमच्या घरी दाखल व्हायचा.एक दिवस आम्ही असेच कारखाना रोड ला धावत होतो.अव्याच आपलं दिसलं कुत्र हान दगड.बैलगाडी दिसली की ऊस ओढायला जा असे पराक्रम सुरू असायचे.
एकदा मात्र त्याने हद्दच केली कारखाना रोड वर एक ऊसतोड करणारी बाई.त्या रंगाने अति सावळ्या होत्या. अविला त्या इतक्या सावळ्या रंगाबद्दल औत्सुक्य मी पुढे चालत होते.अव्या मागे उलटा पळत ,ते ही त्या बाईच्या पूढे बर का,मला मागे वळून पाहायला सांगत म्हणू लागला. अग मायडीताई ही बाई बघ ना किती काळीकुट्ट आहे ते .हे ऐकल आणि माझी तर पाचावर धरणच बसली .मला वाटलं अव्याच आता काय खर नाही.मी अवि चल घरी चल म्हणून त्याला लांबूनच बोलावतेय तर हा त्या बाईला जाऊच देईना,त्यांना म्हणतोय ओ थांबा ना आमच्या मायडीताईला तुमचं त्वांड मला दाखवायचय.मी हे ऐकल आणि ८० त ५ घालून सुसाट धावत सुटले तिथून.मग अव्या माझ्या मागून आला आणि म्हणतोय असा काळा कलर तुला पुन्हा बघायला घावला नसता मायडी ताई,तू बघाय पायजे हुतस. अरे अवि अस म्हणू नये.अस बोलू नये,अस वागू नये म्हंटल तरी हा आपलं मायडी ताई तू त्या बाईच त्वांड बघाय पायजे हुतस या एकाच मतावर ठाम.माझ्या समजावण्याच्या सर्व क्षमता संपल्या आणि मी अविसमोर हात जोडले.आणि हो पळायला जायचा रस्ताही बदलला.न जाणो ती बाई कोयता घेऊन माझ्या मागे लागली तर काय घ्या..
त्यांना म्हणतोय ओ थांबा ना
त्यांना म्हणतोय ओ थांबा ना आमच्या मायडीताईला तुमचं त्वांड मला दाखवायचय. >>>
आता खरंच हसून हसून गडबडा लोळलो.
या तिन्ही भागाचं कथाकथन मस्तं होईल.
अजून भाग येऊ द्यात.
आणि ८० त ५ घालून सुसाट धावत सुटले तिथून >>> ८० त ५ म्हणजे काय?
<< म्हणतोय ओ थांबा ना आमच्या
<< म्हणतोय ओ थांबा ना आमच्या मायडीताईला तुमचं त्वांड मला दाखवायचय. >>
------ तो कितीही लहान असला तरी त्याचे असे वागणे विचित्र वाटले. त्या बाईसाठी किती असह्य... अन्यायच आहे...
एकदा मात्र त्याने हद्दच केली
एकदा मात्र त्याने हद्दच केली कारखाना रोड वर एक ऊसतोड करणारी बाई.त्या रंगाने अति सावळ्या होत्या. अविला त्या इतक्या सावळ्या रंगाबद्दल औत्सुक्य मी पुढे चालत होते.अव्या मागे उलटा पळत ,ते ही त्या बाईच्या पूढे बर का,मला मागे वळून पाहायला सांगत म्हणू लागला. अग मायडीताई ही बाई बघ ना किती काळीकुट्ट आहे ते .हे ऐकल आणि माझी तर पाचावर धरणच बसली .मला वाटलं अव्याच आता काय खर नाही.मी अवि चल घरी चल म्हणून त्याला लांबूनच बोलावतेय तर हा त्या बाईला जाऊच देईना,त्यांना म्हणतोय ओ थांबा ना आमच्या मायडीताईला तुमचं त्वांड मला दाखवायचय.मी हे ऐकल आणि ८० त ५ घालून सुसाट धावत सुटले तिथून.मग अव्या माझ्या मागून आला आणि म्हणतोय असा काळा कलर तुला पुन्हा बघायला घावला नसता मायडी ताई,तू बघाय पायजे हुतस. अरे अवि अस म्हणू नये.अस बोलू नये>> हे खूप रेशिअल प्रोफाइलिंग टाइप आहे एखादे माणूस जाडे/ काळे असले तर ते काही प्रदर्शनातले एक्सिबिट नाही. ही गंमत नाही. आणी विनोदी आजिबातच नाही. निषेध.
खादे माणूस जाडे/ काळे असले तर
खादे माणूस जाडे/ काळे असले तर ते काही प्रदर्शनातले एक्सिबिट नाही. ही गंमत नाही. आणी विनोदी आजिबातच नाही. >>>>> मीही हा भाग औत्सुक्याने वाचला.अजिबात आवडला नाही.
<< हे खूप रेशिअल प्रोफाइलिंग
<< हे खूप रेशिअल प्रोफाइलिंग टाइप आहे एखादे माणूस जाडे/ काळे असले तर ते काही प्रदर्शनातले एक्सिबिट नाही. ही गंमत नाही. आणी विनोदी आजिबातच नाही. निषेध. >>
---- सहमत. काळा, जाडा, किव्वा शारिराने अजुन काही आव्हाने असणार्यान्ना जग, यात ३ वर्षान्पासुन ७५ पर्यन्त आलेत (काही सेकन्द का असेना), जेव्हा बारकाईने निरखते, तेव्हा त्या व्यक्तीन्ना त्या नजरान्चा खुप मानसिक त्रास होतो.... काहीन्चा दिवस आणि काही अती सन्वेदन्शिल लोकान्चे आठवडे वाया जातात.
ते त्यान्ची लढाई (त्यान्च्या नैसर्गिक क्षमतेच्या कक्षेत) दरदिवशी लढतच असतात. तुम्ही त्यान्च्या कडे पुर्ण दुर्लक्ष केले तरी त्यान्ना मोठी मदत केल्यासारखेच आहे.
लेखिकेच्या लहान पणी जे घडलंय
लेखिकेच्या लहान पणी जे घडलंय ते लिहिलंय असां मला वाटतंय.
निषेध वैगेरे करुन काही उपेग नाही.
अशी बेरकी मुलं गावच्या ठिकाणी असतात. त्यांना रेशिअल प्रोफाइलिंग म्हणजे काय हे देखील माहित नसतं.
कथा म्हणुन वाचा.
राजेश्री, छान कथा. तुम्ही असं म्हणु नये, बोलु नये, वागु नये सांगुनही अव्या तेच तेच बोलत राहिला ह्यावरुन तो किती बेरकी होता ते कळतंय.
कथा म्हणुन वाचा>> पण आता काळ
कथा म्हणुन वाचा>> पण आता काळ बदलला आहे आणि नेट वर असे लिहिले की ते हळू हळू अॅक्सेप्टेड आहे असा समज होत जातो. म्हणून निषेध नोंदवला पाहिजे. पोलिटिकल करेक्ट नेस माहीती होईल त्यांना. मायबोली जागतिक व्यासपीठ आहे.
ठीक आहे ज्यांना वाटते हे
ठीक आहे ज्यांना वाटते हे योग्य नाही त्यांच्या मताचा मी आदर राखते.स्मिता मॅडम म्हणाल्या तस जे आहे ते मी सांगितलं
वास्तववादी लिहिलं आहे.अवीच वय तेंव्हा सहा होत.कुणाची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.मी इथे नवीन आहे मला इथे अजून काही टेक्निकल गोष्टींची माहिती नाही वाटल्यास हा लेख delete करेन
सस्मित सर तुम्ही मत नोंदवलं
सस्मित मॅम तुम्ही मत नोंदवलं तसाच होता अवि लहानपणी.आपल्या अभिप्रायाबद्दल आभार
सर नाही ओ मी.
सर नाही ओ मी.
स्मिता मॅम सॉरी आता मी तुमचं
स्मिता मॅम सॉरी आता मी तुमचं प्रोफाइल पाहिले
स्मिता मॅम सॉरी आता मी तुमचं
स्मिता मॅम सॉरी आता मी तुमचं प्रोफाइल पाहिले
बरं त्ये जाउद्या.
बरं त्ये जाउद्या.
चाळीतील गमतीजमती असं नाव का दिलंय??
ह्या सगळ्या किस्स्यांमधे चाळीतच घड्तात असं काही नाही वाट्लं.
तेव्हा चाळीत रहात होतात तर ठीके.
मग काय नाव योग्य राहील मॅम?
मग काय नाव योग्य राहील मॅम?
मी याच नावाने लिहितेय जेंव्हा चाळीत रहात होतो तेंव्हाचे सारे प्रसंग आहेत
मग ठीक आहे.
मग ठीक आहे.
मॅम मॅम म्हणू नका.
अरेच्च्या डीलीटच केलात का लेख
अरेच्च्या डीलीटच केलात का लेख.
अहो ह्यापेक्षा काहीच्या काही मोठमोठ्या कथांमधे लिहिलेलं असतं.
ते वाचुन त्या गोष्टी अॅक्सेप्टेड आहेत असा समज होत असेल तर वाचक धन्यच आहेत.
आणि कदाचित असे समज होतही असतील कुणाचे म्हणुन लेखक लिहायचं बंद करतील का?
इथे वावरताना खंबीर व्हा. अजुन लै मायबोली बघायची आहे तुम्हाला.
अरेरे! फार वाईट झालं.
अरेरे! फार वाईट झालं.
मला कुणाच्या भावना दुखवायच्या
मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.जात पात रंग भेद मी मानत नाही . मलाही इथे शिकायला मिळाले कारण फेसबुक वर कुणी आक्षेप नाही घेतला त्यामुळे मला हे लक्षात आलं नाही.लोकांच्या भावना महत्वाच्या,त्यांचा मी आदर करते.
सचिन सर 80 त 5 म्हणजे फास्ट
सचिन सर 80 त 5 म्हणजे फास्ट पळणे..
अहो ताई कशाला डिलीट केलात, मी
अहो ताई कशाला डिलीट केलात, मी वाचत होतो सगळे भाग.
माझ्यासारखे बरेच लोक आहेत वाचणारे, लिहा तुम्ही, नाउमेद होऊ नका.
अहो ताई कशाला डिलीट केलात, मी
अहो ताई कशाला डिलीट केलात, मी वाचत होतो सगळे भाग.
माझ्यासारखे बरेच लोक आहेत वाचणारे, लिहा तुम्ही, नाउमेद होऊ नका.>>> +१११
हा भाग मला आवडला नव्हता पण
हा भाग मला आवडला नव्हता पण तरीही तुम्ही तो डिलीट करायला नको होता. तुम्हाला हवं ते लिहायचा तुम्हाला हक्क आहे आणि त्या लेखनावर टीका करायचा प्रतिसादकर्त्यांचा अधिकार आहे.
प्रतिसादातून किस्सा समजला.
प्रतिसादातून किस्सा समजला.
लहान मुलांबाबत असे किस्से घडतात आणि ते त्या वेळेस खरेच विनोदी वाटतात.
प्रतिसादात त्यातील रेसिस्ट बाजू येणे ईटस ओके. तो प्रतिसाद देखील आपल्या जागी बरोबर आहे. पण तुम्हाला लेखक म्हणून गिल्ट वाटायला नको. लेख उडवायला नको होता असे मला वाटते.
बाकी आजवर चित्रपटात व्यंग असलेल्या लोकांवर बरेच विनोद पाहिले आहेत. लोकं ते एंजॉयही करतात हे देखील पाहिले आहे. मागे माझा एक धागा होता यावर - विनोद कसा असावा / नसावा? एकदा लोकांनी आपण वाचतोय तो विनोद आहे हे स्विकारले की मग काही वाटत नाही. हसायलाच येते.
बाकी तुमचे चाळीतले किस्से आहेत. माझे बालपणही चाळीत गेलेय. तिथे आमच्या मित्रांमध्ये जो रंगाने काळा असायचा त्याला त्याच्या नावाने हाक न मारता "ए काळ्या" अशीच हाक मास्ली जायची. तेव्हा कोणी हा रेसिस्ट वगैरे मुद्दा मांडला असता तर आम्हाला तो बाऊन्सरच गेला असता.
मुळात मला वाटते की हे रेसिस्ट वर्णभेद वगैरे पाश्चात्य गोरे आणि ब्लॅक निग्रो ईथून आलेले कन्सेप्ट आहेत. आपण सर्व रंगाचे भारतीय एखद्याच्या रंगावरून मनात कसलाही द्वेष उच्चनीचता न बाळगता गुण्यागोविंदाने नांदतो.
मला टीका आवडतात म्हणून मी इथे
मला टीका आवडतात म्हणून मी इथे आहे.पण मला कुणाच्या भावना नाही दुखवायच्या.अविबद्दलचा भाग पुन्हा मी इथे दिला ती लेखमालेची लिंक तुटू नये म्हणूंन.
लेख दिसतोय मला. लेख डिलीट
लेख दिसतोय मला. लेख डिलीट नाही केला तरी रुन्मेष ने त्याचा प्रसिसाद केला तर जास्त चांगले.
वा:! राजेश्री, लेख पुन्हा
वा:! राजेश्री, लेख पुन्हा टाकल्याबद्दल आपले अभिनंदन!
लिहित र्हाव्हा हो तुम्ही बाई,
लिहित र्हाव्हा हो तुम्ही बाई, लोकांना म्हनायचं : गेलास उड़त / गेलीस उड़त ।
निषेध करणार्यांचा निषेध मैच्युर व्हा नाहीतर बदबदगीते वाचा .