अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे?

Submitted by बन्या on 26 March, 2018 - 23:55

अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे? म्हटला तर बाळबोध पण तेवढाच महत्वाचा प्रश्न
सध्या माझ्यासमोर हाच प्रश्न पडलाय राव. आम्ही दोघेही पुण्यातले वय ३५ च्या आसपास, नकार द्यायला काही कारण नाही, पण अँटेचमेंट होत नाहीये.

इकडचे तिकडचे विषय झाले
एकमेकांच्या आवडीनिवडी झाल्या, बरेसचे विषय झाले पण तो एक्स फॅक्टर मिसिंग आहे
लग्न आता महिन्याभरात आलय, दोघांनाही तेच टेंशन आलय, भेटणे , watsapp, सुरु आहेच पण काही समजत नाहीये, २१ व्या वर्षी असतो तसा अवखळ पणा नस्लयाने की कशाने काही कळत नाहिये,मान्य आहे दोन महिन्यांच्या भेटित लगेच प्रेम कसे होईल पण खुप ताण आलाय याचा, घेतलेला निर्णय बरोबर असेल ना

Group content visibility: 
Use group defaults

Pages