आत्ताच म्हणजे अगदी तासाभरापूर्वी हा चित्रपट पाहिला , अर्थातच प्रचंड आवडला अन बाहेर येतानाच वाटल काहीतरी लिहिल पाहिजे . मला माहित आहे की यावर आधीच यापेक्षा चांगले धागे नक्कीच आहेत . किंबहुना ते वाचूनच मी चित्रपट पाहिला . पण विचार केला की एखादी गोष्ट चांगली आहे हे परत परत सांगायला काय हरकत आहे ?
माझ्या दुर्दैवाने (अन इतरांच्या सुदैवाने) मला चहा सोडून इतर काही बनवता येत नाही . पण माणसाचा जन्म हा चवीचे पदार्थ खाण्यासाठीच झाला आहे अशी माझी श्रद्धा आहे अन त्यामुळेच चांगला स्वयंपाक करणार्यांविषयी मला प्रचंड आदर आहे . किंबहुना माझ्या मते ती सर्वात मोठी कला आहे .
माझ्या आजीसारखे मोदक या जगात कुणीच बनवत नाही अन माझ्या आईच्या हातच्या पिठल्याची सर कशालाच नाही यात फक्त चव हाच मुद्दा आहे हे मला पटत नाही .
अन त्याच उत्तर इथ सोनालीच्या उद्गारात येत "तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा स्वतःचा एक अंश त्यात देत असता" यात माझ्या मते सगळ्या सुगरणींच्या हातच्या चवीच सार लपल आहे.
अन फक्त स्वयंपाकच नाही तर ते सगळ्या गोष्टीना लागू पडत . डेडलाईन आहे म्हणून प्रोग्राम लिहिणार्याचा कोड बरोबर असेलही अन पैशासाठी शिकवणारा शिक्षक सगळा अभ्यासक्रम शिकवेलही (अन कदाचित त्यात काही गैरही नाही) पण जेव्हा "आतून" "Calling " येत तेव्हा जे घडत ते काहीतरी जास्ती असत , कारण त्यात एक समाधान , एक आनंद असतो.
कथा तशी साधी अन छोटीशीच . एका लंडनमध्ये राहणार्या मुलाला मराठी रेस्टॉरंट उघडायच आहे , त्यासाठी मराठी पदार्थ शिकायला तो पुण्यात येतो अन एका थोड्याश्या विक्षिप्त बाईकडून ते शिकतो अन तिच्यातही बदल घडवून आणतो इतकीच. पण ती जशी घड्त जाते ते पाहण हा एक अप्रतिम अनुभव आहे.
चित्रपटाचा वेग , त्याची मांडणी , पार्श्वसंगीत सगळ अगदी एखाद्या उत्तम जमलेल्या पक्वान्नाच्या जिन्नसासारख आहे पण त्यात खरी चव आणलीये ती सिध्दार्थ अन सोनालीने . सिद्धार्थ चांदेकरचा मी अग्निहोत्र पासून फॅन आहे , अन सोनाली कुलकर्णी तर बोलायलाच नको . तशी "राधा" अतिशय आव्हानात्मक आहे पण तिने ती अगदी सहज साकारली आहे . पोपट अन त्या काकू (अन त्या काकूंचे काही संवाद "स्वतःला बच्चन समजते अन पोपट कधी गाढाव अस्तय का ?" ) अगदी खरे खरे वाटतात , इन फॅक्ट खरी वाटणारी पात्र हाच या चित्रपटाचा आत्मा आहे .
चित्रपटात दाखवलेले पदार्थ अन त्यांच सादरीकरणही अगदी तोंडाला पाणी आणणारं. चित्रपट कुठेही मेलोड्रामा होत नाही हेही उत्तम (अर्थात सचिन कुंडलकरचा चित्रपट असल्याने ते अपे़क्षित होत ,पण "वजनदार " आठवणी अजून ताज्या आहेत)
चित्रपटातल्या तीन गोष्टी बद्द्ल मला आवर्जून लिहावस वाटत.
१. सिद्धार्थच्या मैत्रिणीच्या तोंडचा संवाद "आपण काम करतो ते पैसे कमवण्यासाठी . आणि आवडीच्या गोष्टी करायला शनिवार रविवार आहेत ना ?" ती इतक्या प्रामाणिकपणे ते म्हणते . माझ्या मते आपल्या पूर्ण पिढीची ही व्यथा आहे . नावडत काम करायच किंबहुना आपल काम नावडत आहे अस समजायच , अन मग उगाच "वीकेंड का क्या प्लान है " एखादी गोष्ट फक्त आवडते , म्हणून करायची असते हेच विसरतोय आपण.
२. एक स्त्री अन एक पुरूष यांच नात फक्त मैत्रीच असू शकत , हे आपल्याला अजूनही रूचलेल नाहीये. भाऊ अन प्रियकर /नवरा यांच्या 0 आणि 1 मधे काहीतरी असत हेच आपल्याला मान्य नाही . चित्रपट हे अगदी सुंदरपणे दाखवतो अन तेही कुठेही preachy (प्रचारकी ?) न होता.
३. मराठी जेवणाला ग्लॅमर द्यायचा एक प्रामाणिक प्रयत्न हा चित्रपट करतो . चित्रपट पाहताना जाणवत की अरे किती छान मराठी पदार्थ आहेत
पण किती कमी बाहेरच्या (भारतीय , इतर तर सोडाच) लोकाना हे माहित आहेत , किंबहुना माझ्या मुलीला यातले किती माहित होतील ?
मराठीत इतके चांगले चित्रपट येतात हे आपल सुदैव आहे , आपल ही कर्तव्य आहे की त्याना प्रोत्साहन द्याव . तर मग नक्की खाणार ना हा "गुलाबजाम" ?
आताच पाहून आलो. मस्त सिनेम
आताच पाहून आलो. मस्त सिनेम आहे. आवडला !!
सगळ्याच कलाकारांनी मस्त कामं केली आहेत. सोकुल आणि सिद्धार्थ त्यांच्या रोलमध्ये सुट झालेत.
रच्याकने, त्यातल्या एका ट्युनची सुरुवात एकदम "वैष्णव जनतो" सारखी आहे. मला पहिल्यांदा ऐकताना अरे हे गाणं इथे? असं झालं.
पुणेरीपणावरचे पंचेस भारी आहे. तू वर लिहिलेल्या मुद्द्यांशीही सहमत.
भाऊ अन प्रियकर /नवरा यांच्या
भाऊ अन प्रियकर /नवरा यांच्या 0 आणि 1 मधे काहीतरी असत हेच आपल्याला मान्य नाही . चित्रपट हे अगदी सुंदरपणे दाखवतो अन तेही कुठेही preachy (प्रचारकी ?) न होता.>>>>> +१
रच्याकने, त्यातल्या एका
रच्याकने, त्यातल्या एका ट्युनची सुरुवात एकदम "वैष्णव जनतो" सारखी आहे. मला पहिल्यांदा ऐकताना अरे हे गाणं इथे? असं झालं. >>> मला पण
अतिशय देखणा, सर्व अर्थाने
अतिशय देखणा, सर्व अर्थाने चित्रपट.
काय सुंदर सिनेमेटॉग्राफी केलीये या चित्रपटात. खल्लास!
कुंडल्या कितीही आगावपणे आणि कुचकटपणे पुण्याविषयी बोलो/लिहो, त्याला पुणं आवडतं खुप हेच दिसतं.
एवढे देखणे पदार्थ इतका काळ पहाणं म्हणजे अन्याय ठरतो निव्वळ. सायली राजाध्यक्ष ज्यांनी फूड डिझाईन केलंय या सिनेमासाठी, त्यांना तर हॅट्स ऑफच आहेत.
आणखी एक अतीप्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे 'पार्श्वसंगित'. इतकं लोभसवाणं पार्श्वसंगीत आहे या सिनेमात की बास!
सिद्धार्थ चांदेकर पुर्वी डोक्यात जायचा, या सिनेमात मात्र त्याने अतीशय उत्तम काम केलंय. सो कूलला काय, चॅलेंजच नाही.
लेखक सचीन कुंडलकरचा राग दिग्दर्शक सचीन कुंडलकरने काढला.
मस्तच
मस्तच
मराठीत इतके चांगले चित्रपट येतात हे आपल सुदैव आहे , आपल ही कर्तव्य आहे की त्याना प्रोत्साहन द्याव . तर मग नक्की खाणार ना हा "गुलाबजाम" ?
- खाउन झाल ....उत्तम रेसिपि सहज जमलेय.