ताणतणाव घालवण्याचे माबोकरांचे फंडे (stressbuster) काय आहेत ?

Submitted by किल्ली on 16 March, 2018 - 05:31

तुमचे stressbuster फंडे काय आहेत ?
कृपया इथे त्याबाबतचे विचार मांडा, म्हणजे कसं बरं होईल, हो ना ?

मानसिक ताणतणाव (आणि कधी कधी येणारा बौद्धिक ताणतणाव Lol ) घालवण्याचे किल्लीचे काही फंडे आहेत, जसे की :
१. माबो वर वाचन करणे, प्रतिक्रिया देणे , खूपच विचार असह्य झाले तर लिहिणे !!
२. भांडी घासणे (खरंच !! उत्तम stressbuster आहे हा !! एकदा बघाच !!)
३. कोल्ड कॉफी , चोकोलेट किंवा पाणीपुरी हादडणे
४. गाणी ऐकणे , धांगडधिंगा असणारी !!

भन्नाट आणि खास उपाय येऊ द्यात !!! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली ;चिल मारायला गेलं की राहीलेला अभ्यास समोर दिसायला लागतो आणि मग मात्र टेन्शन येत.अभ्यासाच्या टेन्शनबाबतीत द्वादशांगुलाशी सहमत.

टिपिकल जेवण हवं असंच नाही पण चॉकोलेट, कॉफी, पाणीपुरी, भेळ किंवा आई भेटली तर तिच्या हातचा कुठलाही पदार्थ स्ट्रेसबस्टर होतो माझ्यासाठी !!

चिल मारायला गेलं की राहीलेला अभ्यास समोर दिसायला लागतो आणि मज मात्र टेन्शन येत>>>>>>>@आदिसिद्धी
चिल मारणं म्हणजे टाईमपास ह्या अर्थाने म्हणत नाही मी !! ह्या context मध्ये चिल मारणं म्हणजे ताण न घेता , विचार न करता, जे होईल ते बघू ह्या विचाराने हातातलं काम करणे , किंवा दुसरच काहीतरी वेगळं करणे

सध्याच्या इंटरनेटच्या युगात अक्षरशः हाताच्या बोटाशी जगातली सारी माहिती उपलब्ध आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. याचा फायदा अशा बाबतीत आपण घ्यायला हवा. विविध क्षेत्रातील यशस्वी दिग्गजांची भाषणे, मुलाखती युट्युबवर उपलब्ध आहेत. ताणतणाव, मानसिक थकवा, औदासिन्य, लो फील, निरुत्साही वगैरे वगैरे वाटू लागले कि हे व्हिडीओ पहायचे. अगदी बिल गेट्स पासून रतन टाटा यांच्या पर्यंत. मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शिकण्याच्या वृत्तीने पहायचे. काही राजकीय नेत्यांची भाषणे सुद्धा ऊर्जादायी असतात. काही अभिनेते, खेळाडू, कलाकार सुद्धा त्यांच्या मुलाखतीतून वा भाषणातून खूप उर्जा देऊन जातात. त्यांच्या जीवनात अनंत अडचणींवर मात करून यशाची उच्च शिखरे गाठलेले हे सगळे लोक आहेत. त्यांच्या अनुभवातले ओंजळभर सुद्धा आपले छोटेमोठे ताणतणाव घालवण्यासाठी खूप उपयोगी पडतात Happy प्रयत्न करून पहा.

"ऋन्मेशचे" स्ट्रेस ?? ???
काही झेपला नाही .. काय म्हणायचं आहे आहे तुम्हाला नेमकं ?

मी जुनी माबो वाचते तिथे हितगुज मध्ये मी अनुभवलेले मध्ये धमाल धागे आहेत.
किंवा मग यु ट्युब वर खरेदीचे हौल चे व्हिडिओ किंवा नेल आर्ट चे किंवा रेसिपीचे व्हिडिओ पाहते.
अलिकडे मराठी नाटक पाहणे ही सुरू केले.
पुर्वी अल्फावर रसिका जोशी, अरूण नलावडे आणि सोनाली चेऊलकर चे गम्मत जम्मत नावाचे नाटक सतत लागत असे. ते पाहिले परवा. अतिशय मस्त नाटक आहे.

@ दक्षिणा@:
जुनी माबो कशी वाचावी ? लिंक द्या ना

Lol मस्त विषय आणि सगळ्यांचे प्रतिसाद सुद्धा.
माझ्यापुरते प्रामाणिकपणे सांगायचे तर स्ट्रेस घालवण्यासाठी मी ऋन्मेष चे धागे वाचतो.
त्यांचे 'येल्लो येल्लो डर्टी फेल्लो !!' सारखे अनेक अफलातून धागे आहेत (ज्यावर ते शाखा, स्वप्नीलचा जयघोष करत नाहीत) ते खरोखर स्ट्रेसबस्टर म्हणून काम करतात.
स्ट्रेस घालवण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून वाचावे असे अनेक धागे ऋन्मेष ने ऊघडले, चालवले आणि सुपरडुपर हिट केले आहेत.
ऑफिसातून घरी जातांना ह्यातल्या एका धाग्याचा डोस घेतला म्हणजे आपला स्ट्रेस घराच्या बाहेरच सोडता येतो... कधी चुकून एखाद्या दिवशी हा डोस मिस झाला की मग आपला स्ट्रेस पाहून घरातल्या व्यक्तीचा स्ट्रेस डबल होतो आणि तो दिवस वाईट जातो हा अनुभव आहे.

हायझेनबर्ग _/\_

मी सवता स्ट्रेस घालवण्यासाठीच मायबोलीवर चक्ककर मारतो. फक्त माझा स्ट्रेस वाचून नाही तर काहीतरी लिहून जातो Happy

माझ्यापुरते प्रामाणिकपणे सांगायचे तर स्ट्रेस घालवण्यासाठी मी ऋन्मेष चे धागे वाचतो.>>अगदी अगदी
त्याचे सुरुवातीचे खूप सारे धागे अगदी खुउउप इंटरेस्टिंग आहेत,त्यामुळे तेच वाचते हल्ली एकदम सुमार दर्जा वाटतो त्याने स्ट्रेस वाढेल म्हणून ते नाही वाचत
त्याच सोबत दाद,विद्या भूतकर(या हल्ली आजिबात लिहीत नाहीत)कवटी चाफा यांचे धागे आणि बाकी प्रवास वर्णने वाचते त्याने खूप छान फील येतो

आनापान करतो, पाच ते दहा मिनिट. तणाव एक्स्पोनान्शियली खाली येतो.
मग संगीत ऐकणे किंवा वाचन. टिव्ही बघणे टाळतो.
कधी योगनिद्रा.

आपले संपुर्ण आयुष्य श्वास व विचार या वरच आधारलेले आहे. शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी बदलत असतात म्हणजेच आपण नविन पेशीने तरुणच असतो. म्हणजेच आपल्या वयाच्या कोणत्याहि साली 70, 80, 90, किवा 100 साली आपण नविन पेशीने तरुणच असतो. पर्ंतु समाजमनाने भरलेल्या म्हातारपणाच्या जाणीवेने आपण ते मान्य करत नाही व म्हातारपणाच्या जाणीवेने आपल्या पेशीना म्हातारे करुन निसर्गाने देऊ केलेले चिरतरुणपण दूर सारतो. फुफूसे पूर्ण भरुन घेतलेल्या श्वासानाने आपले शरिर शुद्ध होते व शुद्ध विचाराने मन शुद्ध होते. कारण सर्व साधारण माणसे श्वास घेताना फुफूसांचा 10% च उपयोग करतात. श्वास आधिक घेण्याचे प्रमाण कसे अचुकपणे वाढवावे व Negative विचारना बाजुला करून Positive विचार कसे रुजवावे , त्याना ध्यानाच्या सरावाने कसे शुद्ध करावे हे ब्रम्हविद्येच्या सरावने सहज साध्य होते. ब्रम्हविद्येच्या नेहमिच्या सरावाने चिरतारुण्य अपणास नक्कीच प्राप्त होईल. ब्रम्हविध्येचा प्रार्थमिक वर्ग 22 आठवड्याचा आहे. दर आठवड्याला 1 तास 30 मिनिटे असा वर्ग चालतो . 18 वर्षावरील सर्व साधक हा वर्ग करू शकतात.
गुरुकिल्ली तुमची, आरोग्य आणि यशाची, ब्रह्मविध्या शिका
आध्यात्मिक श्वसनप्रकार व ध्यानाचे दुर्मीळ योगशास्त्र
वारिल योगशास्त्र आपले शरिर आणी मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखविते. हे अनुभव घेण्याचे शास्त्र आहे. जेव्हडा याचा सराव कराल तेव्हडी त्याची प्रचीती येइल.
ब्रम्हविध्या साधक संघ हा चॅरीटेबल ट्रस्ट आहे. आधिक माहितीसाठी 022 25347788/25339977 या फोन नंबर वर संपर्क करावा.
शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी कशा बदलत असतात त्यासाठी Goole Surch मधील उतारा खाली दिला आहे
The Short Answer: Recent research has confirmed that different tissues in the body replace cells at different rates, and some tissues never replace cells. Using a revolutionary new technique (described below), researchers have shown that:
1. Neurons in the cerebral cortex are never replaced. There are no neurons added to your cerebral cortex after birth. Any cerebral cortex neurons that die are not replaced.
2. Fat cells are replaced at the rate of about 10% per year in adults. So you could say that on average, human beings replace all their fat cells about every ten years.
3. Cardiomyocyte heart cells are replaced at a reducing rate as we age. At age 25, about 1% of cells are replaced every year. Replacement slows gradually to about 0.5% at age 70. Even in people who have lived a very long life, less than half of the cardiomyocyte cells have been replaced. Those that aren’t replaced have been there since birth.

पुंबा, तणावाचा किमान शब्दात कमाल अपमान केल्यास तणाव निघून जातो असे ऐकून आहे. Wink
पण मज पामरास ती कला अवगत नाही.

१. मनात जे आहे ते कोणाला तरी सान्गून टाकावे.. गोष्टी फार काळ मनात साचून राहिल्या की त्रास होतो
कोणीतरी विश्वासाचं असं हवं की ज्यच्याजबळ मन मोकळ करता आलं पाहिजे..
असं केलं की बिल्कुन स्ट्रेस येत नै
२. मित्रमैत्रीणी / नातेवाईक ह्यांना घरी बोलवुन जेवायला घालते Proud
हे आजकाल नवीन शोधून काढलय Happy

>> मित्रमैत्रीणी / नातेवाईक ह्यांना घरी बोलवुन जेवायला घालते
तुला पुढचा स्ट्रेस कधी येईल साधारण ते सांग तेव्हा तुझ्या नजरेसमोर रहायचा प्रयत्न करेन Wink

@चिमण:
या कधीही..
स्ट्रेस तर असतोच जीवनात Happy
(इथे जीवन हा शब्द लिहिताना समस्त मराठी जनतेचा स्ट्रेस बस्टर असणाऱ्या पु ल ह्यांची आठवण झाली )

आपण दुखात असलो की आपल्यापेक्षा दुखी लोकं बघायचे आपले दुख हलके होते.
तसेच स्ट्रेस आला की आपल्यापेक्षा जास्त स्ट्रेस असलेले लोकं बघायचे., स्ट्रेस कमी होतो.. आणि नाहीच दिसले असे लोकं तर आपणच आजूबाजूच्या लोकांना स्ट्रेस देऊन त्यांची मजा बघायची Happy

मला stress आला की शु लागते नंतर शु लागली याचा stress येतो. यावर मला अजुन तरी उपाय सापडला नाही.

> मला stress आला की शु लागते

हे कॉमन आहे

> शु लागली याचा stress येतो

काय कारण? शारीरिक उत्सर्जन आवेग जास्त काळ थांबवू नयेत

>>>>>>>>>> तलत मेहमूद ऐकते. (या व्यक्तीच्या गायकीने सुखदुःखात जी काही साथ दिली आहे त्याबद्दल मी त्यांची आजन्म ऋणी आहे).>>>>>>>>> आहाहा निळ्या मखमली आवाजाचा हा जादूगार! आठवण काढल्याबद्दल धन्यवाद चंद्रा.
@किल्ली - Astrology is my pacifier, stressbuster, my solace. ताणतणावात मी ज्योतिष किंवा कवितांकडे वळते. इंग्रजी, हिंदी (कविताकोष डॉट ऑर्ग ), मराठी.

तलतचा निळा मखमली आवाज! काय चपखल उपमा दिली आहेस सामो. इतर कितीही गायक ऐकले तरी तलतचा माझ्यावरचा प्रभाव कमी होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही!

चंद्रा, तलत आणि सुरैय्याचा 'वारीस' सिनेमा पहा. त्याचा गद्य आवाजही इतका मखमली आहे, माय नीज लिटरली गो वीक!!

मला एकदा भरपूर स्ट्रेस आला होता. घरी दिवाळीचे उरलेले सुतळी बॉम्ब होते. त्याचा अगरबत्तीला लावून टाईम बॉम्ब केला आणि शेजारच्या ओटीवर ठेऊन आलो. मस्त मजा आली होती.

सध्याच्या निरीक्षणानुसार मायबोलीकरांकडून स्वतःचा स्ट्रेस घालवायला (आणि दुसऱ्याचा वाढवायला) एडमिन विपु मध्ये काहीही खरडणे हाच एकमेव ट्रेंड फॉलो करणे सुरु आहे असे दिसते Light 1

सामो, तलतचा नूतनबरोबरचा सोने की चिडीया खूप वर्षापूर्वी पाहिला होता. वारीसबद्दल आठवत नाही. घरी गेले की बघेन Happy

१. वाचन
२. घराबाहेर पडुन एकांतात लोकांच/ आजुबाजुच्या परिसराचं उगाच निरीक्षण करत बसणे..
३. मोठ्यानं हेडफोनवर गाणी ऐकणं आणि ती बडबडणं..
४. स्केचिंग करणं.. (जे आजकाल अजिबात करत नाही Sad )

अशामुळेच मुंबईत लोंढे येतात आणि वरून मुंबईकर परप्रांतीयोसे ना अंखीया मिलाना हे रडगाणे गात आणखी तणावग्रस्त होतात.
त्यापेक्षा हैद्राबादची नवी गल्ली नवी टपरी एक्सप्लोर करा.
मला तेलुगू येत नाही, मी परप्रांतीय आहे मराठी, इंग्रजी, हिंदी /इत्यादीत बोलाल का असे बिनधास्त विचारा.
बघा कसा चुटकीसरशी ताण तणाव दूर होतो.

ऋन्मेऽऽष चे धागे वाचते....गाणी ऐकते....मायबोली चे लेख आणि प्रतिसाद वाचते(चुकीची ऐकू आलेली गाणी आणि मुले लाजवतात तेव्हा चे किस्से).सगळा स्ट्रेस निघून जातो.

सगळ्यात भारी काम म्हणजे झोप काढणे, दुसरे काम जुन्या मित्र किंवा मैत्रीणीबरोबर बसणे. अर्थात बसुन काय करायचे खायचे,प्यायचे का गप्पा मारायच्या अथवा बाहेर फिरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे

झोपणे
डोक्याला त्रास झाला की मी झोपतो थोडा वेळ डोकं शांत झालं की त्या गोष्टीवर विचार करतो
नाहीतर एकांतात शांत वातावरणात बसतो छान वाटत

बाकावर बसून क्रिकेट खेळणारी मुले' नक्की कोणत्या मैदानात जाऊन बघायची?
>>>
असं का म्हणत आहात? गाव तिथे मैदान.मुंबईत गल्लोगल्ली क्रिकेटचा खेळ चालू असतो. हल्ली मात्र प्रमाण फार कमी झालेय.

Pages