काही बदलांची नोंद. रसिकता वाढत चाललीय. झाकिर हुसेनचा तबला, किशोरी आमोणकरांची दुर्मिळ रेकार्डींग, वसंतरावांचं गाणं कुणीतरी कुठूनरी शोधून काढतं. नक्की ऐका आणि पुढे पाठवा असा आग्रह असतो. कधी। पुलं, अत्रेंचा किस्सा येतो.. बऱ्याचदा ऐकलेला असतो. पण। पाठवणारानं पहिल्यांदाच ऐकलेला असतो. त्याचाही नाईलाज असतो. मग कुणी तरी कधीतरी संदीप खरेची "दमलेला बाबा" वाचून कासावीस होतं. आपण एकट्यानंच का कासावीस व्हायचं? हा सुविचार मनात घेऊन मग। तो इतरांना कासावीस करायला धडाधडा पोस्ट करत सुटतो. तत्वज्ञानाला आता कधी नाही इतके चांगले दिवस आलेत. जगावं कसं, मित्र कसे जोडावेत, आपलं कुठं चुकतं याबद्दलची जनजाणीव फार म्हणजे भयंकर वाढीला लागलीय हे whatsapp, face book, twitter इत्यादी माध्यमातल्या देवाणघेवीतून स्पष्ट होतंय. संगीतात आधी औरंगजेब असणाऱ्या आपल्या दोस्ताला आता मदनमोहन, ओपी नय्यर, सज्जाद ही मंडळी लंगोटीयार असल्यागत आवडायला लागली आहेत. वि.स. खांडेकर, शिरवाडकर, आरती प्रभू ह्यांच्या वाटेलाही न जाणारा आपला दोस्त किंवा मैत्रिण त्यांच्या घरी नुकतीच जाऊन आल्यागत त्यांच्या आठवणी शेअर करायला लागतात तेंव्हा गदगदून जायला होतं. आपलीच दोस्त मंडळी आपल्यालाच ओळखू येत नाहीत. सालं हे तिसरंच कुणी फेक अकाऊंटवरुन आपली चेष्टा तर करत नाही ना हा विचार ऊसळी मारुन वर येतो.
........ बरं ते जाऊ देत. तुम्ही पुलंचा तो किस्सा ऐकलात की नाही? एकदा किनई पुलंना एक माणूस विचारतो......
.
.
काय झालं? अहो असं काय करताय? चक्कर आली वाटतं? पाणी प्या. बरं वाटेल. की डॉक्टरला बोलावू?
© डॉ. अशोक कुलकर्णी
रसिकता वाढत चाललीय......
Submitted by डॉ अशोक on 20 April, 2018 - 00:35
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ह्म्म होतं अस बरेच वेळा, पण
ह्म्म होतं अस बरेच वेळा, पण त्यांना आपण हे आधिच वाचलेलं/ऐकलेलं/पाहिलेलं आहे हे कळु न देण्यात मजा आहे, वा खुप छान शेअर केलंत असं बोलुन त्यांचा आनंद वाढवावा.
किस्सा टाका की
किस्सा टाका की
देशप्रेम सुद्धा वाढतेय
देशप्रेम सुद्धा वाढतेय
अस्सल विनोदी लिखाणाचा दर्जा
अस्सल विनोदी लिखाणाचा दर्जा वाढतोय....
धन्यवाद मित्रांनो !
धन्यवाद मित्रांनो !