न्हावी

Submitted by अभिषेक देशमाने on 28 February, 2018 - 05:12

२००९

न्हावी

प्रेषक हेमंत मुळे (गुरु., २०/०८/२००९ - १६:०२)

प्रकटन मौजमजा

नियमितपणे ज्या व्यावसायिकांशी आपला संबंध येतो अशांमध्ये एक म्हणजे न्हावी. महीन्या दोन महीन्यात आरशात आपलं रूप बघत भांग पाडतांना लक्षात येतं की केसं फार वाढलेले आहेत. मग ते कापायला कधी जायचं याचं मनातल्या मनात प्लॅनिंग होतं. बहूतेकवेळा वार रविवारच ठरतो. रविवारची न्हाव्याकडे गर्दी ठरलेली. आपण आपलं गर्दी टाळावी म्हणून पहाटे आठची साखरझोप सोडून न्हाव्याच्या दुकानाची वाट धरतो. पण अंदाज चुकवून आपल्या आधीच २-३ लोकं नंबर लावून असतात. तसं गल्लीत अजून चार दुकाने असतात. पण सगळी दुकाने गिऱ्हाईकांनी भरलेली असतात. न्हावी बदलायचा अजून एक तोटा असा की त्याला आपण कशी हजामत हवी ते सांगितलं तरी ते समजत नसतं. नवीन ( म्हणजे आपल्या केसांसाठी) न्हाव्याला आपण सांगावं की मध्यम प्रमाणात केसं काप तर तो फक्त केसांचे शेंडे कापतो. त्याला अजून बारीक कर म्हंटलं तर तो जास्तच बारीक कापतो. त्यापेक्षा आपल्या नेहमीच्या न्हाव्याकडे जावं आणि डोकं त्याच्या हवाली करून शांतचित्ताने डोळे मिटून बसून राहावं.

नेहमीच्या न्हाव्याक्डे जाण्यात अजून एक फायदा म्हणजे आजुबाजूच्या 'खबरी' समजतात. न्हावी लोकांना स्थानिक राजकारणात प्रचंड रस असतो. ह्यावेळेस कोणाची हवा आहे, कोण येणार, कोणी किती पैसे वाटले अशी सगळी ईत्थंभूत माहीती त्यांना असते. न्हावी लोकांच्या प्रचंड जनसंपर्काचा राजकारणी लोक पण चांगला उपयोग करून घेत असावे. राजकारणी आणि न्हावी लहांपणी एकत्र गोट्या खेळत असावेत अशा थाटात एखादा न्हावी त्या नेत्याबद्दल बोलत असतो. नेत्याच्या किती 'भानगडी' आपल्याला माहीत आहे असं सांगतांना त्याचा चेहरा बघावा. कौन बनेगा करोडपती आणि ऑस्कर जिंकल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. त्यावेळेस वाटतं की नेतेलोकं भानगडी करतांना न्हावी लोकांना विचारत असावेत अथवा त्यांना बरोबर घेऊन जात असावेत.

असो. गर्दी पाहून तुम्ही मागच्या मागे सटकायचा विचार करत असता, पण ते चाणाक्ष न्हाव्याच्या नजरेतून सुटत नाही. चारी बाजूला लावलेल्या आरश्यातून त्याला तुम्ही बरोबर दिसतात. तो लगेच हाक मारून थांबवतो. फक्त १० मिनिटं लागतील असं म्हणतो. आपल्याला पण माहीत असतं की त्याचे १० मिनिटे म्हणजे आपला अर्धातास! पण आता आलोच आहोत तर परत कशाला जा, असा विचार करत आपण आत जातो. टाईमपास म्हणून तिथे आपण न-वाचणारे आणि एखादे मोठे शब्दकोडे अथवा चित्रपटांची बित्तंबातमी असलेले एखादे वर्तमांपत्र पडलेले असते. नाईलाजाने आपण ते वाचत बसतो. आदल्या दिवशी जर चेंडू-फळीचा सामना झाला असेल तर उपस्थित गिऱ्हाईकांमध्ये त्याची चर्चा रंगलेली असते. नकळत आपण भाग घेऊन आपण आपलं ज्ञान पाजळतो. मधून मधून न्हावी एखाद्या वादात पडून त्याचा न्याय-नोवाडा करत असतं. अशा वादांमध्ये त्याचं मत हे अंतिम असतं.

होता - होता वेळ निघून जातो. मेरा नंबर कब आयेगा असं मनात म्हणता म्हणता आपला नंबर लागून जातो. आपण खूर्चीवर बसतो.स्मोरच्या काउंटरवर निर-निराळ्या पावडर, तेल, जेल, साबण ह्यांचे डबे असतात. त्या डब्यांवरचे चित्रे हमखास परदेशी असतात. आणि 'तसा' ब्रँड आपण कोणत्याही मॉलमध्ये पाहीलेला नसतो. कधी-कधी त्यावरचे नावे पण एखाद्या महागड्या उत्पादनाशी मिळते-जुळते असते. अशा गोष्टी कुठे मिळतात हे न सुटणारे कोडे आपण त्याला विचारतो पण तो आपल्या ह्या यॉर्कर्वर षटकार ठोकत आपल्याला हजामत कशी हवी ते विचारतो. आपणसुधा मोघमात काहीतरी सांगून देतो. तसं समोरच्या चित्रात वेगवेगळ्या केशरचना असतात, पण अशारचना करून आपल्या कार्यालयात काय गहजब उडेल असा विचार करून आपण सरळ नेहमीची 'कट' त्याला सांगून देतो. तो पण ती एकली न एकल्या सारखी करत पाण्याचा फवारा आपल्या केसांवर मारतो. लहानपणी मला हा फवारा अतिशय आवडायचा. खुर्चीच्या हात ठेवायच्या जागेच्या आधारावर आडवी टाकलेल्या फळीवर बसवून मारलेला फवारा अजून लक्षात आहे.

ओल्या झालेल्या केसांवर आपला न्हावी सराईतपणे कात्री चालवायला लागतो. पुढच्यावेळेस रात्री तेल न लावता येत जा असं तो आपल्याला बजावतो. आपण 'बरं' किंवा 'हम्म' अशी उत्तरे देतो. त्यानंतर तो आपली गप्पांची पोतडी उघडायला सुरूवात करतो. कोण काय करतो याची माहीती तो द्यायला सुरूवात करतो. मध्येच आपल्याला पण तो प्रश्न टाकतो. पण आपल्याला त्याचा प्रश्न फारसा आवडत नाही. मोघमात उत्तर देऊन आपण टाळून देतो. नुर बघत तो कल्ले किती ठेवायचे ते विचारतो. सावधपणे माप घेत तो दोन्ही कल्ले एकाच मापात कापतो.

आपल्या बाजूला एखादा मुलगा झीरो मशीन लावून शाळा स्टाईल कटींग करत असतो. त्याची गंमत वाटून आपण तिरप्या नजरेने बघत असतो, पण आपला न्हावी ती परत सरळ करायला लावतो. बाजूचा न्हावी ते मिशन ५ मिनिटात उरकतो आणि एखादा कॉलेज कुमार गझनी कट करायला आलेला असतो. पण आता 'येळ' नाही असं गिऱ्हाईकांची गर्दी बघून तो त्याला कटवून देतो. ईकडे आपली 'हजामत' संपत आलेली असते. वस्तऱ्याला नवीन ब्लेडचं पातं लावून तो सिद्ध करतो. न्हाव्याचं कसब हे बहुदा तो किती सफाईने वस्तरा चालवतो त्यावरच असावं. लहानपणी वस्तरा चालत असतांना मला प्रचंड कसतरी व्हायचं. त्यामुळे माझा न्हावी फार संभाळून तो भाग उरकायचा. एकदा त्याने वस्तरा उअरक्ल्यावर तुरटीचं पाणी लावलं होतं. १५ मिनिटे नुसती आग-आग होत होती.

वस्तऱ्याचं काम उरकून तो डोक्यावर एखादं लाल्रंगाचं सुगंधी द्रव्य (नवरत्न नव्हे) टाकतो. आपण धास्तावून काय आहे हे विचारावं तर तो हेअर टॉनिक असं उत्तर देतो. परत हे द्रव्य आपल्याला कोणत्याच दुकानात कधी दिसलेले नसते. डोक्यावर ते टाकून तो १-२ मिनिटे आपली चंपी करतो. परत हा सुध्धा एक कौशल्याचा भाग. भणाणलेले डोके एकदम शांत होऊन जाते. दर रविवारी असं चंपी करवून घ्यायला यावं असं वाटत राहावं. एक न्हाव्याने माझी मान दोन्ही बाजूला फिरवून 'मोडली' होती. त्याने असं केल्यावर मला प्रचंड मोकळं मोकळं वाटायला लागलं होतं. पण त्याने तसं करण्याआधी जाम धास्तावलो होतो. न जाणो पुढची हजामत करायला जीवंत राहतो की नाही ते. पण माझा विचार ओळखून मान मोडल्यावर मला त्याने त्याच्या विशाल अनुभवाची (मान मोडण्याच्या) जाणीव करून दिली. मान मोकळी केल्याबद्दल अर्थातच मी त्याला धन्यवाद दिले. महीलांच्या बुट्टीपार्लर मध्ये चंपी किंवा मान मोडणे चालतं की नाही कोणास ठाऊक!

त्या नंतर तो हातात हनुवटी घेऊन तो आपले केसं 'सेट' करतो. मग अंगावर पांघरलेले कापड उतरवतो. अंगावर पडलेले केसं तो त्याच्या 'झाडू' ने तो खाली पाडतो. 'कशी झाली?'  ह्या प्रश्नावर आपण चांगली असं उत्तर देतो. मग डोक्या मागे आरसा लाउन तो मागचा भाग दाखवतो. आपण मान डोलावून 'ठिक' अस अभिप्राय देतो. मग २०-३० (अमेरिकेत म्हणे ह्याचे खुप जास्त पैसे घेतात. माझा एक मित्र ३ महिन्यानंतर कापायची वेळ येईल येव्हढे बारीक करून गेला होता तिकडे!!!) रुपये देऊन आपण आपल्या घराचा रस्ता शांत मनाने धरतो!!!

माझ्या मनात कायम एक प्रश्न असतो. हा न्हावी त्याची हजामत कोणाकडून करून घेत असावा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की वाचा...

शिवचरित्र, आपण आणि सद्यस्थिती:

जयंती म्हणजे जयंती नसून जागृतीकडे जाणे आहे.
दर्शनाकडून प्रदर्शनाकडे जाणे म्हणजे जयंती
चित्राकडून चरित्राकडे जाणे म्हणजे जयंती,
नाचण्याकडून वाचण्याकडे जाणे म्हणजे जयंती आहे.

प्राचीन भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. भारत हा देश ज्ञानाचे माहेरघर आहे. पहिला ज्ञानाचा गौरव तथागत बुद्धाने केला. भिखु संघाच्या माध्यमातून धम्माचे ज्ञान सर्वत्र प्रवाहित केले. बौद्ध साहित्यात त्याचा उल्लेख जागोजागी आहे. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये तक्षशिला सारखी जगविख्यात विद्यापीठ या भारतात होती.

चरिथ भिक्खव्वे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय । लोकांनु कंपाय , आत्तानु हिताय । आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण !!

या पाली भाषेतील बुद्धांची शिकवण देणाऱ्या ओळी छत्रपती शिवाजीच्या शिवराज्याचे वैशिष्ट्य सांगून जातात.
आज आपण शिवजयंती साजरी करतो, जयंती म्हणजे फक्त फोटोला हार घालून डॉल्बीच्या तालावर नाच करणे नाही, जयंती म्हणजे फक्त भगवे फेटे आणि झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी घोषणा देणे म्हणजे जयंती नाही. जयंती म्हणजे जागृतीकडे जाणे आहे. जयंतीचा अर्थच जागृती आहे. आज समाजाला जयंतीकडून जागृतीकडे नेण्याची गरज आहे. म्हणून आज समाजप्रबोधनाची गरज आहे. आज फक्त शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकर, बसव यांच्याच जयंती साजऱ्या होतात आपल्या पूर्वजांच्या जयंती का होत नाहीत ? हा विचार आपण केला पाहिजे.

जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, जे समाजासाठी जगतात, ते मरूनही नेहमीच जिवंत राहतात.

हाच ओजस्वी इतिहास आहे माझ्या राजाचा. मरावे परी किर्तीरूपे उरावे, ही पंक्ती सत्यात उतरविणारे आदर्श स्वराज्य संथापक म्हणजे छ. शिवाजीराजे. या राजाने सोने, मोती माणिक, हिरे नाही कमविले तर सोन्यासारखी माणसे कमविली. धर्मासनावर सत्तासनाची राजवट निर्माण करणारी आदर्श राजवट म्हणजे म्हणजेच शिवशाही.

भारताच्या इतिहासात नेहमीच दोन शाही होत्या एक होती एक होती सरंजामशाही आणि दुसरी होती राजेशाही. शिवरायांची राजवट ही सरंजामशाहीची राजवट होती. राजेशाहीत राजाच कौतुक नेहमीच होते पण लोकशाहीत राजाच कौतुक गौरव व्हावा असा एकमेव माझा छत्रपती शिवाजी राजा.
राजेशाहीत, सरंजामशाहीत लोकशाही निर्माण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा होता.
शिवशाही म्हणजेच लोकशाही, शिवराज्य म्हणजे बुद्ध- बसव- भीम यांच्या स्वप्नातील लोकसत्ताक लोकशाही पद्धती.

महाराज्यांच्या पूर्वी कोणतेही मराठा राजवट भारतात नव्हे तर जगात कोठेच नव्हती. बौद्ध, जैन धर्माला अनेक राज्यानी राजाश्रय दिला होता. अनेक बौद्ध, जैन राजे भारतात होऊन गेले आहेत. शिवाजी महाराज म्हणजे पूर्वी कोणीतरी स्थापन केलेल्या गादीवर बसून राज्यकारभार करणारे राजे नव्हते. सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा हृदयाशी कवटाळून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे प्रजाहितदक्ष राजे म्हणजे शिवछत्रपती. ते एक स्वतंत्र राज्यसंस्थापक होते. शिवशाहीत मावळे इमानदार होते. आजच्या नेत्यासारखे आणि कार्यकत्यासारखे पैशाला, मद्याला आणि मांसाहारी जेवणाला विले जाणारे नव्हते. शिवरायांशी, स्वराज्याशी इमान ठेवणाराच खरा मावळा. मावळा एका जाती धर्मापुरता मर्यादित नव्हता. मावळा म्हणजे मावळ प्रांतात राहणारा, गडकपाऱ्यात भटकणारा, स्वराज्य स्थापनेत रक्त सांडणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार लोक म्हणजे मावळे. मावळे आणि मराठे ही व्यापक संकल्पना आहे. मराठा जातीचे नाव नसून, कार्याचे , कर्तृत्वाचे आणि शौर्याचे नाव आहे. मावळप्रांतात राहणारे सर्व कुणबी खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे आहेत.

शिवरायांचे कार्य आणि राज्य , हे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सामान्य माणसाला - रयतेला आपले राज्य वाटत होते, हेच शिवशाहीचे वैशिष्ट्य आहे. माझ्या मते उत्तम राज्याच्या सर्व संकल्पना शिवशाहीत पूर्ण झाल्या, खरे तर तेच उत्तम राज्य आहे.

सध्या चित्र फार वेगळं आहे. लोकशाही, लोकशाही म्हणून गौरव करणाऱ्यांनो, खरी लोकशाहीची मूल्ये तुम्हाला माहिती आहेत का ? आज आपण आणि शिवशाही यात जवळजवळ ३५० वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही काही उपयोगाची नाही हे जरी खरे असले तरी लोकशाहीचा पुरेपूर फायदा लोकांना मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. बिकाऊ नेते आणि कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाची गळचेपी केली आहे.

खुद को बुलंद कर इतना, या कवितेच्या ओळी फक्त कवितेतच राहिल्या. मन- मेंदू- मनगट असक्षम असणारी ही रयत आज सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक गुलाम बनत आहे.

पन्हाळ्याला सिद्धी जोहार आणि फादरखान यांनी वेढा दिला. हा वेढा तोडण्यासाठी नेताजी पालकरांनी सिद्धी हिलालच्या साह्याने दिलेला लढा नाकामयब ठरला. स्वराज्यातील सेनापतीला हार मानावी लागली होती. जेथे वेढा पातळ असेल तेथून वेढ्यातून बाहेर पडायचे असे ठरले. त्यासाठी खोटा शिवाजी तयार करण्यात आला. त्याला महाराजांसारखी वेशभूषा केली, कपाळाला चंद्रकोर लावली. गळ्यात कवडीची माळ घातली आणि हा खोटा शिवाजी पालखीत बसला. पुढे निघून गेला. तो सिद्धी जोहरच्या हाती सापडला. त्याला माहिती होते की खान आपल्याला पकडणार आणि मारणार. किंबहुना खानाने त्याला पकडावे आणि सैन्य गाफील होऊन वेढा सैल व्हावा. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळगडावरून निसटले ते विशाळगडाकडे गेले. पकडलेल्या खोट्या शिवाजीचा खानाने खातमा केला. तो खोटा शिवाजी होता, शिवा न्हावी. आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना असतानाही मृत्यूला हसत हसत कवटाळणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता. शिवरायांच्या घोडदळ, पायदळ यात असंख्य मावळे स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावायला तयार होते.

महाराज पन्हाळगडावरून निसटले, विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभूसह मूठभर मावळ्यांनी घोडखिंड अडवली. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळाली. महाराज विशाळगडावर पोहचले. बाजीप्रभूंना वीरमरण आणि अनेक मावळे गतप्राण झाले. आज इतिहासाला त्यांची नावेही माहीत नाही.

बाजीप्रभु आणि मूठभर मावळे का लढले ? तीच भावना, मेलो तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.

या अमरहुतात्म्यांच्या प्रेरणा घेऊन आज शिवइतिहासाची पाने चाळत आहोत. तरीही आज युवकांकडे पाहिले तर वाटते , आजचा युवक नक्की कोठे हरवला आहे. व्हाट्सअप्पच्या, फेसबुकच्या युगात जगणाऱ्या युवकाला आज महापुरुष वाचण्यासाठी वेळ नाही. शीला, मुन्नी, शालू आमचं सगळंच काम हळूहळू. बाप कामातून बाहेर येत नाही आणि बाहेर आलाच तर नशेत बुडून जातो. आईच्या मागचे अवडंबर, व्रतवैकल्ये, सण-समारंभ सुटत नाहीत, सुटलीच तरी घर-घर की कहाणी कधी संपत नाही. मुलीचा निम्म्याहून अधिक वेळ व्हाट्सअपवर चाॅटिंग आणि मोबाईल फोनवरच जातो. सकाळी एकाशी पॅचअप, संध्याकाळी एकाशी ब्रेकअप, यातच माझ्या युवापिढीचा वेळ जातो. आम्ही महापुरुष वाचणार कधी ?

शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराजांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत सत्तेत आलेल्या कोणत्याही राजकिय पक्षाने अशी भूमिका आजपर्यंत घेतली नाही. उदध्वस्त झालेली गावे महाराजांनी कौलनावे देऊन पुन्हा वसवली. शेतकऱ्यांना शेतीसाठी बी- बियाणे औतफाटा देऊन मदत केली. शेतीला प्रोत्साहन दिले. शेतीवरील महसूल कमी केला, शेतसारा कमी केला.
दुष्काळात महसूल माफ केल्या याउलट दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करण्याऱ्याच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मोजण्यासाठी काठी केलेली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी १४ तसू काठीची लांबी ८२ तसु असे. प्रत्येक शेतकऱ्यास किती पीक व्हावे, हे पिकाची पाहणी करून ठरवीत. एकूण शेतीच्या उत्पन्नाचे ५ भाग करून त्यापैकी ३ भाग शेतकऱ्यांना आणि २ भाग सरकारला असा करार होता. सरकारदेणे शेतकऱ्याला नगदी किंवा धान्याच्या रुपात द्यावे लागत असे. नापीक जमिनीच्या शेतकऱ्याला गुरे ढोरे सरकारातून दिली जात असे. अवर्षण, दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना मदत केली जात असे.

खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांच्या स्वप्नातील राज्यकारभार कसा असावा, हे शिवरायांनी दाखवून दिले. महात्मा बसवण्णा एका वचनात म्हणतात, राजा हा जनतेच्या मालक नसून, सेवक आहे. ही शिकवण शिवरायांनी आपल्या राज्यकारभारात तंतोतंत उतरवली.

शिवचरित्राचे अनेक पैलू मांडता येतील, पण वेळेअभावी त्यासर्व पैलूंचे आपण स्मरण करू.
जहागिरी-इनामदारी- वतनदारी व गावगाडा, रयतेची कणव असणारा राजा, शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या गौरवार्थ भूमिका, शिवाजी महाराज आणि राज्यकारभार, सुखी समाधानी रयत, शेतकऱ्यांचे सैन्य, व्यापार उद्योगास संरक्षण, गुलामांच्या व्यापारास बंदी, महाराजांची सर्वधर्मसमभाववृत्ती, शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास का ? इ मुद्यांवर विस्तृत विवेचन करता येईल.
लेखक: अभिषेक देशमाने, ९८२२०५४२९१.

पहिला प्रतिसाद नाही, मी मायबोलीवर नवीन आहे. तो लेख टाकायचा होता मी नवीन असल्याने तो प्रतिसाद मध्ये टाकला तो लेख प्रतिसाद मधून काढायचा आहे तो कसा काढून टाकता येईल ते सांगा