Submitted by मनीमोहोर on 24 April, 2018 - 10:17
व्हेजिटेबल कारविंग मध्ये मला खूप रस आहे. खूप दिवसांपासून अशी महिरप करायचं मनात होतं . काल ती केली. टोमॅटो च्या स्किन ला स्पायरल मध्ये काढून घेतलं आणि नंतर ते रोल केलं की अशी गुलाबाची फ़ुलं मिळतात. मध्ये ठेवण्यासाठी काकडीचं कमळ केलं आणि पानं केली भो. मिरचीची. ताटाच्या दोन्ही बाजूला ठेवले टोमॅटोचे गुलाब आणि पानं आणि मध्ये ठेवलं काकडीचं कमळ.
काल काहीतरी छोटासा समारंभ होता म्हणून ही महिरप केली. मेन्यू होता अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन .. ब.भाजी, कोशिंबीर, ढोकळा, टोमॅटोचं ना. दूध घालून सार, वरण भात तूप लिंबू , आणि बासुंदी पुरी ...सगळं घरी केलेलं .
मेन्यू आणि महिरप बघून पाव्हणे खुश आणि त्यामुळे मीही खुश ..
हा फोटो
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टोमॅटो ची फुलं मस्त झाली आहेत
टोमॅटो ची फुलं मस्त झाली आहेत...
अरे वा! सुंदर दिसतेय महिरप.
अरे वा! सुंदर दिसतेय महिरप.
जुई, पहिल्या प्रतिसादा बद्दल
जुई, पहिल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
सजावट छानच झाली आहे.
सजावट छानच झाली आहे.
मस्त दिसतेय. टोमॅटोची स्कीन
मस्त दिसतेय. टोमॅटोची स्कीन इतक्या पटकन कशी निघाली? उकडून घेतलेत का टोमॅटो?
फार सुंदर !!
फार सुंदर !!
मस्तच झालेय.
मस्तच झालेय.
टोमॅटो ची फुलं सुंदर.फ्रिजर मध्ये ठेवून मग कापले का?
त्या तिकडे पाहीली होती. सुरेख
त्या तिकडे पाहीली होती. सुरेख आहे सजावट!
ते काकडीचं कमळ मस्तच दिसतंय... त्यात मध्ये लाल रंगाचं काय आहे?
छान दिसतय पण ते वाया जाउ नये
छान दिसतय पण ते वाया जाउ नये असं काही केलं पाहिजे. स्वच्छ टेबलमॅट ठेवली तर सॅलड खाताही येईल.
फारच सुंदर..
फारच सुंदर..
छान दिसतय पण ते वाया जाउ नये
छान दिसतय पण ते वाया जाउ नये असं काही केलं पाहिजे. >>>+१
ताटातले पदार्थ तर जास्तच आवडले : P
धन्यवाद प्रतिसादासाठी
धन्यवाद प्रतिसादासाठी सगळयांना.
सायो उकडून नाही घ्यायचे टोमॅटो. टोमॅटोची स्किन एका सलग स्पायरल मध्ये काढायची आहे आणि ती काढताना जरा zig zag काढली पाकळ्या छान होतात. एवढं कठीण नाहीये ते. थोड्या प्रॅक्टिस ने नक्कीच जमेल.
अनु , टोमॅटो रूम temperature चे घ्यायचे आहेत. फ्रीजर मधले खूप कडक होतील आणि carving कठीण होईल.
योकु, कमळामध्ये टोमॅटो ची त्या साईज ची गोल चकती ठेवली आहे.
हे खाणं कठीण आहे. ह्याकडे एक सजावट म्हणूनच बघावे. इथे केलेली टोमॅटो ची फुल तर जस्ट स्किन ची केली आहेत त्यामुळे उरलेला टोमॅटो वापरुच शकतो आपण. पण वेज कारविंग ही एक कला आहे . जसं रुखवतात केले जाणारे साखरेचे शोभेचे पदार्थ, हलव्याच्या दागिन्यातला हलवा वैगेरे कुठे खाल्ले जात असतील ? तसंच आहे हे ही. ही सगळी एक प्रकारची skills आहेत. त्याकडे त्या नजरेतून बघणे योग्य.
ताटातले पदार्थ तर जास्तच आवडले : P थँक्स
बरोबर ममो. भाज्या, फळं
बरोबर ममो. भाज्या, फळं ह्यातलं सगळंच आपण खात नसतो.
मस्त सजावट!
मस्त सजावट!
सुंदर.
सुंदर.
कला म्हणून बघावं >> +१
जसं कागदावर चित्र काढलं की कागद, पेन्सिल, खडू, रंग फुकट जात नाहीत तर त्याचा वापर होतो तसंच हे. खाण्याचे पदार्थ आल्याने होणारी द्विधा समजू शकतोच, पण ही कलाच आहे.
@ मनीमोहोर , अगदी सुंदर,
@ मनीमोहोर , अगदी सुंदर, भारीच दिसतंय!
सुरेख, हेमाताई.
सुरेख, हेमाताई.
टोमॅटो ची फुल मस्त दिसताहेत.
टोमॅटो ची फुल मस्त दिसताहेत.
आता रोज प्रॅक्टीस करायला पाहिजे
सुंदर सजावट! ताटातले पदार्थ
सुंदर सजावट! ताटातले पदार्थ देखिल भारी!
छानच सजावट आणि जेवण पण!
छानच सजावट आणि जेवण पण!
सुरेख दिसत्ये सजावट अगदी!
सुरेख दिसत्ये सजावट अगदी!
ममो खूपच छान. एकदम आखीव रेखीव
ममो खूपच छान. एकदम आखीव रेखीव आणी मनमोहक दिसतयं.
खूपच छान सजावट. जेवणाचा बेत
खूपच छान सजावट. जेवणाचा बेत पण झकासच, एकदम तोंडाला पाणी सुटले.
आणि हो, त्या हॉटेलमध्ये एक तै पाककृतीवर लिहितात त्यांच्यासारखा फोटोच्या मधोमध "मनिकामिहिर" असा काहीतरी बटबटीत लोगो टाकला नाहीत, त्याबद्दल तुमचे विशेष आभार.
मस्त आहे टोमॅटो ची फुलं .
मस्त आहे टोमॅटो ची फुलं .
सुरेख!! सजावट आणि पदार्थ
सुरेख!! सजावट आणि पदार्थ दोन्हीही!!
फार छान सजावट आहे. पण फक्त
फार छान सजावट आहे. पण फक्त एकच पुरी ! पोट भरणार नाही. ५-६ तरी पुऱ्या हव्यात
मस्त सजावट
मस्त सजावट
मस्त दिसतय. टोंमॅटो आणि काकडी
मस्त दिसतय. टोंमॅटो आणि काकडी खायला आवडते त्यामुळे जेवताना माझा हात ताटाबरोबरच महिरपीत पण जाण्याची दाट शक्यता आहे
मस्त सजावट
मस्त सजावट
मला काय फरक पडत नाय.खाली मॅट
मला काय फरक पडत नाय.खाली मॅट नसले तरी सगळी टॉमेटो गुलाबं नळाखाली धुवून मटकावेन.
Pages