Submitted by बेफ़िकीर on 23 February, 2018 - 04:07
गझल - कोठेही
कुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही
अशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही
सदा जातीयवादाचे छुपे उद्देश आढळले
न दिसला राम कोठेही न दिसला बुद्ध कोठेही
मनाची खोल सच्चाई कुणाला दाखवू आता
मला नाही मिळाले एकही मन शुद्ध कोठेही
तुला कारण कळाले तर मलाही सांग ह्या देशा
कशाने माणसे होतात हल्ली क्रुद्ध कोठेही
वयाची खिन्न पन्नाशी निराळे दृश्य दाखवते
मला दिसतात आताशा बिचारे वृद्ध कोठेही
==========
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पन्नाशी म्हणजे खरे तरुणच,
पन्नाशी म्हणजे खरे तरुणच, थोडे डिप्रेशन येतेच, पण आणखी १५-२० वर्षे थांबलात तर हे असले प्रश्न मनात येऊन दु:ख्खी होणार नाही तुम्ही.
मग सगळीकडे गंमतच गंमत दिसू लागते, काळजी नाही, राग नाही, हेवा नाही, दु:ख्ख नाही. नुसती गंमत!
मग सगळीकडे, सगळ्यात विनोदच दिसतो.
मला अश्या अर्थाची गझल लिहायची होती, पण गझलेला जमीन असते म्हणे नि जमिनीवर सध्या बर्फ असल्याने जमीनच नाही!
(No subject)
कुणा दोघांमधे झालेच नाही
कुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही
अशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही >>>>
हा शेर जास्त आवडला.
अप्रतिम, खूप खुप आवडली
अप्रतिम, खूप खुप आवडली
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
छान....