आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा....
भाग-1
https://www.maayboli.com/node/65783
भाग-2
https://www.maayboli.com/node/65793
भाग-3
https://www.maayboli.com/node/65800
भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807
भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818
भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825
भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829
भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात
रात्री घरी येताना सोहमचा त्याला फोन आला.. गाडी चालवत असल्यामुळे त्याने घेतला नाही. घरी गेल्यावर त्याने काॅल करून विचारलं. सोहम म्हणाला "माध्यमाचा बंदोबस्त मी केलाय...त्याला तोडीस तोड माणूस माहितीये मला. उद्या कड्यापाशी साडे अकराला भेट. तिथनं जाऊया"....
आता इथून पुढे...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
सोहमने राजेशला साडे अकराला भेटायला ये एवढच सांगितलं होतं. पण त्याच्या डोक्यात नक्की काय शिजत होतं हे त्याला अजूनही समजत नव्हतं.जेवताना बराच वेळ त्याला हाच प्रश्न पडला होता. शेवटी सोहम काय ते ठीक करेल या विश्वासावर तो झोपी गेला.
सकाळी अकरा वाजता तयार होऊन राजेश कड्याकडे जायला निघाला. खरं तर काल जेव्हा सोहमने पुन्हा कड्यवर भेटायला बोलवलं तेव्हा भीतीने आधीच त्याच्या हृदयाचं पाणी झालं. शेवटी सोहमने बरंच समजवल्यावर कुठे तो तयार झाला. जसजसा कडा जवळ यायला लागला तसंतसं चार दिवसापूर्वीच्या सरप्राईजच्या आठवणीने त्याच्या छातीत धडधडायला लागलं.
कड्याच्या थोडं आधी त्याने सोहमला फोन करून विचारलं; " आलास का रे? तिथे रोहन नाहीये ना? हीच जागा मिळालेली का रे तुला भेटायला!"
सोहम हसत हसत म्हणाला" आलोय मी इथे. अरे मित्रा रोहन बोलवल्याशिवाय येतो का रे? तसं असतं तर या आधीच नेलं असतं की त्याने तुला.. ये लवकर मी आहे इथेच."
राजेश कड्यावर आला. उतरल्यावर धावतच सोहमकडे गेला आणि म्हणाला; "काय ते पटापट बोल आणि लवकर निघूया इथनं आपण. मला मरायचं नाहीये."
सोहमने त्याला तिथली मुठभर माती आणि गवताच्या काड्या घ्यायला लावल्या. राजेशने पटकन हवं ते सगळं गोळा केलं आणि लगेच ते तिथनं निघाले. गाडीत बसल्यावर राजेशने सुटकेचा निःश्वास टाकला. कारखान्यात आल्यावर दोघे केबिनमध्ये भेटले. सोहमने त्याला रात्री साडे बारा वाजता तयार रहायला सांगितलं आणि तो निघून गेला.
रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोहमची वाट बघत राजेश बंगल्याच्या टेरेसवर येरझार्या घालत होता. दहा मिनीटांनी सोहम आला आणि ते निघाले..तासभर ड्रायव्हींग केल्यावर ते दुसर्या गावात पोचले.सोहमने गाडी रस्त्यावर पार्क केली आणि ते चालत निघाले. राजेशला आता भीती वाटत होती. रात्रीच्या वेळी जंगलातलं ते विशिष्ट वातावरण ; वाळलेल्या झाडांचे वेडेवाकडे विचीत्र आकार अंगावर येत होते. जस जसे ते आत जात होते तस तसा एक वेगळा जळल्यासारखा वास तीव्र जाणवायला लागला. चालत चालत ते एका जुन्या विचीत्र वाळलेल्या झाडापाशी आले. तिथे राजेशला एक व्यक्ती कसलीतरी पूजा करताना दिसली. आतिशय उग्र दर्प पसरलेला सगळीकडे. आजूबाजूला सगळीकडे अवकळा पसरल्यासारखं वातावरण होतं. संपूर्ण अंगाला भस्म फासलेली ती व्यक्ती कुठल्यातरी साधनेत मग्न होती. कुठल्यातरी मायावी शक्तीला प्राप्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते त्याचे. आजूबाजूला कवट्या पसरलेल्या होत्या.अर्ध्या तासाने त्याने डोळे उघडले..त्याचे ते खोल गेलेले तांबूस डोळे; छातीचा पिंजरा; चेहेर्यावरचं खुनशी गूढ हास्य बघून राजेश सर्द झाला. आताच्या आता इथून पळून जावं असं वाटत होतं त्याले. पण सोहम बरोबर असल्याने त्याला निघता येत नव्हतं. सोहमने आदल्या दिवशी त्या बाबाला येणार असं सांगितलेलं. "हा राजेश!" असं म्हणत त्याने ह्याची ओळख करून दिली. त्या बाबाने राजेशला जवळ बोलवलं. आणि दोन मिनीटं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला पुन्हा समोर बसायला लावलं. तो स्पर्श राजेशला आतिशय किळसवाणा वाटला.त्या बाबाने राजेशकडनं सकाळी घेतलेली माती आणि गवताच्या काड्या मागून घेतल्या.काही मंत्र म्हणून कसली तरी पूजा केली. स्वतःकडची एक पांढरी पूड मातीत मिसळली. नंतर त्याने राजेशला माती परत देऊन एक मंत्र सांगितला आणि जिथे विध्वंस घडवायचाय तिथे जाऊन एक कृती करायला सांगितली.गवताच्या काड्या मात्र स्वतःकडे ठेवल्या. त्याला पैसे देऊन दोघे त्या निर्जन भयप्रद ठिकाणाहून निघाले. जाताना त्यांना त्या झाडाखाली बसलेल्या अघोरी बाबाचं गडगडाटी हास्य ऐकू आलं.....
क्रमशः
--आदिसिद्धी
कारखान्यात आल्यावर दोघे
कारखान्यात आल्यावर दोघे केबिनमध्ये भेटले. सोहमचे त्याला रात्री साडे बारा वाजता तयार रहायला सांगितलं आणि तो निघून गेला.
सोहमचे ऐवजी सोहमने असे हवे आहे
व्वा!!!! भारीच जमलाय हा भाग.
व्वा!!!! भारीच जमलाय हा भाग. खूप आवडला. त्या बाबाचं वर्णन अगदी मस्त केलं आहेस हं. शेवटचा पॅरा वाचताना खरंच भीती वाटत होती.
कृपया कथेत जे वारबदल संपादीत
कृपया कथेत जे वारंवार बदल संपादीत करतेस ते खाली प्रतीसादात पण पेस्ट करत जा. कथेत कुठे बदल केला ते लिंक लागत नाही.
कृपया कथेत जे वारंवार बदल
. डबल पोस्ट
अर्रे किती त्या लिंक द्याल
अर्रे किती त्या लिंक द्याल कथा भागांच्या ?
ब्युटीपार्लर-भाग१
जुई आणि सिद्धी, एक काम करा. लिंक देताना खालीलप्रमाणे द्या.
छान लिहीलंय.. आवडलं वर्णन..:)
छान लिहीलंय.. आवडलं वर्णन..


"डोक्यावर हात ठेवला !" अर्रे टण्णकन् उडालोच मी.. हे कुठं बघितलंस ?
आणि लावलंय काय हे, अघोरी बाबा.. स्मशान साधना, तिकडे ब्युटीपार्लर मध्ये पण कसलीशी गुढ पेटी, तो श्लोक..
अतर्क्य आहात तुम्ही...
मला तर आता वाटायला लागलंय खरेच मांत्रिक तांत्रिक आहात की काय दोघी...
पुलेशु !
@ भुत्याभाऊ..धन्यवाद चूक
@ भुत्याभाऊ..धन्यवाद चूक सांगितल्याबद्दल...केलीये दुरूस्त....
@पाफा काका..ती भुत्याभाऊंनी सांगितलेली चूक दुरूस्त केलीये....पुढच्या वेळी प्रतिसादात तसं सांगत जाईन....
@ आनंददादा तशी लिंक टाईप करताना कुठेतरी गंडत आणि लिंकच येत नाही....आधी ट्राय केलेलं पण नाही जमलं ...तरीही पुन्हा करून बघेन.....तुझेही धन्यवाद.....
@द्वादशांगुला धन्यवाद....
"खरेच मांत्रिक तांत्रिक आहात
"खरेच मांत्रिक तांत्रिक आहात की काय दोघी... " अगदी हेच मला लिहायचं होतं.
त्यांनी लेखनसिद्धी प्राप्त करून घेतली असावी.
भाग नेहमीप्रमाणेच उत्तम
हा हा हा....मी मांत्रिक
हा हा हा....मी मांत्रिक नाहीये....बारावी science student आहे....देव आणि भूत या दोन्ही गोष्टींवर सहावीपासून माझा विश्वास नाहीये....पण हे अघोरी वगैरे मागे नक्की काहीतरी scientific कारणं असतील असं मला वाटतं...कधीतरी अभ्यासातनं वेळ काढून शोधायचा प्रयत्न करणार असं ठरवलय.....कर्णपिशाच्च वगैरे गोष्टींमागे नक्कीच काहीतरी विज्ञान असावं......
मस्त झालाय हा भाग पण. मजा
मस्त झालाय हा भाग पण. मजा येतीये वाचायला
नेहमी प्रमाणे हाही भाग छान
नेहमी प्रमाणे हाही भाग छान आहे .पुलेशु