Submitted by मेधा on 2 March, 2018 - 08:31
मिनू* आईला म्हणाली " आई, मार्च महिना सुरु झाला . फ्लावर शो च्या जाहिराती झळकतायत जिथे तिथे. बियांचे, कंद मुळांचे कॅट्लॉग्ज यायला लागलेत. फोर्सिथिया, विच हेझल फुललेत इकडे तिकडे. क्रोकस आणि डॅफोडिल्स ची हिरवी पाती डोकावयला लागले. होस्टाचे कोंब उगवून आले. अजून मायबोलीवर धागा कसा आला नाही यंदाच्या बागकामाचा ? "
कोण कोण येणार फ्लावर शो बघायला यंदा ? बागकामाचे काय प्लान्स? लिहा इथे पटापट
https://theflowershow.com/plan-your-visit/show-info/
* संदर्भ मोरु, त्याचे बाबा आणि सीमोल्लंघन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्लावर शोचं माहित नाही पण मी
फ्लावर शोचं माहित नाही पण मी मम्सची ११ कटींग्ज मागवली आहेत. असलेल्याच झाडांचं नवीन मोठ्या कुंड्यांमध्ये स्थलांतर करायचं आहे. थंडीत मारलेली झाडं उपटून कुंड्या रिकाम्या करणं हे कामंही आहेच.
वा!.. काय दुथडी वाहतोय उत्साह
वा!.. काय दुथडी वाहतोय उत्साह या वर्षी लोकांचा!...
असो, यावेळेला 'नैनं छिंदति फ्रॉस्टाणि, नैनं दहति उन्हाळा' अशी ख्याती असलेली नॉक-आउट रोझेस लावून गपगार बसलो आहे. तीही मारून दाखवली तर पुन्हा कधी या बागकामाच्या भांजगडीत पडणार नाही
असं कसं चालेल २२/७ ?
असं कसं चालेल २२/७ ? बागकामाचा बग नैनं छिंदंति फ्रॉस्टाणि, नैनं खाद्यंति हरिणा: असा असतो. वीड , कीड, उन्हाळा, हिवाळा जमिनीची धूप, शेजार्याच्या झाडांची सावली या सर्वावर मात करणार आणि चिवटपणे दरवर्षी काहीतरी नवीन प्लांटिंग करणार असं म्हणा .
मागच्या फॉल मधे बरेचसे एकॉर्न आणि काही गिंको च्या बिया पेरल्या होत्या. त्याच्यावर लावलेले लेबल धुवट होऊन गेले आहे. सगळ्या कुंड्यां मधून थोडे थोडे कोंब दिसू लागले आहेत.
तळ्याच्या मागच्या बाजूला ३-४ चेरी लावायचा प्लान अॅप्रुव्ह झाला आहे. लॉन कापणार्या माणसाला सांगून त्याच्याकडूनच लावून घेणार असा विचार आहे.
अनेक वर्षांपूर्वी
अनेक वर्षांपूर्वी जॅस्मिनम सांबाक म्हणजे आपला मोगरा , नाइट ब्लूमिंग जॅस्मिन म्हणजे रातराणी आणि क्रॉसॅंड्रा म्हणजे अबोली हे कळले आणि जिथे कुठे नर्सरीत . होम डेपो मधे ही रोपे दिसली तिथून ती आणणे चालू होते. त्यातच कधी तरी मार्जोरम म्हणजेच मरवा असा साक्षात्कार झाला
तेंव्हापासून दर वर्षी एकदा तरी अबोली + मोगरा+ मरवा असे एक दोन गजरे एकावेळी होतील एवढी फुले मिळत असत. मग ती फुलं परडीत घालून फोटो, गजर्यांचा फोटो असे सगळे व्हॉ अॅप वर किंवा फेसबूक वर शेअर केले की भंपक बोटीची सिटीझनशिप अजून एका वर्षापुरती तरी कन्फर्म होत असे.
काल एका नर्सरीमधे अनपेक्षितपणे पाचू चं रोप मिळालंय. IRL भंपक बोट असलीच तर ती नोआ च्या आर्क सारखी नसुन कार्निव्हल किंवा तत्सम क्रूझ ची बोट असणार हे नक्की. तर हे झाड मिळाल्यामुळे आम्ही थोडे अबव्ह डेक सरकलो त्या बोटीत
पाचूचा सुगंध मात्र अगदी शाळेच्या दिवसांची आठवण करुन देतोय .
अमेरिकेत Patchouli Plant Pogostemon - या नावाने मिळेल
होम डेपो अगदीच डब्बा आहे झाडं
होम डेपो अगदीच डब्बा आहे झाडं बिडं मिळण्याबाबत. माझा तर मुळीच विश्वास नाही काही चांगलं, रेअर रोपं मिळण्याबद्दल.
तुम्ही तोपं शोधता मग कशी
तुम्ही तोपं शोधता मग कशी मिलणार, रोपं शोधा
आता शोधेन रोपंच.
आता शोधेन रोपंच.
मला होम डेपो मधे मोगरा आणि
मला होम डेपो मधे मोगरा आणि अबोलि बरेचदा मिळालीत. क्लेमॅटिस आणि होस्टा सुद्धा तिथे चांगल्या किमतीत असतात
आम्ही नॉन रेअर रोपंच दरवर्षी
आम्ही नॉन रेअर रोपंच दरवर्षी घरी आणून मारतो. ती मिळतात होम डेपो मध्ये. रेअर कशाला म(मा)रायला ठेवायची! म्हणून ठेवत नसतील ते.
मला गार्डीनिया मिळाला आहे
मला गार्डीनिया मिळाला आहे अनेकदा. मोगरेबिगरे नाहीत आमच्याजवळच्या होम डेपोमध्ये. मोगरे आणि तुळस इथे सब्जी मंडीत मिळतात.
अबोली कुठ्ठेच कध्धीच मिळाली नाही. (cough cough... )
मागे प्राजक्ताच्या बिया भारतातून आणून लावायचा प्रयत्न केला होता तो फसला. एकदा ते जमलं की सुडोमि!
ओह ' पाचु नि मरवा'मधला पाचू
ओह ' पाचु नि मरवा'मधला पाचू म्हणजे पचुली होय?!
अबोली कुठ्ठेच कध्धीच मिळाली
अबोली कुठ्ठेच कध्धीच मिळाली नाही. (cough cough. >> ल्हान्याच्या आवाजात आहे का ते ? तर विचार केला जाइल
(No subject)
अनंत, मोगरा,अनंत, कण्हेर ही
अनंत, मोगरा,अनंत, कण्हेर ही सगळी होमडिपो मध्ये बघितली आहेत. अबोली होमडिपोत मिळते हे मिथ आहे हे मी मागेच जाहीर केलं होतं ना, आता पुन्हा काय त्याचं?
अबोली होमडिपोत मिळते हे मिथ
अबोली होमडिपोत मिळते हे मिथ आहे हे मी मागेच जाहीर केलं होतं ना, आता पुन्हा काय त्याचं? >> मिळते कि. होमडिपो नि lowes दोन्ही मधे बघितली आहे. Zones प्रमाणे विकायला ठेवलेली झाडे बदलतात.
शोनू, ते पाचूचं प्लँट झोन ९
शोनू, ते पाचूचं प्लँट झोन ९-११ करता सांगतंय. तुझा झोन काय? आम्ही ६ मध्ये आहोत.
I am in zone 6 or 6B.
I am in zone 6 or 6B. Patchouli is perennial in zones 9-11. Similar conditions as tropics. Here it was listed as annual-just like coleus , lantana, crossandra are listed as annuals in my area. I am hoping to bring the patchouli plant indoors at the end of summer along with jasmine, hibiscus and other similar plants.
आमच्या इथल्या होम डेपो मधे
आमच्या इथल्या होम डेपो मधे काल मोगरा आणि अबोलीची मोठी रोपं होती. साधारण नॉक आउट रोझेस च्या कुंड्या असतात त्या मापाची. एवढी मोठी झाडं हिवाळ्यात घरात ठेवायची तयारी ठेवूनच आणावी लागतील. भरपूर स्टॉक दिसला आमच्या इथे तरी.
मला ते थंडीत कुंड्या आत आणणं
मला ते थंडीत कुंड्या आत आणणं प्रकरण अगदी नको होतं. आमच्याकडे घरच्यांनाही ते आवडत नाही अजिबात.
पाचू मिळाला? मस्तच की मेधा!
पाचू मिळाला? मस्तच की मेधा! आजोळी बागेत पाचू आणि मरवा होता. आईने हौसेने आमच्या बागेतही रोपं लावली होती. मला पाचू-मरवा म्हटल की माजघर, आजीची फणेर पेटी, अंबाड्यात अडकवायचे चांदीचे आकडे, पितळेची नक्षिदार परडी असे काहीतरी आठवत रहाते.
मी सीड्स ऑफ इंडीयातून मागवलेला मोगरा आणि अबोली दोन वर्ष अति काळजी घेवून मारले त्यापुळे आता पुन्हा लावायचा धीर होत नाही.
आमच्याकडे एका बागकाम मित्राच्या कृपेने ओकिनावा स्पिनाचचे खुळ आलेय. त्याने गेल्यावर्षी आमच्या एजुकेटरला रोप दिले ते ऑफिसमधे मस्त वाढले तेव्हा त्याची रोपं करुन आम्हाला वाटली. त्याच प्रकारातले अजून एक रोप देखील दिलेय. एक हिरव्या पानांचा आहे म्हणे लंच आणि दुसरा जांभळ्या पानांचा तो डिनर.
फिंगर लाईम (https://en
फिंगर लाईम (https://en.wikipedia.org/wiki/Citrus_australasica) कुणी लावले आहे का? मला होम डेपो मधे एक रोप मिळाले.
कॅलिफोर्नियासारख्या तुलनेने कमी थंडीच्या राज्याचे हवामान ह्या झाडाला मानवते असे वाटते.
या वर्षीच्या बागकामाची
या वर्षीच्या बागकामाची सुरुवात
रोपे तयार करणे (पिशवीत गेल्या वर्षीच्या भेंडीचे बी आहे, यंदा तेच वापरले)
पेरणी
काकडी
फरसबी
टोमॅटो
मिरच्या
अळू
भेंडी
वांगी
कारले, घोसाळी
पुदिना
ओवा
चायनीज मिरच्या
कढीपत्ता
मोगरा
अंजीर
पेअर्स
कर्दळ
संत्रे
लिंबू
रातराणी
पेरू (याला कीड लागलीआहे, त्यामुळे जरा काळजी आहे)
पपई
अजून काही फोटो टाकले नाहीत जसे गवती चहा, केळी, जॅपनीज मेपल, बॉटलब्रश वगैरे.
वॉव!! कसली सही आहे बाग!!
वॉव!! कसली सही आहे बाग!!
पैचान कौन सहीच आहे बाग तुमची!
पैचान कौन सहीच आहे बाग तुमची!
पैचान कौन, मस्त आहे बाग.
पैचान कौन, मस्त आहे बाग.
मस्त आहे तुमची बाग.
मस्त आहे तुमची बाग.
भारी आहे बाग. अंजीर कुंडीत
भारी आहे बाग. अंजीर कुंडीत लावलेत का जमिनीत ? मला एक झोन ४ परेंत हार्डी असलेली व्हरायटी मिळाली आहे. थंडी वारा आणि हरणे यापासून बचाव म्हणून कुंडीत लावायचा विचार आहे . पण तसे केल्याने फळे धरतील का ? तुमचे झाड किती वर्षांचे आहे ?
अंजीर जमिनीत लावले आहेत.
अंजीर जमिनीत लावले आहेत. यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षीची फळे खुडून टाकली म्हणजे नंतर जोमाने येतात. रोज थोडे का होईना पाणी नियमित द्यायचे. मी थेट मुळाशी पाणी देतो आणि साधारण १ फूट गोलाकार आकारात मल्च टाकतो ज्यामुळे बाष्पीकरण कमी होते आणि पाणी टिकून राहते. यंदा जमले तर भाजीपाल्यासाठी ड्रिप इरिगेशन करायचा विचार आहे, पण नक्की नाही. मला हाताने पाणी घालायला जास्त आवडते कारण तेव्हा झाडांची तब्बेत पण बघता येते.
पैचान कौन, बाग मस्तच आहे
पैचान कौन, बाग मस्तच आहे तुमची!
मेधा, माझ्याकडे अंजीर कुंडीतच आहे. झोन ५ मधे हार्डी असलेले आहे पण दोन वर्ष कुंडीतच ठेवायचा सल्ला रोप देणार्याने दिला होता. लगेच दुसर्या वर्षी फळं लागली. अजूनही कुंडीतच आहे. दरवर्षी २०-२५ अंजीर मिळतात. यावर्षी डेकचे काम झाले की बाहेर लावणार.
सॉलिड आहे बाग!
सॉलिड आहे बाग!
Pages