बागकाम अमेरिका - २०१८

Submitted by मेधा on 2 March, 2018 - 08:31

मिनू* आईला म्हणाली " आई, मार्च महिना सुरु झाला . फ्लावर शो च्या जाहिराती झळकतायत जिथे तिथे. बियांचे, कंद मुळांचे कॅट्लॉग्ज यायला लागलेत. फोर्सिथिया, विच हेझल फुललेत इकडे तिकडे. क्रोकस आणि डॅफोडिल्स ची हिरवी पाती डोकावयला लागले. होस्टाचे कोंब उगवून आले. अजून मायबोलीवर धागा कसा आला नाही यंदाच्या बागकामाचा ? "

कोण कोण येणार फ्लावर शो बघायला यंदा ? बागकामाचे काय प्लान्स? लिहा इथे पटापट

https://theflowershow.com/plan-your-visit/show-info/

* संदर्भ मोरु, त्याचे बाबा आणि सीमोल्लंघन

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, काल अंजीराचे रोप मोठ्या कुंडीत लावले. उन्हाळ्यात डेक जवळपास १/४ तरी रोपांनी व्यापलेला असतो. पण ऑक्टॉबर ते मे रिकामा असायचा. गेल्या वर्षी दोन मोठ्या कुंड्यामधे केशराचे कंद लावले होते. त्या कुंड्या वर्षभर डेक वर असणार. आता त्यात अंजीराच्या रोपाची भर !

घरचे पहिले फळ - Pear
 Gardening - May 2018 &emdash;

कालचे प्रोजेक्टः वेल वाढण्यासाठी/आधार देण्यासाठी केलेली सोय अर्थात (झटपट Vegetable Trellis)
साहित्य: ( + फोटोत नाही: मोजायची टेप, मार्कर पेन)
 Gardening - May 2018 &emdash;

योग्य त्या लांबीचे पाईप कापून घ्या.
 Gardening - May 2018 &emdash;

दर १० इंचांवर खुणा आखून घ्या. यातून तार किंवा दोरा टाकून नंतर जाळी तयार करता येईल.
 Gardening - May 2018 &emdash;

दर १० इंचांवर ड्रिलिंग करून घ्या.
 Gardening - May 2018 &emdash;

चौकट तयार करा.
 Gardening - May 2018 &emdash;

वाफ्यात फ्रेम उभी करा
 Gardening - May 2018 &emdash;

माती बाजूला सारून नंतर फ्रेम त्यात टाका आणि वरून माती टाका म्हणजे फ्रेम हलणार नाही किंवा पडणार नाही.
 Gardening - May 2018 &emdash;

पाईप ३/४ इंच पी.व्ही.सी. प्रत्येकी १० फूट लांब घेतले (प्रत्येकी किंमत $२.७१) मी साधारण १८ इंचावर वाफे करतो, त्यामुळे १८ इंचाचे तुकडे फ्रेमचा भाग जमिनीत पुरण्यासाठी केले आणि उरलेले पाईप उभे असे वापरले ( साधारण उंची ७० इंच आहे). या पद्धतीमुळे नंतर फ्रेम सहजपणे सुट्टी करून ठेवता येईल किंवा अजून वाढवतापण येईल, हा फायदा आहे.
एकूण खर्च साधारण $२० पेक्षा कमी.
लागलेला वेळ: अंदाजे अर्धा तास ( अजून जाळी तयार करायची आहे, वेल वाढतील तसे करायचा विचार आहे).

@ अमितव
वार्‍याने उडून/ पडून जाणार नाही कारण बेसला २ लांब पाईप्स वाफ्याच्या लांबीइतके (जवळपास ८ फुटी) वापरले आहेत आणि शिवाय ते खोल गाडून त्याच्यावर माती टाकली आहे. (शेवटून दुसर्‍या फोटोत दिसेल).

@ सायो, अदिति
धन्यवाद.

मस्त फोटो पै कौ.

तुमचा उत्साह आणि उरक वाखाणण्याजोगा आहे. >> +१

हम्म.. माझी त्या जड गोलात बसवलेली छत्री उडून खालचं काचेचं टेबल फुटलं. समहाऊ चित्रात बघून स्ट्रेंथ जाणवली नाही म्हणून विचारलं.

माझ्या कडे गेले ३-४ वर्षे स्टार जॅस्मिन चा वेल आहे. ह्या स्प्रिंग मध्ये पण भरपूर फुलं येउन गेली. हल्ली त्यावर शेंगा उगवायला लागल्या आहेत. आधिक माहिती हवी आहे प्लीज.

Pages