Submitted by रज्जाक शेख on 20 March, 2018 - 08:58
का करती हेवा, का लोक जळाया लागले
प्रश्न हे दिनरात, मनाला छळाया लागले
संपले बहुतेक त्यांचे खाजगी उद्योग सारे
लोक माझे का बरे दळण दळाया लागले?
आले बघा हे घर माझे हाकेच्या अंतरावरी
नेमके आताच का, अवसान गळाया लागले?
माझ्यासोबत राहूनी, गेले तेही वैतागुनी
दुःख मजला सोडूनी, सारे पळाया लागले
वेळ झाली 'राही' जगाला सोडून जाण्याची
अन आताशी कुठे मजला,थोडे कळाया लागले
डॉ. रज्जाक शेख ‘राही’
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users