पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Not Sai Lokur.It was Tejaswini Lonare and they made her look like Aishwarya from Jodha Akbar.

रजत कपूर महेश अंकल ( महेश कोठारे ) नाही गं सूलु. तो एक सिनेमा होता ज्यात रजत कपूरने व्हिलनचे काम केले होते. शेफाली छाया ( सत्या- सपनेमें मिलती है वाली ) त्याची भाची की पुतणी असते आणी तो तिचा लहानपणी विनय भंग करतो अशी स्टोरी आहे. त्यात त्याचे नाव बहुतेक महेश होते.

हा पद्मावत कसा वाटतो त्या ऐवजी मराठीत आला तर वर किती त्या पोस्टी!
>>>>>

मग काय करणार यार. आम्ही पद्मावती पाहिला नाही. मग आम्ही काय लिहिणार ईथे..

येनीवेज, मराठीवरून आठवले मिलिंद सोमन बाजीराव मध्ये होता ना? त्याला का टीममधून काढला? तो खिलजीच्या रोलमध्ये चालला असता. बाकी काही नाही पण त्याचे डोळे आणि त्याची नजर शोभली असती.. मराठी पद्मावतीमध्ये तरी त्याचा विचार व्हावा ..

लेकी बरोबर पाहिला तेव्हा तिने पहिल्याच सिंहल मधल्या शॉट मध्ये रावल रतन एक्स वाय झी पण... काहीतरी बोलतो तर मला शंका विचारली की तो मराठी का बोलतो आहे राजपूत आहे ना?!!! आय डिंट क्नो वाट टू से......

ती चित्रपट कला शिकत असल्याने फक्त दीपिकाच्याच फेसला सीजीने ग्लो आणला आहे. कडा अंधार्‍या दिसत आहेत.
कथन अगदीच सरधोपट आहे. आणि इतर अंतर्गत बाबी मला समजावून सांगितल्या. इक दिल एक जान मध्ये पण जर ते हिंदी राजस्थानी बोलणा रे आहेत तर कुर्बानी, इश्क असे शब्द का वापरतील अशी शंका काढली.
व्हिज इज करेक्ट इन अ वे. समर्पण वगैरे शब्द हवे होते का? फायनला लढाईत रावलचा घोळदार ड्रेस इंप्रॅक्टिकल आहे. असे ही मत पडले. पण घूमर आव्डले.

दीपिकाचा लास्ट सीन मधला घागरा अति उच्च आहे. लाल व त्यावर सोनेरी वेलबुट्टी आहे. बट व्हिच ब्राइड इन हर राइट मांइंड विल कॉपी दॅट डिझाइन?

ती चित्रपट कला शिकत असल्याने फक्त दीपिकाच्याच फेसला सीजीने ग्लो आणला आहे>>
हा प्रकार मस्तानीतही करून दिपिकाला खूपच पांढरीफट्ट गोरी करून टाकलं होतं. प्रत्यक्षात ती खूपच सावळी आहे. माझ्या मामेबहिणीने तिला एअरपोर्टवर पाहिले होते. तिचे म्हणणे की ती प्रत्यक्षात दिसायला अतिशय साधारण आहे, ती दिपिका आहे हे माहिती नसेल तर कोणीही तिच्याकडे आवर्जून पाहाणार नाही. केवळ उंची आणि स्लिम फिगरमुळे ती मॉडेलिंग आणि चित्रपटक्षेत्रात आली.

सौण्दर्यात फक्त गोरेपणा मोडत नाही. इनफॅक्ट उंची आणि स्लिम फिगर जास्त मॅटर्स. आणि नाकीडोळी सुद्धा छान आहे.

मला बिन्ते दिल आवडलय, मला वाटलं होतं कोणी मिड्ल इस्टर्न गायक असेल, पाहिलं तर अर्जित !
मस्तं गायलाय.

अमा,
जौहारचा घागरा सुंदर आहेच, त्या बद्दल इंटरेस्टींग अर्टिकल आहे, त्या घागर्यावर लाल ठसे आहेत हाताचे , नववधू येताना जे भिंतीवर उनटवते आणि जाताना /जौहारच्या वेळी अशी ओढणी ओढते टाइप काहीतरी लॉजिक.
http://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/deepika-p...
देवदास मधेही असे लॉजिक आहे, देवदास मरतो कळल्यावर कसली पर्वा न करता ती हवेलीतून धावत सुटते (भन्साली स्टाइल मधे ), तेंव्हा कोणाच्यातरी हतातलं आलत्याचं ताट पडतं आणि त्यावर तिचे पाय पडतात, हवेलीतून बाहेर जातानाचे लाल पायाचे ठसे म्हणजे ती पण गेली.
दूल्हन घरात येताना आणि सुहागन मरते तेंव्हाचे जातानचे पायाचे लाल ठसे.

आणि एक इरिटेटिंग विनोदी पद्मावत
पद्मिनी - श्रेया बुगडे
रतनसिंग - भाउ कदम
खिल्जि - निलेश साबळे>>>>>>>>>>>>>>>. हे तर होणारच चहयेद्या मधे एकदातरी.

सगळ्या चित्रपटात रताळ्या, भुसनळ्या, सुक्काळीच्या असे बहारदार संवाद ऐकायला मिळाले असते. >>> Lol
हे वाचून पुलंचे "गाळीव इतिहास" आठवले. मराठी सैन्य उर्दू शिकून मोंगलांचा पाठलाग करताना "पाव लगाके पळता हय के नही" वगैरे म्हणू लागले व "हल्ला चालेल पण उर्दू आवरा" म्हणून पळापळ झाली असे त्यात लिहीले आहे. तसे काहीतरी खिलजी म्हणेल रताळ्या वगैरे ऐकून.

भुस्नळ्या हा शब्द भन्सालीच्याच सन्मानार्थ इथेच कुणीतरी वापरला होता परवा Lol

हे तर होणारच चहयेद्या मधे एकदातरी.
>>>
नाही होणार. झालेच तर त्यांचेही जैसी करणी वैसी भरणी होईल.

गंमतीचा भाग जाऊ दे पण पद्मावतीवर खरोखर मराठीत सिनेमा निघाला असता तर खालील लोक शोभून दिसले असते.
पद्मावती: वर्षा उसगावकर किंवा अश्विनी भावे. वर्षाने झाशीची राणी चांगली वठवली होती आणि अश्विनीही मस्तानी म्हणून शोभून दिसली होती.
खिलजी: नाना पाटेकर
रावलः अजिंक्य देव किंवा रवींद्र मंकणी
सध्याच्या अभिनेत्यांपैकी कोणीही पटकन डोळ्यासमोर येत नाहीये.
Submitted by चीकू on 30 January, 2018 - 18:50
>>>>>
आ गये मेरे मौत का तमाशा देखने टाईप डायलॉग ऐकावे लागतील.

मी, खली बली आणी बिंते दिल वर फिदा. काहीही म्हणा, रणवीर, रणवीर हय. जबरी नाचतो. तो कोंबडा डान्स आहे म्हणून टीका करणार्‍यांनी आधी घरात कोणी नसतांना दोन पायांवर नाचुन बघावे. Proud ( हे एकदम मजेत लिहीले आहे, कृपया गैरसमज नसावा, हलके घ्यावे ) कारण हा प्रयोग मलाही जमला नाही. हा पीटी डान्स आहे का असे विचारुन नवर्‍याने सालाबाद प्रमाणे टीका केली, पण मी मनावर घेतली नाही. चित्रपट पहाण्याचा योग कधी येतोय देव जाणे!

युट्युबवर तो एका पायावरचा फेमस डान्स पाहिला. नाचताना तो 'खलिबलिया गॅसवाला खलिबलिया गॅसवाला' असे काहीतरी ओरडत असतो. यावरून मला वाटते तो गॅसेसचे त्रासेस कमी करण्याचा काही अफगाणी प्रकार असावा.

पोटात खळबळ? आणि गॅसेस ही होतायत?
अहो, चिंता सोडा!! आपलंसं करा आमच्या कोंबडा डान्स ला!!!
"कोंबडा डान्स केला आणि गॅसेस ला तर मी विसरुनच गेलो.माझं आयुष्यच बदललं"

यावरून मला वाटते तो गॅसेसचे त्रासेस कमी करण्याचा काही अफगाणी प्रकार असावा.>>>>> Rofl
ते कलबिया कैस वल्ला असे आहे. म्हणजे तू देवासारखा आहेस.

अनू Lol भारीये हे पण!

पाहिला एकदाचा! अमांनी लिहीलेल्या पोस्ट्स पटल्या.
सलीभंनी फक्त रणवीरलाच डायरेक्ट केलं आणि दिपीकाला काहीच सांगितलं नाही असं वाटलं! अगदीच पडेल परफॉर्मन्स. फक्त घूमर गाणं छान केलय.
हा सिनेमा फक्त रणवीरचाच आहे! बेस्ट आहे तो!!
बाकी अगदी दिखाऊ आणि वरवरचा सिनेमा आहे. तीन तास बघा आणि विसरून जा. Everything is just skin deep. Nothing touches the soul.
शेवटी अमीर खुस्रोने लिहिलेला संदेश (जो पद्मावती न बघता आगीत टाकते) काय असेल? असा विचार करून मजा वाटली.

पद्मिनी - श्रेया बुगडे
रतनसिंग - भाउ कदम
खिल्जि - निलेश साबळे>>> आणि मलिक कोण सागर कारंडे का?

मराठीत , अश्विनि भावेच जुन्यापैकी .
नविनपैकी , अम्रुता खानविलकर .

दिपीकाला काहीच सांगितलं नाही असं वाटलं! >>> Happy त्यामुळे तिने गेल्या वेळी जे शिकलीय तेच पुन्हा केलेय बहुधा :
लहू मूह लग गया आणि इक तू है : दीपिकाची रंग उडवण्याची सेम टू सेम अदा :(कॅरेक्टर सेम नसेना का!) Happy
https://www.youtube.com/watch?v=szVW_w-W8cQ - इथे १:४२ ला
https://www.youtube.com/watch?v=c64I9HNpiOY - इथे ०:३२ ला
सेम एक्सप्रेशन्स.

हो रंग उडवणे सेम अगदी.
जेंव्हा शहिदचे चरण कमल क्लोज अप मधे दाखवले, मला तर वाटलं आधी चिमटा घेइल ही काशीबाई सारखा Proud

Not Sai Lokur.It was Tejaswini Lonare and they made her look like Aishwarya from Jodha Akbar.>>> सई लोकूर आणि तेजस्विनी लोणारी दोघी सारख्याच वाटतात मला.

रजत कपूर महेश अंकल ( महेश कोठारे ) नाही गं सूलु. तो एक सिनेमा होता ज्यात रजत कपूरने व्हिलनचे काम केले होते. शेफाली छाया ( सत्या- सपनेमें मिलती है वाली ) त्याची भाची की पुतणी असते आणी तो तिचा लहानपणी विनय भंग करतो अशी स्टोरी आहे. त्यात त्याचे नाव बहुतेक महेश होते. >>> मला महेश अंकल म्हणजे महेश कोठारे वाटला. Proud

हो मला तोच म्हणायचाय.मला तो महेश अंकल, खोया खोया चांद मधला हिरो, दृष्यम मध्ये तब्बू चा नवरा म्हणून असा सगळीकडे आवडतो.

पोटात खळबळ? आणि गॅसेस ही होतायत?
अहो, चिंता सोडा!! आपलंसं करा आमच्या कोंबडा डान्स ला!!!
"कोंबडा डान्स केला आणि गॅसेस ला तर मी विसरुनच गेलो.माझं आयुष्यच बदललं" >>> मी_अनु Rofl Rofl Rofl पाहिलास का चित्रपट मग लेख लिहि ना प्लीज!!

सुलू
पिक्चर मध्ये हिरो शायनी आहुजा, जो डायरेक्टर आणि लेखकाचे पात्र निभावतो.
पिक्चर मध्ये सह कलाकार(शॉर्ट रोल) रजत कपूर, जो 'प्रसिद्ध हिरो' हे पात्र निभावतो.
अल्सो इन भेजा फ्राय अँड दृश्यम.
या माणसाला कमी स्क्रीन प्रेझेंन्स चे रोल मिळतात.पण जे मिळतात ते जणू देवाने त्याच्या एकट्या साठीच बनवल्या सारखे तो करतो.
मुख्यतः एका शांत डिसेंट हाय प्रोफाइल श्रीमंत माणसाचा रोल तो चांगला करतो.

पिक्चर अजून पाहिला नाही, टीव्ही वर आल्यावरच पाहणार आहे.

Pages