गजल

Submitted by रज्जाक शेख on 20 March, 2018 - 09:10

एकाकीपण संपवण्या सरसावून आली गजल
सारे सोडून गेले तेव्हा धावून आली गजल

चालेनाशी झाली जेव्हा मेंदूचीही मात्रा
रक्तात चिंब हृदयाच्या न्हाऊन आली गजल

अस्पष्ट भावनांना आकार द्यावयासाठी
संकेत सारे बंधनांचे धुडकावून आली गजल

निराशेच्या भयाण काळ्या रातीने केले हैराण
दीप आशेचे सर्वत्र तेव्हा लावून आली गजल

पराजयाने पुरता जेव्हा खचून गेलो होतो
ध्वज तेव्हा विजयाचा उंचावून आली गजल

अव्हेरले जगाने साऱ्या, वा-यानेही पाठ फिरवली
मज कवेत घेण्या बाहू फैलावून आली गजल

डॉ. रज्जाक शेख ‘राही’

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार चांगले आहेत. Happy

कृपया प्रत्येक ओळीतील मात्रा मोजाव्यात आणि त्या अक्षराखाली मांडून ठेवाव्यात अशी नम्र विनंती.

छान

वृत्त हे आकृतिबंधाचे अंग जरा अजून व्यवस्थित अभ्यासावे